Owais Pechkar, Konkan Pradeshik Paksha Sarkarnama
कोकण

Loksabha Election 2024 : मुंबई, कोकणच्या मैदानात 'कोकण प्रादेशिक पक्ष', 12 जागांवर निवडणूक लढवणार

Konkan Pradeshik Paksha : अॅड. ओवेस पेचकर यांनी पक्षाची स्थापना केली असून केद्रीय निवडणूक आयोगाकडे नोंदणी केली आहे. 5 मार्चपर्यंत त्यांना आयोगाकडून निवडणूक चिन्ह मिळण्याची शक्यता आहे.

सरकारनामा ब्यूरो

Ratnagiri Political News :

कोकणातून एक मोठी बातमी आहे. कोकणच्या भूमीत 'कोकण प्रादेशिक पक्षा'ची स्थापन करण्यात आली असून या पक्षाने निवडणूक चिन्हासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र लिहिलं आहे. या संदर्भात कोकण प्रादेशिक पक्षाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पक्षांची नोंदणी केली आहे. आणि पक्षाला चिन्हा देण्यासंदर्भात केंद्रीय निवडणूक आयोग 5 मार्चपर्यंत निर्णय घेणार आहे. विशेष म्हणजे त्यानंतर कोकण प्रादेशिक पक्ष लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील अॅड. ओवेस पेचकर (Owais Pechkar) यांनी कोकण प्रादेशिक पक्षाची स्थापना केली आहे. पक्षाची अधिकृत नोंदणी झाली असून 5 मार्चपूर्वी पक्षाला चिन्ह मिळण्याची शक्यता आहे, अशी माहिती अॅड. पेचेकर यांनी दिली आहे.

कोकण प्रादेशिक पक्ष मुंबईसह कोकणातील एकूण 12 लोकसभेच्या जागा लढवणार असल्याची प्राथमिक माहिती आहे. स्थानिक पक्ष असल्याने कोकण प्रादेशिक पक्षाला बळ मिळेल आणि लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election) ठाकरे गट, भाजप तसेच कोकण प्रादेक्षिक पक्ष (Konkan Pradeshik Paksha) यांच्यात तिरंगी लढत होऊ शकेल, अशीही चर्चा सुरू झाली आहे.

काही दिवसांपूर्वी अॅड. ओवेस पेचकर यांनी कोकण प्रादेशिक पक्षाची घोषणा करतानाच लोकसभेच्या पहिल्या उमेदवाराची घोषणा केली होती. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून उद्योजक शकील सावंत (Shakil Sawant) यांच्या नावाची घोषणा पेचकर यांनी केली होती.

कोण आहेत अॅड.पेचकर?

ओवेस पेचकर हे व्यवसायाने वकील आहे. ते मूळचे रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूणचे आहेत. रखडलेल्या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाबाबत त्यांनी यापूर्वी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती. तसेच अनेक सामाजिक प्रश्नांवर त्यांनी आवाज उठवला आहे.

पक्षाचा अजेंडा

कोकणात उद्योग, रोजगार उपलब्ध करणे, शेती तसेच बागायतीवर प्रक्रिया उद्योग असा कोकण प्रादेशिक पक्षाचा अजेंडा आहे, अशी माहिती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष अॅड.ओवेस पेचकर यांनी दिली आहे

अॅड.पेचकर यांनी निवडणूक आयोगाला चिन्हासाठी तीन पर्याय दिले आहेत. त्यातील कोणते चिन्ह त्यांना मिळणार हे 5 मार्चपर्यंत स्पष्ट होईल. मुंबईतीस सहा, शिवाय रत्नागिरी-सिंधुदुर्ग, रायगड आणि मावळची जागाही कोकण प्रादेशिक पक्ष लढवणार आहे.

(Edtied by Avinash Chandane)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT