Maharashtra Din 2026 Raigad Flag Hoisting  sarkarnama
कोकण

Maharashtra Din : पालकमंत्री नसल्याने ध्वजारोहण कोणाच्या हस्ते? अखेर प्रशासनाने केली नावाची अधिकृत घोषणा; संधी कोणाला गोगावले की तटकरे?

Maharashtra Din 2026 Flag Hoisting : रायगड जिल्ह्याच्या मुख्यालय असलेल्या अलिबाग येथील शासकीय ध्वजारोहणावरून रायगड जिल्ह्यात पुन्हा एकदा राजकीय वाद चिघळण्याची शक्यता आहे.

Aslam Shanedivan

  1. महाराष्ट्र दिनाच्या ध्वजवंदन कार्यक्रमासाठी सरकारने महत्त्वाचे आदेश जारी केले

  2. आदिती तटकरे यांच्या हस्ते ध्वजवंदन होणार असल्याने राजकीय वाद निर्माण झाला

  3. भरत गोगावले व शिवसेनेत नाराजी असून रायगडमध्ये तणाव वाढण्याची शक्यता

Raigad News : राज्यात एकीकडे विधान परिषदेच्या निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच कोकणात पुन्हा एकदा राजकीय वाद चिघळण्याची शक्यता आहे. विधान परिषदेच्या निवडणुका बिनविरोध झाल्या असतानाच रायगड जिल्ह्यातून महत्त्वाची अपडेट समोर येत आहे. राज्य सरकारकडून महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमानिमित्त काही महत्त्वाचे आदेश काढण्यात आले आहेत. ज्यात ध्वजवंदनाच्या कार्यक्रमाबाबत माहिती देण्यात आली आहे. यावेळी ध्वजवंदन महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते होणार आहे.

अलिबाग येथे महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६७ व्या स्थापना दिनोत्सवानिमित्त (शुक्रवार १ मे २०२६ रोजी) सकाळी ८.०० वाजता मुख्य शासकीय ध्वजवंदन होणार आहे. येथील पोलीस परेड ग्राऊंडवर आदिती तटकरे यांच्या हस्ते ध्वजवंदनाचा कार्यक्रम होणार आहे. तर या मुख्य शासकीय समारंभासाठी सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी केले आहे.

पण आता या कार्यक्रमावरून महायुतीत वाद होण्याची शक्यता आहे. रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा अद्याप तिढा सुटलेला नाही. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यात पालकमंत्री पदावरून वाद समोर आला आहे.

शिवसेनेचे जिल्ह्यात तीन आमदार असल्याने हे पद शिवसेनेला मिळाले, अशी मागणी गोगावलेंसह इतर आमदारांनी केले होते. पण एक आमदार असणाऱ्या राष्ट्रवादीकडे आधी देण्यात आले होते. पण शिवसेनेनं केलेल्या जोरदार राड्यानंतर आदिती तटकरे यांना यावर पाणी सोडावे लागले होते. पण सरकार आल्यानंतर त्यांना प्रजासत्ताक दिन व स्वातंत्र्य दिनी ध्वजवंदनाचा मान देण्यात आला होता.

त्यावेळी शिवसेनेकडून नाराजी व्यक्त करण्यात आली होती. मात्र, मंत्री भरत गोगावले यांनी वरिष्ठांचा निर्णय असल्याचे सांगत संयमाची भूमिका घेतली. तसेच कोणाला ध्वजवंदनाचा मान मिळाला म्हणजे पालकमंत्री पद मिळाले असे होत नाही असे म्हणत डिवचले होते. दरम्यान राज्य सरकारने परिपत्रक काढत प्रजासत्ताक दिनाच्या ध्वजवंदनाचा मान मंत्री गोगावले यांना देत समतोल साधण्याचा प्रयत्न केला होता. तर गोगावले यांना न्याय मिळाल्याची भावना व्यक्त केली जात होती.

मात्र आता पुन्हा एकदा महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमानिमित्त होणाऱ्या ध्वजवंदनाचा मान आदिती तटकरे यांना देण्यात आला आहे. ज्यामुळे गोगावले यांच्यावर अन्याय केल्याचे बोलले जात आहे. पण यामागे आता वेगळ्याच सेटलमेंटची चर्चा असून जिल्हा परिषदेत सहभागी होण्याचा तह कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे.

जिल्हा परिषदेत सर्वाधिक जागा जिंकूणही शिवसेनेला बाहेर ठेवण्याचा डाव राष्ट्रवादी आणि भाजपने आखला होता. पण मुख्य नेत्यांनी यात हस्तक्षेप केल्याने शिवसेनेला सोबत घ्यावे लागले होते. याच वेळी पालकमंत्री पदावर शिवसेनेला पाणी सोडावे लागल्याची चर्चा होती. त्यामुळेच आता महाराष्ट्र दिनाच्या ध्वजवंदनाचा मान आदिती तटकरे यांना देण्यात आल्याचे बोलले जात आहे.

FAQs :

1. ध्वजवंदन कोणाच्या हस्ते होणार आहे
महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते ध्वजवंदन होणार आहे

2. या निर्णयावर वाद का निर्माण झाला
स्थानिक राजकीय नेत्यांना डावलल्याची भावना निर्माण झाल्यामुळे वाद सुरू झाला

3. भरत गोगावले का नाराज आहेत
त्यांच्या अपेक्षेनुसार निर्णय न झाल्यामुळे ते नाराज असल्याची चर्चा आहे

4. हा वाद कुठे निर्माण झाला आहे
रायगड जिल्ह्यात हा राजकीय वाद उफाळण्याची शक्यता आहे

5. याचा पुढील राजकारणावर काय परिणाम होऊ शकतो
यामुळे स्थानिक पातळीवर शिवसेना आणि इतर नेत्यांमध्ये मतभेद वाढू शकतात

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT