Raju Shetti: राजू शेट्टींची 'स्वाभिमानी' विधानसभेच्या 35 जागा लढणार

Swabhimani Shetkar Sangathan will Contest 35 Seats Legislative Assembly :आगामी विधानसभा निवडणुकीत आम्ही 30 ते 35 जागा लढू शकतो. परंतु त्या कुठून लढवायच्या याबाबत आमचा अजून निर्णय झाला नाही.
Raju Shetti
Raju ShettiSarkarnama

Maharashtra Vidhan Sabha Election : लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीचे वेध लागले असून महायुती आणि महाविकास आघाडीत जागा वाटपाच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. घटकपक्ष असणाऱ्या लहान पक्षांनीही किती जागा लढायच्या याबाबत चाचपणी सुरु केली आहे.

"आगामी विधानसभा निवडणुकीत आम्ही 30 ते 35 जागा लढू शकतो. परंतु त्या कुठून लढवायच्या याबाबत आमचा अजून निर्णय झाला नाही," असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी (Raju Shetti) म्हणाले.

शक्तिपीठ महामार्गाची चर्चा विधीमंडळात झाली. या मागणीवरून शनिवारी (ता.२९) अधिवेशनाचा तिसरा दिवस गाजला. शक्तिपीठ महामार्गात २७००० एकर जमीन जाणार असून पर्यारी मार्ग असताना कोणासाठी प्रकल्प राबवला जात आहे? फक्त २० दिवसात अधिकाऱ्यांनी माहिती काढली आणि घाई घाईत अधिसूचना काढण्यात आली.

"शक्तिपीठ महामार्गाची मागणी कोणीही केलेली नाही, कोल्हापूर -नागपूर या महामार्गाला हा समांतर महामार्ग आहे. मग या महामार्गाची गरज काय असा सवाल राजू शेट्टी यांनी उपस्थित केला आहे.

Raju Shetti
Gautam Kakade: बारामतीतील निंबाळकर खून प्रकरणी फरार आरोपी गौतम काकडे याला अटक

समृद्धी महामार्गाला जो मोबदला मिळाला त्याच्या केवळ 40 टक्के मोबदला मिळणार आहे. सभागृहात चर्चा झाली. परंतु चर्चा ताकतीने व्हायला पाहिजे होती ती झाली नाही. माझा सर्व पक्षीय नेत्याच्या भूमिकेवर संशय आहे, असे राजू शेट्टी म्हणाले.

नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाला विदर्भ, कोकण तसेच सांगलीसह कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे. तर महामार्गामुळे शेतकरी भूमिहीन होण्याची शक्यता असल्यानेच विरोधकही आंदोलनात उरतले आहेत. त्यामुळे शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्यात यावा, अशी मागणी राज्यातील शेतकरी करत आहे.

आधीच महायुतीमधील प्रमुख घटक पक्ष असणाऱ्या भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये विधानसभेच्या जागांवरून रस्सीखेच सुरू असताना, आता रासपच्या महादेव जानकरांकडून विधानसभेच्या 50 जागांची मागणी महायुतीकडे केली आहे. जानकरांनी केल्या या मागणीमुळे महायुतीचं टेन्शन वाढणार असल्याचं बोललं जात आहे.

Raju Shetti
Vidhan Sabha Monsoon Session Live: पेपरफुटीवरुन विरोधक-सत्ताधारी यांच्यात खडाजंगी; अधिवेशनात कायदा आणणार का?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com