Narayan Rane : लोकसभा लढविण्याबाबत नारायण राणेंचे मोठे विधान; म्हणाले, ‘कोणाला सांगायचे ते सांगा...’

Konkan News : त्याचं तुम्हाला काही नावीन्य नाही आणि नारायण राणे काय उभा राहिला, तर सगळ्यांनाच कळणार आहे.
Narayan Rane
Narayan RaneSarkarnama
Published on
Updated on

Sindhudurg News : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांचे नाव चर्चेत असतानाच राज्यसभा निवडणुकीपासून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या उमेदवारीची चर्चा रंगली आहे. मात्र, लोकसभा निवडणुकीसंदर्भात आता केंद्रीय मंत्री राणे यांनीच भाष्य केले आहे. (Loksabha Election 2024)

न्यायालयीन इमारतीचे भूमिपूजन आणि अन्य कार्यक्रमांसाठी केंद्रीय मंत्री राणे हे सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आहेत. त्यावेळी माध्यमांशी संवाद साधताना राणे यांनी लोकसभा निवडणूक लढविण्याबाबत भाष्य केले. नारायण राणे म्हणाले, सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभा उमेदवारीबाबत माझी अजून कोणाशीही चर्चा झालेली नाही. निवडणूक लढविण्याबाबत माझा निर्णय अजून झालेला नाही. माझ्या पक्षाच्या वरिष्ठांशी चर्चा केल्यानंतर निर्णय घेईन. (Narayan Rane News)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Narayan Rane
Baramati Loksabha : बारामतीत एकेका मताची बेरीज सुरू; शरद पवारांनंतर सुनेत्रा पवारांनीही घेतली पृथ्वीराज जाचकांची भेट

माझ्या उमेदवारीच्या संदर्भात तुम्हाला मिळालेली माहिती किती खरी आहे, ते तुम्ही एकदा तपासून पाहा. हा असला विषय असता तर मी थांबलोच नसतो. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ न्यायालयाची 145 वर्षांपूर्वी झालेली इमारत आता नव्याने पुन्हा उभी करण्यात येत आहे. त्याचं तुम्हाला काही नावीन्य नाही आणि नारायण राणे काय उभा राहिला, तर सगळ्यांनाच कळणार आहे. देशात कळेल. कोणाला सांगायचं तर सांगून टाका, अशी उद्‌विग्न प्रतिक्रिया नारायण राणे यांनी दिली.

मी असल्या कुत्र्या-मांजरांना घाबरत नाही. मला आयुष्यात आजवर सगळं मिळालं आहे आणि म्हणून मी निवडणूक लढवणार नाही, असं म्हटलं होतं, असंही राणे यांनी स्पष्ट केले. खासदार विनायक राऊत सारखं काय आहे, कुठेही लोंबकळत राहायचं का, असा सवालही राणे यांनी केला.

सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभा मतदारसंघ युतीमध्ये शिवसेनेच्या वाट्याला गेलेला आहे. त्यामुळे सुरुवातीपासून उद्योगमंत्र्यांचे बंधू किरण सामंत यांचे नाव चर्चेत होते. सामंत यांनीही लोकसभा निवडणूक लढविण्याचे संकेत दिलेले आहेत. मात्र, राज्यसभा निवडणुकीत नारायण राणे यांचा पत्ता कट झाल्यापासून सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभा मतदारसंघासाठी त्यांचेही नाव चर्चेत आले आहे.

Narayan Rane
NCP News : शरद पवारांच्या विश्वासू आमदाराने घेतली अजितदादांची भेट...राजकीय चर्चांना उधाण!

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी राणे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. ती भेट लोकसभा निवडणूक लढविण्याच्या संदर्भातच होती, अशी चर्चा आहे. राणे लोकसभा लढणार का आणि लढणार असतील तर कोणत्या मतदारसंघातून याची उत्सुकता आहे. त्यातच आज त्यांनी आपण लोकसभा निवडणुका लढविण्याबाबत अजून ठरविलेले नाही, असे स्पष्ट केले.

R

Narayan Rane
Loksabha Election 2024 : ‘तुताऱ्या वाजवा नाही; तर मशाली पेटवा...महायुती ४५ पेक्षा जास्त जागा जिंकणार’

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com