

महाड नगरपरिषद मतमोजणीदरम्यान गोगावले आणि सुशांत जाबरे यांच्या समर्थकांमध्ये तुफान बाचाबाची आणि हाणामारी झाली.
दगडफेक, वाहनांच्या काचा फोडणे आणि मारामारीमुळे परिस्थिती हाताबाहेर गेली.
जाबरे समर्थकांनी गोगावले यांना रिव्हॉल्व्हर दाखवल्याचा आरोप असून गोगावले स्वतः रिव्हॉल्व्हर घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचले आहेत.
Raigad Politics : राज्यातील 264 नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी आज (मंगळवारी, ता 2) मतदान होत असून रायगड जिल्ह्यातील एकूण 10 नगरपालिकांचा समावेश आहे. दरम्यान सकाळी 11 पर्यंत 10.07 टक्के मतदान झाले आहे. पण याच वेळी महाड नगरपरिषदेच्या मतदानादरम्यान शिवसेना आणि भाजप समर्थकांमध्ये तुफान राडा झाल्याचे दिसत आहे. या राड्यात तुफान हाणामारी झाली असून अनेक गाड्यांची तोडफोड करण्यात आली आहे. तर भरत गोगावले यांच्या मुलगा विकास गोगावलेंवर रिव्हॉल्व्हर रोखण्यात आली असून राष्ट्रवादीचे सुशांत जाबरेंना जबर मारहाण करण्यात आली आहे.
तब्बल आठ ते दहा वर्षांनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडत असून जिल्ह्यातील 10 नगरपालिकांसाठी येथे चुरस पाहायला मिळत आहे. उमेदवार, कार्यकर्ते आणि मतदारांची मतदानाबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली असून निवडणुका जिंकण्यासाठी राजकीय पक्षांनीही कंबर कसली आहे. शासकीय यंत्रणाही याकडे सर्वांचे लक्ष ठेवून असून मतदान केंद्रांवर पोलिसांमार्फत पुरेशा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
दरम्यान जिल्ह्यातील महाड नगरपरिषदेच्या मतदानावेळी शिंदेंची शिवसेना आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमने-सामने आले. मंत्री गोगावले आणि राष्ट्रवादीचे पदाधिकारी सुशांत जाबरे यांच्या समर्थकांमध्ये बाचाबाची झाली. या वादाचेनंतर रूपांतरनंतर तुफान हाणामारी झाले आहे. यामध्ये जाबरे आणि त्यांच्या अंगरक्षकाला भरत गोगावले यांच्या समर्थकांनी जबर मारहान केली असून जाबरे यांच्या समर्थकांच्या अनेक गाड्या फोडण्यात आल्या आहेत. यामुळे महाडमध्ये तणावपूर्ण स्थिती असून पोलिसांनी धाव घेत परिस्थिती शांत केली आहे.
याबाबात मिळालेली माहिती अशी की, सध्या राष्ट्रवादीत असणारे सुशांत जाबरे यांनी निवडणुकीपूर्वी शिंदेंच्या शिवसेनेला सोडचिठ्ठी दिली होती. यादरम्यान आज मतदानावेळी अनेक ठिकाणी ईव्हीएम बंद पडल्याच्या तक्रारी येत होत्या. यावेळी महाडच्या नवे नगर परिसर गोगावले आणि जाबरे यांचे समर्थक जमले होते. येथेच दोन्ही गटांमध्ये बाचाबाची होऊन तुफान हाणामारीला सुरुवात झाली.
गोगावलेंच्या समर्थकांनी दगडफेक करत जाबरे यांच्या समर्थकांच्या गाड्यांच्या काचा फोडल्या यावेळी जाबरे यांच्या समर्थकांनी विकास गोगावले यांना रिव्हॉल्व्हर दाखवले. ज्यानंतर गोगावलेंच्या समर्थकांनी जाबरेंसह अंगरक्षकाला मारहान केली. तर हे रिव्हॉल्व्हर काढून घेत पोलीस ठाण्यात जमा केले. तर आता पोलिस याबाबतीत कोणती कारवाई करतात हे पाहावं लागेल.
राज्यात महायुतीचे सरकार असतानाही रायगडच्या पालकमंत्रीपदाचा वाद काही सुटलेला नाही. येथे भरत गोगावले आणि सुनील तटकरे यांच्यात सातत्याने वाद सुरु असून आता तर नेत्यांचा वाद कार्यकर्त्यांच्या जीवावर बेतला आहे. तर येथे सुरू असणाऱ्या फोडाफोडीसह कुरघोडीच्या राजकारणामुळे सुनील तटकरे आणि भरत गोगावले यांच्यातील वैर आणखीनच वाढले आहे. याचाच उद्रेक आज झाला असून महायुतीतील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. यावादामुळे येथील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
FAQs :
1. महाडमध्ये वाद का झाला?
ईव्हीएम बंद पडल्याने आणि मतमोजणी प्रक्रियेत अडथळे आल्याने समर्थक संतापले आणि वाद चिघळला.
2. वादात कोणते गट सहभागी होते?
विकास गोगावले आणि सुशांत जाबरे यांच्या समर्थकांमध्ये संघर्ष झाला.
3. दगडफेक झाली का?
होय, गोगावले समर्थकांनी जाबरे समर्थकांच्या गाड्यांवर दगडफेक केल्याची माहिती आहे.
4. रिव्हॉल्व्हर प्रकरण काय आहे?
जाबरे समर्थकांनी गोगावले यांना रिव्हॉल्व्हर दाखवल्याचा आरोप असून गोगावले पोलीस ठाण्यात तक्रार घेऊन गेले आहेत.
5. पोलीस काय कारवाई करणार?
पोलीस सीसीटीव्ही, साक्षीदार आणि तक्रारींच्या आधारे पुढील कारवाई करतील.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.