Kudal Nagarpanchayat Sarkarnama
कोकण

Konkan News : राणेंच्या बालेकिल्ल्यात महाविकास आघाडीचा नगराध्यक्ष

सरकारनामा ब्यूरो

Kudal Nagarpanchayat Mayor : भाजप नेते, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा बालेकिल्ला असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ नगरपंचायतीवर महाविकास आघाडीचा नगराध्यक्ष झाला आहे. दरम्यान भाजपच्या वतीने कोणतीही हालचाल केली नाही. त्यामुळे येथील नगराध्यक्ष बिनविरोध झाल्याने राजकीय वर्तुळातून भूवया उंचावल्या गेल्या.

कुडाळ (Kudal) नगरपंचायतीमध्ये नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीची बैठक शुक्रवारी (ता. १६) पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी ऐश्वर्या काळुसे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. यावेळी नगराध्यक्षपदासाठी महाविकास आघाडीच्या नगरसेविका अक्षता खटावकर यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाला होता. निर्णय अधिकारी काळुसे यांनी खटावकर यांची बिनविरोध निवड जाहीर केली. यावेळी उपस्थित काँग्रेस-शिवसेना पदाधिकारी व लोकप्रतिनिधींनी खटावकर यांना शुभेच्छा दिल्या. (Latest Marathi News)

कुडाळ नगरपंचायतीवर महाविकास आघाडीची (MVA) सत्ता आहे. महाविकास आघाडीत ठरल्याप्रमाणे घटक पक्ष काँग्रेस पक्षाच्या आफ्रिन करोल यांनी १४ मे रोजी नगराध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर काँग्रेसच्या नगरसेविका खटावकर यांनी नगराध्यक्षपदासाठी महाविकास आघाडीकडून १२ जूनला एकमेव उमेदवारी अर्ज दाखल केला. विरोधी पक्ष भाजपाने मात्र या निवडणुकीत कोणतीच हालचाल केली नाही.

एकमेव उमेदवारी अर्ज दाखल असल्याने निवडणूक निर्णय अधिकारी काळुसे यांनी खटावकर यांची नगराध्यक्षपदी निवड जाहीर केली. यावेळी यावेळी उपनगराध्यक्ष मंदार शिरसाट, मुख्य कार्यकारी अधिकारी अरविंद नातू, अधीक्षक गितांजली नाईक, काँग्रेस जिल्हाध्यक्ष इर्षाद शेख, तालुकाध्यक्ष अभय शिरसाट, जिल्हा बँक संचालक विद्याप्रसाद बांदेकर, प्रकाश जैतापकर, माजी नगराध्यक्ष आफ्रिन करोल, श्रेया गवंडे, श्रुती वर्दम, ज्योती दळवी, सई काळप, उदय मांजरेकर, द्वारकानाथ घुर्ये, संतोष शिरसाट, अतुल बंगे, बबन बोभाटे, सुंदर सावंत आदी उपस्थित होते.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT