शिवसेनेला गडचिरोलीत मोठ यश; तीन नगर पंचायतीवर फडकावला भगवा...

पालकमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वात शिवसेना (Shivsena) नेते किरण पांडव (Kiran Pandav) यांनी यासाठी किल्ला लढवला होता.
 Eknath Shinde
Eknath Shinde Sarkarnama
Published on
Updated on

गडचिरोली : गडचिरोली (Gadchiroli) जिल्ह्यातील नगर पंचायत अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेनेने (Shivsena) जोरदार मुसंडी मारली आहे. कुरखेडा, मूलचेरा आणि अहेरी नगराध्यक्ष पदासाठी आज (ता.14 फेब्रुवारी) निवडणूक झाली. त्यात शिवसेनेने घवघवीत यश मिळवले असून भाजप (BJP) आणि कॅाग्रेसला (Congress) मागे टाकत कुरखेडा नगर पंचायत (Kurkheda Nagar Panchayat) अध्यक्ष निवडणुकीत बाजी मारली आहे.

 Eknath Shinde
निवडणुकाच अवैध ठरवा! पराभव समोर दिसू लागताच भाजपची उच्च न्यायालयात धाव

शिवसेनेच्या सुनीता बोरकर या नगराध्यक्ष झाल्या आहेत. शिवसेना नेते व जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वात शिवसेना नेते किरण पांडव यांनी यासाठी किल्ला लढवला होता. त्यांनी घेतलेल्या प्रयत्नांना आज यश आले आहे. विशेष म्हणजे भाजपचा दबदबा असलेल्या कुरखेडा येथे शिवसेनेची ही मोठी कामगिरी मानली जात आहे. आज मतदानादरम्यान कुरखेडा येथे भाजपच्या बंडखोर नगरसेविका जयश्री रासकर मतदानासाठी येत असताना शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांत धक्काबुक्की झाली. यामुळे येथे काहीकाळासाठी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, पोलिसांनी लगेचत मध्यस्थी करत वातावरण शांत केले.

 Eknath Shinde
राणे-नाईकांच्या भांडणात काँग्रेसला लॉटरी; दोन नगरसेवक अन् थेट मिळवलं नगराध्यक्षपद

मुलचेरा नगर पंचायतीच्या अध्यक्षपदीही शिवसेनेने बाजा मारली असून विकास नैताम विजयी झाले. येथे पहिल्यादांच शिवसेनेला नगर पंचायतीवर फगवा फडकावता आला असून अध्यक्षपद मिळाले आहे. तर अत्यंत चुरशीच्या अहेरी नगर पंचायतीच्या अध्यक्ष निवडणुकीतही शिवसेना- आदिवासी विद्यार्थी संघटना सत्तेत बसली आहे. येथे दोन्ही काँग्रेस हात चोळत राहिले. आदिवासी विद्यार्थी संघटनेच्या रोजा करपेत अध्यक्ष, तर शिवसेनेचे शैलेश पटवर्धन हे उपाध्यक्षपदी विराजमान झाले. शिवसेनेने महत्वाच्या तीनही नगर पंचायतींमध्ये मिळवलेले हे यश भाजप आणि काँग्रेसला धक्कादायक ठरले आहे. यामुळे जिल्ह्यात शिवसेनेचे वजन वाढले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com