Narayan Rane, Congress, NCP, shivsena  sarkarnama
कोकण

नारायण राणेंना होम पिचवरच महाआघाडीचा मोठा धक्का

चार नगरपंचायतच्या नगराध्यक्ष निवडणुकीत (Nagar Panchayat Election) महाविकास आघाडीने भाजपला (BJP) धक्का दिला आहे.

सरकारनामा ब्यूरो

सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील चार नगरपंचायतच्या नगराध्यक्ष निवडणुकीत (Nagar Panchayat Election) महाविकास आघाडीने भाजपला (BJP) धक्का दिला आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्यासाठी प्रतिष्ठेच्या असलेल्या या नगरपंचायत अध्यक्षपदाच्या निवडणुकीत आघाडीने चार पैकी दोन नगरपंचायत त्यांच्याकडून खेचून आणल्या आहेत. कुडाळ (Kudal) नगराध्यक्ष निवडीत काँग्रेसच्या (Congress) आफ्रीन करोल तर उपनगराध्यक्ष पदी शिवसेनेचे मंदार शिरसाठ यांची निवड झाली.

तर कसई-दोडामार्ग नगरपंचायतमध्ये एकहाती भाजपचेने वर्चस्व मिळवले. भाजपचे चेतन चव्हाण नगराध्यक्ष तर देवीदास गवस उपनगराध्यक्षपदी विराजमान झाले. देवगड-जामसंडे नगरपंचायतमध्ये शिवसेनेच्या साक्षी प्रभू नगराध्यक्ष तर राष्ट्रवादीच्या मिताली सावंत उपनगराध्यक्ष झाल्या. वैभववाडीमध्ये नगराध्यक्षपदी भाजपच्या नेहा माईनकर तर उपनगराध्यक्षपदी संजय सावंत विजयी झाले. तर प्रतिष्ठेच्या कुडाळ नगरपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) बाजी मारली.

कुडाळ नगरपंचायत नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष निवडणुकित भाजप उमेदवारांना धूळ चारत महाविकास आघाडीने त्यांना जोरदार धक्का दिला. त्यामुळे शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीकडून विजयाचा जल्लोष साजरा करण्यात आला. कार्यकर्त्यांनी फटाके फोडून, घोषणाबाजी देत, ढोल ताशाच्या गजरात विजयी मिरवणूक काढत जल्लोष साजरा केला.

दरम्यान, कुडाळ नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजप व शिवसेनेच्या भांडणात काँग्रेसची चांदी झाली असून केवळ दोन नगरसेवक असतानाही पक्षाला नगराध्यक्षपद मिळाले आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि आमदार वैभव नाईक (Vaibhav Naik) यांच्यातील वादात काँग्रेसची लॉटरी लागल्याने राज्यभर त्याचीच चर्चा रंगली आहे.

कुडाळ ही नगरपंचायत एका मताने भाजपच्या हातून निसटली आहे. करोल यांना या निवडणुकीत नऊ तर भाजपच्या प्राजक्ता बांदेकर यांना आठ मते मिळाली. कुडाळमध्ये एकूण 17 पैकी आठ जागांवर भाजपचे उमेदवार विजयी झाले होते. तर शिवसेनेला सात व काँग्रेसला दोन जागा मिळाल्या होत्या.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT