Shivsena UBT Expels Bal Mane; uddhav thackeray  sarkarnama
कोकण

Shivsena UBT : कोकणात राजकीय भूकंप! 'MLC' त बाळ मानेंनी अर्ज मागे घेताच कारवाईचा बडगा; थेट पक्षातून हाकालपट्टी

Shivsena UBT Expels Bal Mane : अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या कोकणात नाट्यमय घडामोडी घडल्यानंतर बाळ माने यांनी निवडणुकीतून माघार घेतली. धक्कादायक यू-टर्नमुळे ठाकरेंच्या शिवसेनेसह महाविकास आघाडीला जोरदार धक्का बसला असून राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.

Aslam Shanedivan

Konkan MLC Election 2026 : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी महायुतीने महाविकास आघाडीला जोरदार धक्का दिला आहे. १७ पैकी ८ जागा या विधानपरिषद मतदानाआधीच बिनविरोध झाल्या आहेत. ज्यात कोकणातील रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग विधानपरिषद मतदारसंघाचा देखील समावेश आहे. या जागेवर महाविकास आघाडीने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सुरेंद्र ऊर्फ बाळ माने यांना अधिकृत उमेदवारी दिली होती.

पण त्यांनी धक्कादायक यू-टर्न घेत माघार घेतली आहे. यामुळे शिवसेनेसह महाविकास आघाडीला जोरदार धक्का बसला असून राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेनं बाळ माने यांच्यावर कडक कारवाई करत पक्षातून त्यांची हकालपट्टी केली आहे. याबाबत खासदार संजय राऊत यांनी ट्वीट करत माहिती दिली आहे.

राज्यातील १७ स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत कोकण विभाग स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये अत्यंत चुरस निर्माण झाली होती. महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेसला ही जागा सोडण्याचा निर्णय झाला होता. त्याप्रमाणे अनिकेत तटकरे यांना उमेदवारी जाहीर झाली. यानंतर शिवसेनेनं बंडाचे निशान फडकावले. मात्र हा विरोध खासदार सुनील तटकरे यांनी शांत केला.

विधानपरिषदेच्या जागेसाठी महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये अत्यंत चुरस निर्माण झाली होती. महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार गट) अनिकेत तटकरे यांना उमेदवारी दिली होती, तर त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाने बाळ माने यांना रिंगणात उतरवले होते. यामुळे येथे निवडणुकीत चांगलीच रंगत येईल अशी शक्यता होती.

मात्र, ऐनवेळी बाळ माने यांनी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. धक्कादायक म्हणजे भाजपचे मंत्री नितेश राणे यांच्यासोबत रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल होत आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. यामुळे निवडणुकीतील संपूर्ण रंगत संपली असून, अनिकेत तटकरे यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. तर मतदानाआधीच रायगडमध्ये जल्लोष सुरू झाला असून तटकरेंना विजयाचा पेढा भरवण्यात आला आहे.

या धक्कादायक निर्णयानंतर आता ठाकरेंच्या शिवसेनेकडून ठाकरे गटाकडून बाळ माने यांच्यावर पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवत हकालपट्टी केली आहे. याबाबत ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी त्यांच्या सोशल मिडीयावरून पोस्ट करत याबाबत माहिती दिली. त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये, “बाळ माने यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे, पक्षविरोधी कारवायात सहभागी झाल्या बद्दल शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी ही कारवाई केल्याचे राऊत यांनी म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT