Konkan Shaktipith Highway : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रिम प्रोजेक्ट असलेला शक्तिपीठ महामार्गावरून अनेक ठिकाणीवरून वाद उफाळत असतानाच, कोकणातील सिंधुदुर्ग इथल्या स्थानिक लोकप्रतिनिधींनी आणि पर्यावरण प्रेमींनी विरोध दर्शवला आहे. शक्तिपीठ महामार्गाच्या नव्या आराखड्यानुसार आता, 13 गावांऐवजी काही गावं वगळून महामार्गाचा मार्ग बदलण्यात आला आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग आणि सावंतवाडी तालुक्यातून, या महामार्गाचा प्रवास असणार आहे. या नव्या आराखड्याला विरोध दर्शवणारे पत्र दीपक केसरकर यांनी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवून विरोध दर्शवला आहे.
नागपूर ते गोवा या दोन शहरांना जोडणारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा, महत्त्वाकांक्षी शक्तिपीठ महामार्ग सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. शक्तिपीठ महामार्गाच्या नव्या आराखड्यानुसार आता, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग आणि सावंतवाडी तालुक्यातील 13 गावांऐवजी काही गावं वगळून महामार्गाचा मार्ग बदलण्यात आला आहे.
दीपक केसरकर यांनी, मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांना पत्र लिहून, सध्या जो मार्ग ठरवलेला आहे, तो कोकणावर (Konkan) अन्याय करणारा आहे. नागपूर वरून येणारा प्रवासी, तो जर गोव्याला जात असेल, तर कोकणावर हा अन्याय आहे, अशी भूमिका दीपक केसरकर यांनी पत्राद्वारे मांडली आहे.
कोकणामध्ये समुद्रकिनारा आहे, उत्कृष्ट बंदर आहेत, महाराष्ट्राचा माल गोव्याच्या बंदरावर का एक्स्पोर्ट व्हावा? म्हणून शक्तिपीठ महामार्ग आजरा इथून, रेडी बंदरला जोडला गेला पाहिजे, अशी मागणी आमदार केसरकर यांनी पत्राद्वारे केली आहे.
शक्तिपीठ महामार्गाचा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कुठलाही फायदा होणार नाही. उलट शक्तिपीठ महामार्गामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटन आणि व्यापारी दृष्टिकोनाला मोठे नुकसान होणार असल्याचे मत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनापक्षाचे माजी आमदार वैभव नाईक यांनी व्यक्त केले आहे.
दरम्यान, शक्तिपीठ महामार्ग हा केवळ रस्ता नसून कोकणच्या सर्वांगीण विकासाचा 'विकास मार्ग' ठरणारा आहे. या महामार्गाच्या मूळ आराखड्यात काही बदल सुचवण्यात आले असून, स्थानिक गावे आणि बाजारपेठांना बाधा पोहोचणार नाही, याची विशेष काळजी घेतली जाणार असल्याची प्रतिक्रिया भाजपचे पालकमंत्री नीतेश राणे यांनी म्हटलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.