Assembly Session : अधिवेशन सुरू असताना नागपूरमध्ये धक्कादायक प्रकार, आमदार खोपडेंनंतर नितीन राऊत यांनाही धमक्या

Maharashtra Politics : नागपूर हिवाळी अधिवेशनादरम्यान भाजप आमदार कृष्णा खोपडे आणि काँग्रेसचे नितीन राऊत यांना धमक्या मिळाल्याने मोठी खळबळ उडाली असून विरोधकांनी सरकारवर सुरक्षा आणि कायदा-सुव्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
Nitin Raut
Nitin RautSarkarnama
Published on
Updated on

Nagpur News : नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरू असताना भाजपचे आमदार कृष्णा खोपडे यांच्या पाठोपाठ उत्तर नागपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार व माजी मंत्री नितीन राऊत यांनाही धमक्या देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. विशेष म्हणजे गुरुवारी राऊत यांच्या लेटरहेडचा गैरवापवर करून अधिवेशनाच्या दोन प्रवेश पासेस वितरित करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला होता. यावरून काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी मुख्यमंत्र्यांच्या शहरातील आमदारच सुरक्षित नसल्याचे सांगून या राज्यात कायदा व सुव्यवस्था शिल्लक आहे का असा सवाल करून गृहमंत्र्यांना टोला लागावला.

नितीन राऊत यांनीची धमक्या दिल्याची माहिती आज विधानसभेच्या कामकाज सुरू असताना सभागृहात दिली. ते म्हणाले, मी सकाळी आपल्या कार्यालयात बसलो होतो. काही बौद्ध भिक्खू यांच्याशी चर्चा करीत असताना काही लोक माझ्या कार्यालयासमोर आले. मोठ्या मोठ्या कर्णकर्कश हॉर्न वाजवले. त्यानंतर एक उंचापुरा व लांब केस असलेला व्यक्ती माझ्याकडे आला. त्याने माझ्या मुलाची चौकशी केली.

कुणाल कुठंय? अशी विचारणा केली व आत्ताच्या आता त्याला माझ्यासमोर आणण्याचा आदेश दिला. तो येत नसेल तर त्याच्या पत्नीच्या कार्यालयात जातो अशी धमकी दिल्याची माहिती नितीन राऊत यांनी सभागृहात दिली. पासेस प्रकरणात चौकशी समितीने आरोपीचे नाव राऊत असल्याने तो तुमचा पुतण्याच असल्याचा दावा केला होता. राऊत नावाचे शेकडो लोक राहातात. ते सर्व माझे नातेवाईक आहेत का असा सवालही नितीन राऊत यांनी केली.

Nitin Raut
Vidhan Bhavan latest updates: उद्धव ठाकरे विधानभवनात दाखल; नागपूरमध्ये पोहचताच उचलले मोठे पाऊल, सत्ताधाऱ्यांची चिंता वाढली

सनदी अधिकारी तुकाराम मुंडे यांचा विषय मांडणारे भाजपचे आमदार कृष्णा खोपडे यांनासुद्धा दोन दिवसांपूर्वी फोनवरून धमक्या देण्यात आल्या होत्या. त्यांनी याकडे मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले. त्यांनी याची चौकशी करण्याचे आश्वासन देऊन सभागृहात निवेदन सादर करण्याचे आश्वासन दिले आहे. यात आता नितीन राऊत यांच्याही प्रकरणाची भर पडली आहे. नाना पटोले यांनी यावरून सरकारला आणि मुख्यमंत्र्यांना घेरण्याचा प्रयत्न केला.

Nitin Raut
Vidhan Bhavan ruckus case : विधानभवन राडा प्रकरणी मोठी बातमी; आव्हाड अन् पडळकरांच्या कार्यकर्त्यांना जोरदार झटका, कारावासासह आवारात येण्यास बंदी...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com