Mahad Election Clash, Minister Bharat Gogawale Son Vikas Gogawale  sarkarnama
कोकण

Mahad Election Clash : महाडमध्ये हिंसाचार! ५१ दिवस बेपत्ता असलेला गोगावलेंसह जगतापांना न्यायालयाचा दणका, शिवसेना-राष्ट्रवादी कार्यकर्त्यांवरही कारवाई

Mahad Election Clash Minister Bharat Gogawale Son Vikas Police custody : नगरपालिका निवडणुकीतील राड्यानंतर ५१ दिवस पसार झालेले विकास गोगावले उच्च न्यायालायच्या कठोर शब्दांत ओढलेल्या ताशेरेनंतर शुक्रवारी (ता.२३) पोलिसांना शरण गेले.

Aslam Shanedivan

  1. महाड नगरपरिषद निवडणुकीदरम्यान शिवसेना आणि राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या मारामारी प्रकरणात एकूण 18 जणांना महाड न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली.

  2. शिवसेना नेते भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले 50 दिवसांपेक्षा अधिक काळ बेपत्ता होते, ते या प्रकरणात आरोपी म्हणून समोर आले.

  3. न्यायालयाने सर्व आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी देत तपासाला वेग देण्याचे आदेश दिले.

Mahad election violence News : महाड नगरपालिकेच्या निवडणुकीदरम्यान झालेल्या राडा प्रकरणात मुबई उच्च न्यायालायने राज्य सरकारवर कठोर शब्दांत ताशेरे ओढले होते. तसेच पोलिसांची देखील न्यायालायने झाडाझडती घेतली होती. ज्यानंतर शुक्रवारी (ता.२३) मोठ्या घडामोडी झाल्या. या प्रकरणात विकास गोगावले यांच्यासह शिवसेनेचे आठ संशयित आरोपी पोलिसांना शरण गेले. त्यानंतर पाच तासांच्या अंतराने राष्ट्रवादी काँग्रेसचे हनुमंत जगताप यांसह एकूण पाच संशयित आरोपीही महाड तालुका पोलीस ठाण्यात हजर झाले. या सर्वांची वेद्यकीय चाचणी केल्यानंतर महाड न्यायालयात हजर केले असताना शिवसेना-राष्ट्रवादी कार्यकर्त्यांवर कारवाई करत विकास गोगावले यांच्यासह राष्ट्रवादीचे जगताप यांच्याबाबत आदेश देत त्यांना दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. यामुळे सुमारे ५१ दिवसापांसून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या संशयित आरोपींची रवानगी आता पोलिस कोठडीत झाली आहे.

रायगड जिल्ह्यातील महाड नगरपालिका निवडणुकीवेळी (२ डिसेंबर 2025) एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीत तुंबळ राडा झाला होता. या राड्यावेळी मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांच्यावर राष्ट्रवादीचे सुशांत जाभरे यांच्या संरक्षकाकडून बंदूक ताणण्यात आली.

ज्यानंतर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर हल्लाकरत त्यांच्या वाहनांची तोडफोड केली होती. गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले आणि पुतणे महेश गोगावले, तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते श्रीयांश जगताप आणि इतर काही कार्यकर्त्यांवर परस्परविरोधी तक्रारींनुसार गुन्हे दाखल करण्यात आले होते. ज्यानंतर तब्बत ५१ दिवस विकास गोगावले हे पसार होते.

यादरम्यान उच्च न्यायालयाने यासंदर्भात राज्य सरकारवर कडक शब्दात ताशेरे ओढले होते. न्यायालयाने, मंत्र्यांचे पसार असलेले पुत्र, गुन्हा करून मोकाट फिरतात, मंत्र्यांच्या संपर्कात राहातात. मात्र पोलिसांना का सापड नाहीत? राज्यात कायदा-सुव्यवस्था आहे की, नाही? मुख्यमंत्री या प्रश्नी गप्प का? हे एवढे हतबल झाले आहेत की, ते आपल्याच मंत्र्यांविरोधात बोलू शकत नाहीत?अशा शब्दात न्यायालयाने सरकारला सुनावले होतं.

ज्यानंतर विकास गोगावले शुक्रवारी (ता.२३) सकाळी कोणालाही खबर लागून न देता महाड पोलिसांसमोर मागच्या दाराने हजर झाले. महाड पोलिसांनी विकास गोगावले याला न्यायालयात हजर करण्याच्या हालचाली सुरू केल्या असतानाच अंतराने राष्ट्रवादी काँग्रेसचे हनुमंत जगताप यांसह एकूण पाच संशयित आरोपीही महाड तालुका पोलीस ठाण्यात हजर झाले. या प्रकरणात उच्च न्यायालयाचे विकास गोगावले यांना पोलिसांना शरण जाण्याचा आदेश दिला होता.

तसेच विकास गोगावले त्याच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी होईल असे सांगितले होते. त्या प्रमाणे विकास गोगावले यांना न्यायालय दिसाला देणार का? त्याचा अटकपूर्व जामीन मंजूर करणार का? याकडे लक्ष लागलं असतानाच न्यायालयाने मंत्री भरत गोगावलेंसह विकास गोगावले आणि शिवसेना-राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना पोलिस कोठडी सुनावत दणका दिला आहे.

महाड नगरपालिकेच्या निवडणुकीदरम्यान शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या राडा प्रकरणात मंत्री भरत गोगावले यांचे सुपुत्र विकास गोगावले अखेर जवळपास दोन महिन्यांच्या अंतराने महाड पोलीस ठाण्यात हजर झाल्याने ते फरार झाल्यापासून कोठे होते, ते कोणाच्या संपर्कात होते, काय करत होते, त्यांना कोण मदत करत होते यावर आता पडदा उठणार आहे. तर आगामी काळात विकास गोगावले यांच्या अडचणी वाढणार असून मंत्री भरत गोगावले यांच्यांही राजकीय अडचणी वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

FAQs :

1) महाड हिंसाचार प्रकरण काय आहे?
👉 महाड नगरपरिषद निवडणुकीदरम्यान मतदान केंद्राबाहेर शिवसेना आणि राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या मारामारीचे हे प्रकरण आहे.

2) या प्रकरणात किती जणांना अटक झाली?
👉 शिवसेनेचे 8 आणि राष्ट्रवादीचे 5 असे एकूण 13 जणांना महाड न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली.

3) विकास गोगावले किती दिवस बेपत्ता होते?
👉 विकास गोगावले 50 दिवसांपेक्षा अधिक काळ बेपत्ता होते.

4) न्यायालयाने काय आदेश दिला?
👉 महाड न्यायालयाने आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

5) या प्रकरणाचा राजकारणावर काय परिणाम होऊ शकतो?
👉 या घटनेमुळे महाड आणि रायगड जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT