Raigad Accident News : कोकणात रायगड जिल्ह्यात मुरुड आगरदांडा ग्रामपंचायत हद्दीतील उसडी गावाजवळ टोलनाक्यावर दुचाकी व आमदार महेद्र दळवी यांच्या गाडीचा समोरासमोर अपघात होऊन दुचाकी चालकाचा मृत्यू झाला आहे.
हा अपघात झाला त्यावेळेला आमदार महेंद्र दळवी हे कारमध्ये होते. आमदार महिंद्र दळवी यांच्या कारचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती रात्री उशिरा रायगड जिल्हा पोलीस प्रशासनातील उच्चपदस्थ अधिकाऱ्याकडून देण्यात आली.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
शिवसेना शिंदे गटाचे रायगड जिल्ह्यातील अलिबागचे आमदार महेंद्र दळवी हे मुरुड- नांदगाव येथील साळाव आगरदांडा रस्त्याच्या भूमीपूजन कार्यक्रमासाठी येत असताना माणगाव येथील जासीम अब्दुल रहेमान पासवारे हा व्यक्ती दुचाकी क्रमांक (एम.एच.06 ए.डी. 4276) वरून माणगावला जात असताना आगरदांडा ग्रामपंचायत हद्दीतील उसडी येथील टोलनाक्यावर आमदाराची गाडी व त्याच्या दुचाकीची समोरासमोर जोरदार धडक झाली.
या अपघातामध्ये पासवारे हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना मुरुड ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. परंतु त्यांचा मृत्यू झाला. शनिवारी दुपारी हा अपघाता घडली आहे. याबाबत मुरुड पोलिसांकडे संपर्क साधला असता त्यांनी अपघात प्रकरणी माहिती नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगत याची माहिती आपल्याला कंट्रोल रूमकडून मिळेल असे उत्तर देण्यात आलं.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.