रत्नागिरीचे राष्ट्रवादी आमदार शेखर निकम यांनी स्वबळाची तयारी दर्शवत महायुतीत नाराजी व्यक्त केली आहे.
सिंधुदुर्गात रत्नागिरीच्या अध्यक्षाने 25% जागांची मागणी करत ‘सन्मान नसेल तर गनिमी कावा’चा इशारा दिला आहे.
स्थानिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीत अंतर्गत मतभेद वाढताना दिसत असून भाजप व शिंदे गटासाठी ही डोकेदुखी ठरू शकते.
Kokan News : राज्यातील रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींना आता मुहूर्त लागला आहे. जिल्हा परिषदेसह पंचायत समिती, पालिका आणि नगरपंचायतींचे आरक्षण जाहीर झाले आहे. यामुळे दिवाळीनंतर पालिका, नगरपंचायत आणि डिसेंबरमध्ये जिल्हा परिषद, पंचायत समितींच्या निवडणुका लागण्याची शक्यता आहे. पण त्याआधीच राजकीय फटाके फुटताना दिसत असून महायुतीत दावेदारी सुरू झाली आहे.
जिल्हा परिषद, पंचायत समितींचे सभापती, नगरपालिका, नगरपरिषदांचे नगराध्यक्ष आणि जिल्हा परिषद, पंचायत समितींच्या गट, गणांचेही आरक्षण जाहीर झाल्यानंतर आता राजकीय पक्षांसह इच्छकांकडून मोर्चे बांधणी सुरू केली आहे. यादरम्यान तळकोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात महायुतीत वादाची ठिणगी पडली आहे. रत्नागिरीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार शेखर निकम यांनी स्वबळाची तयारी झाल्याचे सांगत शड्डू ठोकला आहे. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात राष्ट्रवादीच्या उमाकांत वारंग यांनी ‘महायुती’त सन्मान न झाल्यास गनिमीकाव्याने लढू असा इशारा देत ‘सावंतवाडी’तील 25 टक्के जागांची मागणी केली आहे. यामुळे स्थानिकच्या निवडणुकीच्या आधीच ‘महायुती’ची डोकेदुखी वाढल्याचे समोर येत आहे.
राष्ट्रवादीचे सावंतवाडी विधानसभा अध्यक्ष उमाकांत वारंग यांनी याबाबत घोषणा करताना महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा योग्य सन्मान राखला जावा अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. तसेच सन्मानपूर्वक योग्य जागा न दिल्यास येणाऱ्या निवडणुका ‘गनिमीकाव्याने’ लढू असेही त्यांनी म्हटलं आहे.
राष्ट्रवादीचा एक कार्यकर्ता म्हणजे लाख कार्यकर्त्यांसारखा आहे. त्यामुळे आगामी काळात महायुतीने निवडणुकीला सामोरे जाताना आमचा सन्मान ठेवावा. आमच्या मागणी प्रमाणे महायुतीने 25 टक्के जागा राष्ट्रवादीला द्याव्यात. युतीने सन्मान केल्यास आम्ही त्यांचे स्वागत करू. अन्यथा आगामी निवडणुकांमध्ये सावंतवाडी, दोडामार्ग आणि वेंगुर्ला या नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदासह जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सर्व जागा स्वबळावर लढू, असाही थेट इशारा वारंग यांनी दिला आहे.
वारंग यांच्या मागणीला तालुकाध्यक्षांचा दुजोरा
आगामी निवडणुकांमध्ये सावंतवाडी, दोडामार्ग आणि वेंगुर्ला या नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदासह जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या जागांबाबत राष्ट्रवादीने जोरदार मागणी केली आहे. त्यांच्या या मागणीला तालुकाध्यक्ष उदय भोसले यांनी देखील दुजोरा दिला आहे. यामुळे आता जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले आहे.
तर भोसले यांनी, येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषद निवडणुकीच्या दृष्टीने आमची तयारी झाली आहे. महायुतीत सन्मानजनक जागा मिळाल्या नाहीत तर आमचा स्वतंत्र लढण्याच्या विचार आहे. नगराध्यक्षपदासाठी आमच्याकडे दोन सक्षम उमेदवार असून स्वतंत्रपणे निवडणूक लढावी लागली तरी आम्ही मागे हटणार नाही. सावंतवाडी नगराध्यक्षपदासाठी देखील आमच्याकडे दोन महिला उमेदवार आहेत. जर आमच्या मागणीचा विचारविनिमय झाला नाही, सहकार्य मिळेल नाही तर आम्हाला निर्णय घ्यावा लागेल, असेही तालुकाध्यक्ष उदय भोसले यांनी म्हटलं आहे.
राष्ट्रवादीचे राष्ट्रवादीच्या उमाकांत वारंग आणि तालुकाध्यक्ष उदय भोसले यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर आता महायुतीत खळबळ उडाली आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजपकडून कोणती प्रतिक्रिया येते याचीच उत्सुकता राजकीय वर्तुळात लागली आहे.
1. महायुतीत सध्या कोणत्या नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे?
रत्नागिरीचे आमदार शेखर निकम आणि सिंधुदुर्गातील उमाकांत वारंग यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
2. कोणत्या भागातील जागांवर राष्ट्रवादीची मागणी आहे?
सिंधुदुर्गातील सावंतवाडी परिसरात २५% जागांची मागणी केली आहे.
3. ही बंडखोरी महायुतीसाठी कितपत गंभीर आहे?
ही बंडखोरी महायुतीच्या स्थानिक निवडणुकांतील रणनीतीस मोठा धक्का ठरू शकते.
4. राष्ट्रवादीचे नेते गनिमी काव्याचा उल्लेख का करत आहेत?
गटात सन्मान मिळत नसल्यामुळे स्वतंत्र लढतीचा विचार करत असून गनिमी काव्याने लढण्याचा इशारा दिला आहे.
5. ही परिस्थिती महायुतीच्या कोणत्या पक्षांना अधिक अडचणीत टाकू शकते?
भाजप व शिंदे गट या दोन पक्षांना ही बंडखोरी सर्वाधिक फटका देऊ शकते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.