Ganesh Naik Eknath Shinde Conflict; nilesh rane sarkarnama
कोकण

assembly session : उत्तरं न देणाऱ्या वनखात्याला राणेंनी धू धू धूतल! 'मी ढगातून आकडे...' म्हणत सरकारलाच उघडं पाडलं

nilesh rane chandrashekhar bawankule clash : कोकणातील आणि प्रामुख्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वनावरून शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार निलेश राणे यांनी वनखात्यालावर जोरदार टीका सुरू केली आहे. आज देखील त्यांनी वनसंज्ञावरून वनखात्याला धू धू धूतल.

Aslam Shanedivan

  1. शिंदे गटाचे आमदार निलेश राणे यांनी विधानसभेत वनखात्याच्या कारभारावर जोरदार टीका केली.

  2. वनमंत्री गणेश नाईक हजर असतानाही थेट उत्तर न दिल्याने राणे संतापले.

  3. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी उत्तर दिले, मात्र त्यावर राणेंचे समाधान झाले नाही आणि अधिवेशनात खडाजंगी रंगली.

Sindhudurg News : गेल्या काही दिवसांपासून शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार निलेश राणे गणेश नाईक वनमंत्री असणाऱ्या वन खात्यावर सडकून टीका करताना दिसत आहेत. काहीच दिवसांपूर्वी त्यांनी वनखात्याच्या कारभारावरून विधीमंडळात जोरदार टीका केली होती. तसेच वनखात्याचाच टांगा पल्टी झाल्याचे म्हटले होते. यानंतर आता पुन्हा एकदा त्यांनी अधिवेशनात लक्षवेधी लावत वनखात्याचे वाभाडे काढले आहेत.

यावेळी वनमंत्री गणेश नाईक विधीमंडळात हजर असतानाही उत्तर न दिल्याने ते चांगलेच संतापले. यावेळी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी दिलेल्या उत्तराने त्यांचे समाधान झाले नाही. दरम्यान दोघात झालेल्या खडाजंगी आणि वनखात्याला राणेंनी धू धू धूतल्याने आता चर्चा होताना दिसत आहे.

निलेश राणे यांनी विधी मंडळात आज लक्षवेधी मांडताना कोकणातील नवसंज्ञावरून प्रश्न उपस्थित केला होता. त्यांनी, कोकणाच्या संदर्भात मांडलेला प्रश्नासाठी वापरलेली फिगर आपली असल्याचे आपण आधीच सांगितले होते. पण वन आणि महसूल विभागाकडे कोणतीच माहिती नसताना सुप्रीम कोर्टामध्ये कोणत्या माहितीवर सुनावणी झाली? असा प्रश्न करत संताप व्यक्त केला होता.

तसेच जिल्ह्यात 98 टक्के खासगी वन असताना फक्त 2 टक्के शासनाचे वन असल्याचे सरकार का घोषित करत नाही. आणि योग्य सर्वे करून सरकार शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनी कधी देणार असा सवाल केला होता. तसेच नव खाते माहिती मागूनही ती देत नाही असाही आरोप त्यांनी यावेळी केला होता. तर अधिकारी चुकीची ब्रीफिंग देत असल्यामुळे हा विषय अतिशय गंभीर बनलेला असल्याचाही दावा त्यांनी केला.

सभागृहात निलेश राणे आणि महसूल मंत्रीन बावनकुळे यांच्यात खडाजंगी झाली. यावेळी उत्तर देण्यासाठी उभे राहिलेल्या बावनकुळे यांना निलेश राणेंनी सुनावताच त्यांनी राणेंना ऐकूण घ्या, तुमचा मुद्दा बरोबर असून आम्ही आमची चूक कबूल करतो. पण हा विषय राज्य सरकारच्या असो किंवा या सभागृहाच्या अखत्यारीतला नाही.

हा मुद्दा सुप्रीम कोर्टातला असून आपण तेथे जावू. महसूल आणि वनखाते मिळून नव्या सर्वेक्षणानुसार निर्णय घ्यावा याबाबत विनंती करणार आहोत. यासाठी सरकारची सर्वोच्च न्यायालयात जाण्याची तयारी असून उच्चस्तरीय सरकारी अधिवक्ताची नेमणूक केली जाईल. याच्याआधी या मुद्द्याशी निगडीत आमदार आणि दोन्ही खात्यांची बैठक घेतली जाईल असेही त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान याआधी निलेश राणे यांनी अधिवेशनात कोकणातील मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या जंगलतोडीवरून आणि वनखात्याच्या ढिसाळ कारभारावरून अत्यंत तिखट शब्दांत टीका केली होती. तसेच जे डीओफओ भरलेले आहेत ते सर्व अमराठी असून त्यांना आमच्या मालवणी भाषेतल्या तक्रारी कशा समजणार, किती तक्रारी करायच्या? असे म्हणत संताप व्यक्त केला होता. तर वनमंत्री केवळ टीआरपी मिळवण्यात व्यस्त असून, त्यांच्या कार्यकाळात वनखात्याचा टांगा पलटी झाल्यासारखं वाटतं असा टोला राणेंनी लगावला होता.

FAQs :

1. निलेश राणे यांनी कोणत्या मुद्द्यावर टीका केली?
वनखात्याच्या कारभारावर आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी विधानसभेत टीका केली.

2. गणेश नाईक यांनी उत्तर दिले का?
ते सभागृहात उपस्थित होते, मात्र थेट उत्तर न दिल्याने वाद निर्माण झाला.

3. मग उत्तर कोणी दिले?
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी उत्तर दिले.

4. या वादाचा राजकीय परिणाम काय होऊ शकतो?
वनखात्याच्या कामकाजावर अधिक चर्चा होऊन राजकीय दबाव वाढू शकतो.

5. हा वाद कोणत्या अधिवेशनात झाला?
महाराष्ट्र विधानसभेच्या सुरू असलेल्या अधिवेशनादरम्यान हा वाद घडला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT