Manoj Jarange Patil sarkarnama
कोकण

Manoj Jarange Patil : जरांगे पाटलांचं ठरलं, पण मुंबईत धडकण्याआधीच शिवसेना आमदाराचा कडक इशारा अन् सल्ला ; 'भाषा नीट वापरावी'

Nilesh Rane Warning to Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आंदोलनाची हाक दिली असून ते आता मुंबईकडे कूच करणार आहेत.

Aslam Shanedivan

Kokan News : मराठा समाजाच्या मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील गेल्या १४ दिवसांपासून आंदोलन करत असून आज त्यांच्या आंदोलनाचा १५ दिवस आहे. दरम्यान त्यांनी सरकारकडून ठोस निर्णय न झाल्याने मुंबईत धडकण्याचा निर्णय घेतला आहे. तर १५ सप्टेंबरपासून ते मुंबईकडे कूच करणार आहेत. यादरम्यान त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या टीका आणि एकेरी भाषेवरून शिवसेना आमदार नीलेश राणे यांनी थेट इशारा वजा सल्ला दिला आहे. त्यांनी, जरांगे यांनी भाषा नीट वापरावी, जसे ते नेते आहेत. तसेच शिंदें आमचे नेते आहेत, असे म्हटलं आहे.

मराठा आरक्षणाचे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाच्या मागण्यांसाठी पुन्हा एकदा आंदोलनाचे अस्त्र काढले आहे. ते गेल्या १४ दिवसांपासून आंदोलन करत असून आता मुंबईला जाण्याचा निर्णय केला आहे. तर १५ सप्टेंबरपासून मुंबईचा प्रवास सुरू करणार असल्याचे जरांगे यांनी जाहीर केले. यावेळी देखील त्यांनी अनेकांना समाचार घेतला.

दरम्यान आता गेल्या काही दिवसांपासून शिंदे यांच्यावर होणारी टीका आणि त्यांचा एकेरी भाषेत होणाऱ्या उल्लेखावरून आमदार नीलेश राणे संतापवले. आंदोलन करण्याचा सगळ्यांना हक्क अधिकार आहे. मनोज जरांगे पाटील यांना न्यायालयाने देखील आंदोलन करण्याची परवानगी दिली आहे.

पण ऐन गणपतीच्या तोंडावर असे आंदोलन मुंबईत होऊ नये असं मला वाटतं. मी काही पक्षाचा प्रवक्ता नाही. पण त्यांनी चांगली भाषा वापरावी. आम्हाला कोणतीच अडचण नाही. मुंबईत आल्यावर जे नियम असतील त्यांचे पालन करावे तरी आम्हाला कोणतीच अडचण नाही.

आंदोलने अनेक होतात फक्त ते आंदोलनाप्रमाणेच झालं पाहिजे, असे न्यायालयाचे निर्देश आहेत. त्याप्रमाणे आमची देखील विनंती आहे. मनोज जरांगे पाटील हे जी भाषा वापरतात ती त्यांनी नीट वापरावी. जसे ते अनेकांचे नेते आहेत. तसेच आमचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत. त्यांच्याबद्दल जर कोणी वाईट बोललं तर ते आम्हाला सहन होत नाही. यामुळे त्यांनी भाषा नीट वापरावी.

यावेळी ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या टीकेला देखील त्यांनी उत्तर दिले आहे. राऊत हे अदखल पात्र माणूस असून ते जे बोलतात त्याला आपण भीक देखील घालत नाही, असा पलटवार नीलेश राणेंनी केला आहे. तर राऊत हा माणूस कोण आहे? असा सवाल करत तो जनतेतून निवडून आला आहे का. या माणसाने पाच पैशांची मदत कोणाला केली आहे का. राजकारणात त्या माणसाचे योगदान आहे काय किंवा कोणतं समाज उपयोगी काम केलं आहे. अशा माणसाला बद्दल का विचारता आणि मी अशा बद्दल उत्तर देणार नाही, असेही राणेंनी म्हटलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT