Mahadev Jankar, Yogi Adityanath sarkarnama
कोकण

Kokan News : महादेव जानकर योगींच्या राज्यातून लोकसभा लढणार; भाजप, सेनेकडून सापत्न वागणूक

Mahadev Jankar सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आलेले जानकर यांच्या प्रमुख उपस्थितीत कुडाळ येथे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा येथील मराठा समाज सभागृहात झाला.

Umesh Bambare-Patil

Kokan News : भाजप आणि ठाकरे शिवसेना या पक्षांसोबत युती केली; पण पक्षाला सापत्न वागणूक मिळाली. राष्ट्रीय समाज पक्ष देशातही सक्रिय असून बेंगलोर, आसाम, उत्तर प्रदेशातही आमच्या पक्षाने यश मिळविले आहे. आगामी खासदारकीची निवडणूक मी परभणी, माढा, मिर्झापूर (उत्तर प्रदेश) यामधील दोन मतदारसंघांतून लढविणार आहे, असे स्पष्ट मत राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष व माजी मंत्री महादेव जानकर यांनी व्यक्त केले आहे.

सिंधुदुर्ग Sindhudurg जिल्हा दौऱ्यावर आलेले महादेव जानकर Mahadev Jankar यांच्या प्रमुख उपस्थितीत कुडाळ येथे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा मराठा समाज सभागृहात झाला. या मेळाव्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

जानकर म्हणाले, ‘‘मतदारसंघांमध्ये जागृती करण्यासाठी जनस्वराज्य यात्रा सुरू करण्यात येत आहे. फुले, शाहू, आंबेडकर यांची विचारधारा घेऊन पक्ष स्थापन केला. पक्षाला वीस वर्षे पूर्ण होत असून, विसावा वर्धापन दिन सोहळा २९ ऑगस्टला पुणे येथे साजरा करणार आहोत.

महाराष्ट्रात सत्ता कोणाची हेच समजत नाही. येत्या काळात विधानसभेत आमचे २० आमदार जिंकून येतील, असा विश्वास आहे. त्यामुळे महाराष्ट्रात चमत्कार घडेल. महाराष्ट्रातील जनता सत्य जाणते. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत मोठ्या पक्षांचे मनसुबे उधळले जातील. भाजप आणि ठाकरे शिवसेना या पक्षांसोबत युती केली; पण पक्षाला सापत्न वागणूक मिळाली. मोठा मासा छोट्या माणसाला गिळतो, ही भाजप आणि काँग्रेसची पॉलिसी आहे.’’

राष्ट्रीय समाज पक्ष देशातही सक्रिय आहे. बेंगलोर, आसाम, उत्तर प्रदेशातही आमच्या पक्षाने यश मिळविले आहे. आगामी निवडणुकांत मी खासदारकीची निवडणूक परभणी, माढा, मिर्झापूर (उत्तर प्रदेश) यामधील दोन मतदार संघांतून लढविणार आहे, असे जानकर यांनी स्पष्ट केले.

कोकणात प्रभाव कमी

येत्या काळात कोकणातही पक्षाचे काम वाढविणार आहे. कोकणात १५ दिवस दौरा करणार आहे. विदर्भ, मराठवाडा, खानदेशात यश मिळाले आहे; पण कोकणात पक्ष कमी दिसत आहे. पक्षाला कोकणात पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकीत यश नक्कीच मिळेल, असा विश्‍वास जानकर यांनी व्यक्त केला.

सत्ता आमच्याशिवाय बनू शकणार नाही, हे दाखवून देऊ, असा इशारा देऊन जानकर म्हणाले, राज्यातील सर्व विधानसभेत स्वतंत्र उमेदवार उभे करणार असून, महाराष्ट्रात चमत्कार करून दाखवू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT