Sharad Pawar News : गुलाबरावांसह प्रवास अन् शरद पवारांची मिश्किल टिपण्णी; काय झाली चर्चा ?

Gulabrao Patil Travel with Sharad Pawar : एकत्रित प्रवासामुळे आनंद वाटला
Sharad Pawar
Sharad PawarSarkarnama
Published on
Updated on

Discussion Between Sharad Pawar And Gulabrao Patil : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिंदे गटाचे नेते व मंत्री गुलाबराव पाटील या दोन्ही नेत्यांनी रेल्वेच्या एकाच डब्यातून प्रवास केला. त्यांच्या या प्रवासामुळे राजकीय वर्तुळात सर्वांच्याच भुवया उंचावल्या. सध्या अनेक कारणांमुळे राज्यातील राजकारणाला वेगळे वळण लागत आहे. त्या पार्श्वभूमीवर पवार आणि गुलाबराव पाटील यांच्यात नेमकी काय चर्चा झाली, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Marathi Latest News)

मागील वर्षी जून महिन्यात शिवसेनेत (Shivsena) झालेल्या बंडखोरीदरम्यान आमदारांनी महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादीकडून निधीवाटपात भेदभाव व पक्ष संपविण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा आरोप केला होता. याचवरुन एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंडाचं निशाण फडकवलं होतं. त्यानंतर आता बंडखोर आमदार व मंत्री गुलाबराव पाटील यांनी थेट पवारांसोबतच एकत्र मुंबई ते जळगाव प्रवास केला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना जोर धरु लागल्या आहेत.

Sharad Pawar
Ganesh Sugar Factory: 'गणेश'च्या निवडणुकीत स्नेहलता कोल्हे शेवटच्या टप्प्यात मैदानात; मतदार कुणाला कौल देणार?

पवार व मंत्री पाटील या दोघांमध्ये राजकीय विषयांसह जळगाव जिल्ह्यातील विकास कामांवर चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहेत. दरम्यान, या प्रवासात काय चर्चा झाली याबाबत खुद्द शरद पवार यांनीच माहिती दिली. तसेच पाटलांबरोबर प्रवास करताना आनंद झाल्याचे पवारांनी यावेळी सांगितले.

या प्रवासाकडे राज्यातील जनता राजकीय दृष्टीकोनातून पाहत आहे. तुमच्यात काय चर्चा झाली, असे विचारले असता पवार म्हणाले, "संबंध राज्याचे, देशाचे विचारधारा आणि विचारविनिमय करायला गुलाबरावांकडे जायला पाहिजे, हे मला आजपर्यंत माहिती नव्हते."

दरम्यान, पवारासोबत प्रवास करून आनंद झाल्याचे गुलाबराव पाटलांनी सांगितले होते. त्यावर पवार म्हणाले, "मलाही त्यांच्याबरोबर प्रवास करून आनंद वाटला. मी एकटाच पुस्तक वाचत प्रवास करत होतो. त्यावेळी ते तेथे आले. त्यानंतर आमच्यात गप्पा गोष्टी सुरू झाल्या. त्यांनी राज्यात काय, कसं चालले आहे, याबाबत ते सांगत होते. मीही त्यांना पाण्याच्या योजनांबाबत काही प्रश्न विचारले."

Sharad Pawar
Ramdas Athawale News : वाद करण्यात अन् मिटवण्यात आम्ही पटाईत; शिवसेना-भाजप वादावर आठवलेंची मिश्किल टिपण्णी

सध्या राज्यात जाहिरातीवरून शिवसेना आणि भाजपमध्ये वाद सुरू आहे. यावरून काही चर्चा झाली का, असे पवारांना विचारण्यात आले. त्यावेळी पवार म्हणाले, "हा विषय मी काढला नाही. त्यामुळे त्यावर काहीही चर्चा झालेली नाही." पवारांनी दिलेल्या माहितीमुळे या प्रवासाबाबत सुरू झालेल्या अनेक चर्चाना आता पूर्णविराम मिळेल.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com