Mahayuti : Eknath Shind Devendra Fadnavis Ajit Pawar sarkarnama
कोकण

Mahayuti formula : अखेर महायुतीचा फॉर्म्युला ठरला! कोणत्या नगरपालिकेवर कोणाचा ताबा? पाहा सविस्तर यादी!

Ratnagiri local Body elections : एकीकडे जिल्ह्यात भाजप आणि शिवसेना असा वाद शिगेला पोहचला असतानाच तो थांबणार की नाही, महायुती होणार की नाही अशा चर्चा सुरू झाल्या होत्या. या वादामुळे इच्छुक उमेदवारांचा जीव टांगणीला लागला होता.

Aslam Shanedivan

  1. मुंबईत झालेल्या बैठकीत महायुतीचा स्थानिक स्वराज्य निवडणुकीचा फॉर्म्युला जवळजवळ निश्चित झाला आहे.

  2. रत्नागिरी, राजापूर, खेड पालिका आणि लांजा नगरपंचायत शिवसेनेला देण्यात आल्या आहेत.

  3. गुहागर आणि देवरूख भाजपकडे तर चिपळूण नगरपालिका राष्ट्रवादी काँग्रेसला देण्याची शक्यता आहे.

Ratnagiri News : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात महाविकास आघाडीसह महायुतीकडून जोरदार तयारी केली जात आहे. आता नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी अर्ज सादर करता येणार आहे. मात्र आघाडी असो किंवा महायुती जागा वाटपाचा तिढा कायम होता. यामुळेच येथे भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेत वाद विकोपाला गेला होता. पण आता या वादावर पडदा पडला आहे. मुंबईत याबाबत झालेल्या बैठकीमध्ये आगामी नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी महायुतीचा फॉर्म्युला जवळजवळ निश्चित करण्यात आला आहे. रत्नागिरी, राजापूर, खेड पालिका आणि लांजा नगरपंचायत शिवसेनेच्या वाटेला गेली आहे. गुहागर आणि देवरूख नगरपंचायत भाजपच्या वाटेला तर चिपळूण पालिका राष्ट्रवादी काँग्रेसला सोडली जाण्याची शक्यता आहे. या निर्णयामुळे इच्छुकांचा जीव आता भांड्यात पडला आहे.

राज्य निवडणूक आयोगाने पालिका आणि नगरपंचायती निवडणुकीचा महिन्याचाच कालावधी असल्याने सर्वच पक्षांची लगीनघाई सुरू आहे. सोमवारपासून अर्ज भरण्यास सुरूवात झाली असून ती 17 तारखेपर्यं मुदत असणार आहे.यामुळे नेते आणि इच्छुकांची धावपळ पाहायला मिळत आहे. दरम्यान जिल्ह्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशीच लढत होणार असून महाविकास आघाडीचे सूत्र काही ठिकाणी ठरले असून नगराध्यक्षपदावरून घोडं अडलं आहे. तरीही आघाडीकडून प्रचाराला वेग देण्यात आला आहे.

महायुतीने जिल्ह्यातील पालिका, नगरपंचायतींचा फॉर्म्युला जवळजळ निश्चित केला असून शिवसेनेनं शनिवारपासूनच प्रचाराला जोरदार सुरुवात केली आहे. मंत्री उदय सामंत यांनी प्रभाग 5 आणि 6 मध्ये प्रचाराचा नारळ फोडत शिवसेना निवडणुकीसाठी सज्ज असल्याचे संकेत दिले आहेत. रत्नागिरी पालिकेवर शिवसेनेचे वर्चस्व असल्यामुळे नगराध्यक्षपदाची जागा शिवसेनेला सोडण्यात आली आहे.

खेड पालिकेवर माजी पर्यावरणमंत्री रामदास कदम आणि विद्यमानमंत्री योगेश कदम यांनी दावा करत शिवसेना तिथे ताकद दाखवत भगवा फडकवणार असल्याचा दावा केला आहे. भाजपने देखील येथे दावा करत माजी आमदार सूर्यकांत दळवी यांनी दावा ठोकला आहे. यामुळे येथे काय होणार याकडे खेडकरांचे लक्ष लागले आहे.

शिवसेनेचे आमदार किरण सामंत राजापूर पालिका आणि लांजा नगरपंचायतीसाठी आग्रही आहेत. त्यामुळे या दोन जागादेखील शिवसेनेला सोडण्याबाबत एकमत झाल्याची चर्चा आहे. चिपळूणचे आमदार शेखर निकम हे राष्ट्रवादीचे असून ही जागा राष्ट्रवादीला सोडली जाण्याची शक्यता आहे. परंतु गुहागर आणि देवरूख नगरपंचायतीवर भाजपचे वर्चस्व असल्याने त्या भाजपला दिल्याचे निश्चित झाले आहे.

भाजपकडून मुंबईत मुलाखती

भाजपने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांसाठी जोरदार तयारी केली आहे. पक्षात इच्छुकांची भाऊगर्दी असून, त्यांची मते जाणून घेण्यासाठी आणि त्यांची राजकीय तयारीसाठी मुंबईत नुकत्याच मुलाखती झाल्या. विशेष म्हणजे भाजपच्या 67 इच्छुकांच्या मुलाखतीही घेतल्या आहेत. त्यापैकी कोणाला संधी मिळणार, हे लवकरच जाहीर होणार आहे.

पहिल्या दिवशी एकही अर्ज नाही

नगरपालिका आणि नगरपंचायती निवडणुकीच्या अर्ज भरण्याच्या पहिल्याच दिवशी एकही अर्ज भरला गेला नाही. ऑनलाईन अर्ज भरण्याची सुविधा असल्याने अर्जही नेण्याचे प्रमाणही शून्य आहे. महायुती किंवा महाविकास आघाडीकडून उमेदवारांची घोषण न केल्याने ही परिस्थिती आहे. 13 किंवा 14 तारखेनंतर अर्ज भरण्यास सुरुवात होण्याची शक्यता आहे.

FAQs :

1. महायुतीचा फॉर्म्युला कोणत्या बैठकीत ठरला?
मुंबईत झालेल्या महायुतीच्या बैठकीत हा फॉर्म्युला ठरला असल्याचे समजते.

2. कोणत्या नगरपालिकांवर शिवसेनेचा दावा आहे?
रत्नागिरी, राजापूर, खेड आणि लांजा या शिवसेनेच्या वाट्याला आल्या आहेत.

3. भाजपला कोणत्या नगरपंचायती देण्यात आल्या आहेत?
गुहागर आणि देवरूख या दोन नगरपंचायती भाजपच्या वाट्याला आल्या आहेत.

4. चिपळूण नगरपालिका कोणत्या पक्षाला मिळणार आहे?
चिपळूण नगरपालिका राष्ट्रवादी काँग्रेसला सोडली जाण्याची शक्यता आहे.

5. हा फॉर्म्युला अंतिम आहे का?
हा फॉर्म्युला जवळजवळ निश्चित झाला असून, अंतिम निर्णय लवकरच अधिकृतरीत्या जाहीर होण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT