Police officials inspect the Mahad polling booth area where Shiv Sena and NCP supporters clashed, leading to FIRs against Minister Bharat Gogawale’s son and over 20 party workers. Sarkarnama
कोकण

Mahad Politics : मतदानादिवशीचा राडा भोवला : शिवसेना मंत्र्याच्या मुलावर गुन्हा दाखल

Mahad Election Clash : महाडमध्ये मतदानादिवशी शिवसेना आणि राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या हाणामारीत मंत्र्यांच्या मुलासह दोन्ही गटातील 20 पेक्षा अधिक जणांवर गंभीर गुन्हे दाखल झाले असून दोन्ही बाजूंनी परस्पर तक्रारी नोंदवल्या आहेत.

सरकारनामा ब्यूरो

Mahad Election violence News : महाड : नवेनगर येथील मतदान केंद्राबाहेर मंगळवारी (ता. 2) राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या हाणामारीप्रकरणी मंत्री भरत गोगावले यांचा मुलगा विकास गोगावले, राष्ट्रवादी काँग्रेसचे सुशांत जाबरे यांच्यासह दोन्ही पक्षातील सुमारे २० हून अधिक जणांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले आहेत. याप्रकरणी दोन्ही गटांकडून परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.

प्रभाग क्रमांक दोनच्या मतदान केंद्रामध्ये मतदान प्रक्रिया सुरू होती. याचदरम्यान विकास गोगावले व सुशांत जाबरे या दोन्ही पक्षांच्या समर्थकांमध्ये तुफान हाणामारी झाली. याबाबत सुशांत जाबरे यांच्या तक्रारीनुसार मतदान केंद्राबाहेर पाहणी करून ते परतत असताना विकास गोगावले, महेश गोगावले यांच्यासह काही व्यक्तींनी त्यांची गाडी अडवून झोपरे यांना दमदाटी व मारहाण केली.

तसेच बॉडीगार्ड गोपाल सिंग यांनाही मारहाण करून त्यांच्याकडे रिव्हाल्व्हर हिसकावून ठार मारण्याची धमकी देण्यात आली. याशिवाय गाडीचा चालक, तसेच व्यंकट मंडला व मनजीत सिंग यांनाही बेदम मारहाण करण्यात आली. आपल्या अंगावरील सोन्याची चेन व गाडीतील चार मोबाईल लंपास करण्यात आले. सुशांत जाबरे यांच्या तक्रारीनुसार या आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दमदाटी व मारहाण :

याबाबत महेश गोगावले यांनीही विरुद्ध तक्रार दाखल केली आहे. निवासस्थानी परतत असताना आपल्याला व कार्यकर्त्यांना रस्त्यात अडवून दमदाटी व मारहाण केली. गोपाल सिंग यांनी आमच्यावर रिव्हाल्व्हर रोखून ठार मारण्याची धमकी दिली. याशिवाय या ठिकाणी असलेल्या समर्थकांनी काठी व हॉकी स्टिकसह आमच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला.

या प्रकरणात आपल्याजवळ असणारी अडीच लाखांची चेनदेखील चोरीला गेली आहे, अशी तक्रार दाखल करण्यात आली आहे. गोगावले यांच्या तक्रारीनुसार सुशांत जाबरे, हनुमंत जगताप, श्रीयश जगताप, अमित शिगवण, व्यंकट मंडला, यांच्यासह 8 ते 10 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT