Maratha Reservation News Sarkarnama
कोकण

Maratha Reservation News : 'भुजबळांना बोलू दिले नाही, ही केविलवाणी अवस्था...' ; ठाकरेंच्या आमदाराने डिवचले!

Chetan Zadpe

Konkan News : मराठा समाजाला आज राज्य विधिमंडळाचं विशेष अधिवेशन घेऊन आरक्षण जाहीर झाल्यानंतर आता विविध नेत्यांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. ठाकरे गटाचे कोकणातले रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर लांजा विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजन साळवी यांनीही आरक्षणावर प्रतिक्रिया देत सरकारवर निषणा साधला आहे. सभागृहात आपण पाहिलं की छगन भुजबळ एवढे मोठे नेते असूनही त्यांना सभागृह बोलू दिले नाही, अशा शब्दात राजन साळवी यांनी सरकारला सुनावल आहे. (Latest Marathi News)

ओबीसीला आरक्षण धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण मिळावं, ही उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मागणी होती ती पूर्ण झाली आहे. मात्र हे आरक्षण कोर्टात टिकावं ही आमची अपेक्षा आहे. पण भुजबळ यांच्यासारख्या मोठ्या नेत्याची ही केविलवाणी अवस्था पाहून आम्हालाही आश्चर्य वाटलं. विधानसभा अध्यक्षांनी इतक्या मोठा नेता असलेल्या छगन भुजबळ यांना सभागृहात बोलू दिले नाही, ही त्यांची केविलवाणी अवस्था आम्ही पाहिली, असा टोला ठाकरे गटाचे नेते आमदार राजन साळवी यांनी लगावला आहे. (Maratha Reservation)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

उद्धव ठाकरेंची भूमिका -

लोकसभा (Lok Sabha) निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून आरक्षण विधेयक मंजूर केले आहे का? असा प्रश्न उद्धव ठाकरे यांना विचारण्यात आला. त्यावर ठाकरे म्हणाले, "मराठा आरक्षणासाठी लढा देणारे जरांगे पाटील यांना हा संशय आहे की, निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून घेतलेला हा निर्णय आहे का? याचा विचार मराठा समाजाने करायचा आहे. याबद्दल मी आता फार काही बोलू शकत नाही, असे ठाकरे म्हणाले.

(Edited By - Chetan Zadpe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT