वैभववाडी (जि. सिंधुदुर्ग) : सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसाठी (Sindhudurg District Bank election) आज (ता. ३० डिसेंबर) वैभववाडी तालुक्यात 98.14 टक्के मतदान झाले. तालुक्यातील 54 पैकी 53 मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला. राज्याचे गृहराज्यमंत्री आणि कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील (satej Patil) हे या बॅंकेचे मतदार आहेत. त्यांनी वैभववाडी केंद्रावर मतदान केले. (Minister of State for Home Affairs Satej Patil gave his vote for Sindhudurg District Bank)
सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेसाठी आज (ता. 30 डिसेंबर) सकाळी आठपासून वैभववाडी येथील तहसील कार्यालयातील मतदान केंद्रावर प्रकिया सुरू झाली. मतदान सुरू होण्यापूर्वी भारतीय जनता पक्ष पुरस्कृत सिध्दीविनायक पॅनेल आणि महाविकास आघाडी पुरस्कृत समृध्दी सहकार पॅनेलचे पदाधिकारी कार्यकर्त्याची धावपळ सुरू होती. मोठ्या संख्येने पदाधिकारी जमले होते.
वैभववाडी तालुक्यात जिल्हा बॅंकेचे एकुण 54 मतदार होते. सकाळपासूनच मतदारांनी मतदान केंद्राबाहेर हजेरी लावली होती. त्यामुळे सकाळी अकरापर्यतच 50 टक्क्यांहून अधिक मतदान झाले होते. दुपारी चारपर्यत 54 पैकी 53 मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला होता. राज्याचे गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनीही येथील केंद्रावर आपला मतदानाचा हक्क बजावला.
सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही जिल्ह्याची आर्थिकवाहिनी आहे, त्यामध्ये राजकीय हस्तक्षेप होता कामा नये. लोकशाहीत मतदान महत्वाचे आहे, असे गृहराज्यमंत्री पाटील यांनी पत्रकाराशी बोलताना स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.