NCP News : '...त्यावेळीही भाजपला पाठिंबा द्यायचं ठरलं होतं!'; राष्ट्रवादीच्या नेत्याचा खळबळजनक दावा

Statement of a great leader of NCP : अजितदादांच्या नेतृत्वाखाली घेतलेल्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले. विधानसभा अध्यक्षांनीदेखील संशोधन करून निर्णय दिला.
BJP, NCP
BJP, NCPSarkarnama

Raigad News : विधानसभा 2019 च्या निवडणुकीनंतर महाराष्ट्रात अनेकदा सत्तानाट्य घडल्याचे जनतेने पाहिले आहे. यात प्रत्येक पक्षाने सत्तेसाठी वेगळी भूमिका घेतल्याचे चित्र समोर आहे. सुरुवातीला भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षामध्ये सत्तेसाठी महायुती, महाआघाडी झाली तशीच ती बिघडलीही. पण या निवडणुकीनंतर शिवसेना आणि राष्ट्रवादीने दोनदा सरकारमध्ये सामील होत पाच वर्षे सत्ता राखली, तर भाजप आणि काँग्रेसला फारसा मोठा वाटा सत्तेत मिळाला नसल्याचे दिसते.

दरम्यान, राष्ट्रवादीच्या एका बड्या नेत्याने 'त्यावेळीही भाजपला पाठिंबा देण्याचं ठरलं होतं' असे वक्तव्य केले आहे. म्हणजे राष्ट्रवादी सत्तेसाठी निवडणुकीपासूनच भाजपला बाहेरून पाठिंबा देण्यास तयार होती, असे दिसत आहे. त्यामुळे राष्ट्रवादीने एकदा काँग्रेस - शिवसेना आणि एकदा भाजप - शिवसेना असा दोनदा संसार थाटला.

BJP, NCP
Radhakrishna Vikhe Patil : काँग्रेसचे काही नेते रात्री...; विखे-पाटलांचा धक्कादायक आरोप

शरद पवार यांच्या वक्तव्यावर कोणत्याही भावना व्यक्त करणार नाही, परंतु एक बाब नक्की आहे. अजितदादांच्या नेतृत्वाखाली घेतलेल्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले. विधानसभा अध्यक्षांनीदेखील संशोधन करून निर्णय दिला. अशावेळी विकृत मनोवृत्तीच्या काही व्यक्ती महाराष्ट्रातील वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न करीत आहेत. स्वतःला शाहू - फुले - आंबेडकरांचे तेच एकटे भोक्ते आहेत, असे समजणारे व्यक्ती आहेत.

भारतीय जनता पक्षासोबत जाण्याचा निर्णय 2014ला निवडणुकीचे निकाल जाहीर होण्यापूर्वीच घेतला गेला. तेव्हा प्रदेशाध्यक्ष म्हणून मी आणि राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून प्रफुल्ल पटेल आम्ही भाजपला बाहेरून पाठिंबा दिला. त्याचवेळी सरकारमध्ये सहभागी होणार होतो. 2016 - 17मध्येसुद्धा सहभागी होण्याचा निर्णय झाला होता. त्या बैठकांना प्रदेशाध्यक्ष म्हणून मी आणि अजित पवार यांना सूचना दिल्याप्रमाणे आम्ही त्या बैठका केल्या होत्या.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पालकमंत्री पद, खाती, महामंडळे, लोकसभेच्या जागा हे सारं काही तेव्हा ठरलं होतं. काही कारणामुळे ते अमलात येऊ शकलं नाही. 2019 मध्येही तशाच सूचना देण्यात आल्या होत्या. नंतर ते काही होऊ शकलं नाही. काही विकृत मनोवृत्ती अशी म्हणते अजित पवार यांना उपमुख्यमंत्री केलं ते चुकीचं झालं. पण ती कुणाची मेहेरबानी नव्हती. ती आमदारांचीच मागणी होती. अजित पवारांना उपमुख्यमंत्री केलं नसतं तर ते सरकार 8 दिवसही टिकलं नसतं. इतक्या आमदारांचं पाठबळ दादांच्या पाठीमागे होतं, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केले आहे.

मोठ्या राजकीय घडामोडी...

शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना ऊत आला आहे. याबाबत सुनील तटकरे यांना विचारणा केली असता ते म्हणाले, महाविकास आघाडीतील प्रत्येक घटक पक्षात आज अस्वस्थता आहे. या सर्वच पक्षांतील मोठ्या नेत्यांच्या मनात राजकीय अस्वस्थता आहे. त्यामुळे प्रत्येकजण आपापल्या परीने राजकीय योग्य पर्याय काय आहे तो शोधण्याचा प्रयत्न करत असतील. मला या विषयावर आज काही बोलायचे नाही, पण नजीकच्या 15 - 20 दिवसांत मोठ्या राजकीय घडामोडी राज्यात पाहायला मिळतील, असेही तटकरे यांनी सांगितले.

BJP, NCP
Riteish Deshmukh : रितेश देशमुखांनी फोडाफोडीच्या राजकारणाचे काढले वाभाडे

ऐतिहासिक ठराव होईल...

उद्या (ता. 20 ) मराठा आरक्षणासंदर्भात विशेष अधिवेशन सरकारने बोलावले आहे. मागील 2 वेळा मराठा समाजाला आरक्षण देण्यात आलं, पण ते सर्वोच्च न्यायालयात टिकू शकलं नाही. त्यावेळी ज्या त्रुटी सर्वोच्च न्यायालयाने निदर्शनास आणून दिल्या, त्यांची दुरुस्ती करून उद्याचे विधेयक सादर होईल. ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण देण्याचा ऐतिहासिक ठराव होईल, असे मत सुनील तटकरे यांनी मराठा आरक्षणाबाबत बोलताना व्यक्त केले.

R

BJP, NCP
NCP Breaking News : शरद पवारांना मोठा दिलासा; सुप्रीम कोर्टाचे निवडणूक आयोगाला 'हे' महत्त्वाचे आदेश

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com