Niranjan Davkhare Sarkarnama
कोकण

Niranjan Davkhare: निकालापूर्वीच निरंजन डावखरे यांच्या अभिनंदनाचे झळकले बॅनर

Mangesh Mahale

विधानपरिषदेच्या चार जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली असून यामध्ये दोन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघांचा समावेश आहे. त्यांच्या मतमोजणी सुरु झाली आहे. सांयकाळपर्यंत निकाल लागणार आहे. निकालापूर्वीच कोकण पदवीधर मतदार संघाचे उमेदवार निरंजन डावखरे (Niranjan Davkhare)यांच्या अभिनंदनाचे बॅनर झळकले आहे. हे बॅनर सगळ्याचे लक्ष वेधून घेत आहे.

निरंजन डावखरे हे कोकण पदवीधर मतदार संघातून (Konkan Graduate Constituency) महायुतीचे उमेदवार असून मतमोजणी सुरू होण्यापूर्वीच त्यांच्या विजयाचे बॅनर माणगावमध्ये लागले आहे. भाजप रायगड जिल्हा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष निलेश थोरे यांनी हे बॅनर लावले आहे.

कोकण पदवीधर मतदार संघाची आज नेरूळ येथे मतमोजणी सुरु आहे. एकूण 13 उमेदवार रिंगणात आहेत. महायुतीचे निरंजन डावखरे आणि महाविकास आघाडीचे रमेश कीर यांच्यात प्रमुख लढत होत आहे.

मुंबई आणि कोकण पदवीधर मतदारसंघ तसेच नाशिक व मुंबई शिक्षक मतदारसंघासाठी ही निवडणूक झाली. या चारही ठिकाणी मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडली होती. त्यानंतर सर्वांना उत्सुकता होती ती या निवडणुकीच्या निकालाची, आज निवडणुकीचा निकाल लागणार आहे.

अनिल परब, किरण शेलार, निरंजन डावखरे यांसह अनेक दिग्गज नेत्यांचं भवितव्य मतपेटीत बंद झाले होते, त्याचा फैसला आता होणार आहे. विधान परिषदेच्या दोन शिक्षक व दोन पदवीधर अशा एकूण 4 जागांची मुदत 7 जुलै 2024 रोजी संपणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT