Mahayuti Dispute : शिवेंद्रराजेंचा शंभूराज देसाईंवर पलटवार; जो निर्णय पाटणमध्ये होईल, तोच मेढ्यात होईल

Shivendraraje Vs Shambhuraj : शंभूराज देसाई यांच्या ‘महायुतीत आम्हाला कमी लेखू नका’ या वक्तव्याला शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी प्रत्युत्तर दिले. पाटणप्रमाणेच मेढ्यात निर्णय असेल, असा पलटवार त्यांनी केला.
Shambhuraj Desai-Shivendraraje Bhosale
Shambhuraj Desai-Shivendraraje BhosaleSarkarnama
Published on
Updated on
  1. मेढा येथील बैठकीत पालकमंत्री शंभूराज देसाईंनी महायुतीतल्या नेत्यांना इशारा म्हणून म्हणाले — “राज्यात महायुती आहे; मात्र महायुतीत आम्हाला कमी लेखू नका.”

  2. त्यावर भाजपचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी प्रत्युत्तर देते निकालाचे तत्त्व मांडले — “जसा पाटणात निर्णय होईल, तोच मेढातही लागू व्हावा”, म्हणजे स्थानिक पातळीवर समानता आणि निर्णयांची सुसंगतता हवा.

  3. पार्श्वभूमी — महापालिका/नगरपरिषद निवडणुकांपूर्वी महायुतीमध्ये तणाव वाढला आहे; भाजपचे स्वबळाचे निर्णय आणि घटकपक्षांमधील अधिकारवाटप या विषयांवरच सध्या भांडण चालू आहे.

Satara, 09 November : शिवसेनेच्या आढावा बैठकीत साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी जिल्ह्यातील नेत्यांना इशारा देताना ‘राज्यात महायुती आहे. मात्र, महायुतीत आम्हाला कमी लेखू नका,’ असे म्हटले होते. त्याला आता भाजप नेते तथा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी उत्तर दिले आहे. आम्ही पालकमंत्र्यांना कमी लेखतच नाही. पण जो निर्णय पाटणमध्ये तोच निर्णय मेढा येथे होईल, असा पलटवार शिवेंद्रराजेंनी शंभूराज देसाईंवर केला.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सत्ताधारी महायुतीमध्ये जोरदार खडाखडी सुरू झाली आहे. सर्वच पक्षाकडून एकमेकांना आव्हान दिले जात आहे, त्यामुळे महायुती (Mahayuti) एकत्र लढणार की स्वतंत्र याबाबत चर्चा सुरू झाली आहे. भारतीय जनता पक्षाने नगरपालिका निवडणुकीसंदर्भात अनेक जिल्ह्यात स्वबळाचा नारा दिलेला आहे. त्यामुळे महायुतीमधील इतर दोन पक्ष अस्वस्थ झाले आहेत, त्यातून एकमेकांना इशारे दिले जात आहेत.

मेढा येथील कार्यक्रमात बोलताना शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी महायुती म्हणून आम्हाला कमी लेखू नका, असे म्हटले होते. त्याला भाजपचे नेते तथा बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी उत्तर देताना म्हटले आहे की, पालकमंत्री शंभूराज देसाई म्हणाले आहेत की, महायुती आहे. महायुतीत आम्हाला कमी लेखू नका. आम्ही तुम्हाला कधीच कमी लेखलेलं नाही. आमचं एवढंच म्हणणं आहे की, जसा पाटण तालुक्यात निर्णय होईल, तोच निर्णय मेढा नगरपालिका निवडणुकीच्या संदर्भाने होईल.

आमचं म्हणणं एवढंच आहे की, पालकमंत्री देसाई यांनी पाटण तालुक्यात महायुतीचा निर्णय करावा. मग, त्यांनी आम्हाला सांगावं की महायुती आहे आणि तुम्ही त्याप्रमाणे वागावं. कारण ते पालकमंत्री आहेत, असा टोलाही शिवेंद्रसिंहराजे भोसले (Shivendraraje Bhosale) यांना शंभूराज देसाईंना लगावला.

शंभूराज देसाईंनी काय म्हटले होते?

मेढ्याला सुस्थितीतील स्मशानभूमी नाही. साहेबांनी निधी दिलेला असतनाही तुमच्या लोकांना प्रत्येक गोष्टीत खोडा घालायची सवय असेल तर शेवटी शिवसेना स्टाईलने उत्तर द्यावं लागेल. महायुती म्हणून आम्ही एकत्र लढलं पााहिजे, हे पालकमंत्री म्हणून माझं पहिलं म्हणणं आहे. पण विनाकारण आमच्याच लोकांना त्रास देणार असाल तर ते किती दिवस सहन करायचं?

विनाकारण आक्रमक भूमिका घेऊ नका. आपल्याला महायुती म्हणून सर्वांना सोबत घेऊन काम करायचं आहे. आपल्याला महाविकाण आघाडीचा पराभव करायचा आहे, असे एकनाथ शिंदेंनी आम्हाला सांगितलं आहे. पण आम्हीच किती दिवस ही भूमिका घ्यायची, असा सवाल देसाई यांनी केला.

Q1: शंभूराज देसाईने काय म्हटले?
A1: त्यांनी महायुतीत शिवसेनेसह त्यांच्या प्रतिनिधींना कमी लेखू नयेत असे इशारा दिला.

Q2: शिवेंद्रभोसले यांनी काय प्रत्युत्तर दिले?
A2: त्यांनी सांगितले की पाटणमध्ये जे निर्णय होईल तेच मेढातही लागू व्हायला हवे — म्हणजे स्थानिक निर्णयांमध्ये सुसंगती हवी.

Q3: ही बहस का महत्वाची आहे?
A3: कारण महापालिका/नगरपरिषद निवडणुकांपूर्वी महायुतीचे एकत्रित तत्व आणि भागीदारांचे अधिकार यावर तणाव निर्माण झाला आहे.

Q4: या वादाचा शक्य परिणाम काय होऊ शकतो?
A4: महायुतीतून धोरणात्मक असमाधान आणि स्थानिक युती/उमेदवार निवडीत गतीमान संघर्ष होऊ शकतो.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com