उद्धवजींच्या शस्त्रक्रियेनंतर फडणवीसांचा रश्मीवहिनींना फोन; म्हणाले, ठाकरे कुटुंबीयांचे आमच्यावर उपकार!

उद्धव ठाकरे यांच्या तब्येतीसाठी मी दररोज सकाळी देवांना प्रार्थना करतो : चंद्रकांत पाटील
Uddhav Thackeray-Rashmi Thackeray-Devendra Fadnavis

Uddhav Thackeray-Rashmi Thackeray-Devendra Fadnavis

Sarkarnama

Published on
Updated on

पुणे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी रश्मीवहिनींना फोन केला होता. उद्धवजींच्या तब्येतीची विचारपूस करून ठाकरे कुटुंबीयांचे आमच्यावर उपकार आहेत, आम्ही सर्व तुमच्याबरोबर आहेत, अशी ग्वाही दिली होती, अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज बोलताना दिली. उद्धव ठाकरे यांच्या तब्येतीसाठी मी दररोज सकाळी देवांना प्रार्थना करतो, अशी पुस्तीही त्यांनी जोडली. (Devendra Fadnavis calls Rashmi Thackeray after surgery on Uddhav Thackeray)

आमदार पाटील हे पत्रकार परिषदेत बोलत होते. त्यावेळी त्यांनी वरील माहिती दिली. ते म्हणाले की, आम्ही विविध प्रश्नांच्या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन करतो, पत्र लिहितो. पण, त्याला उत्तर येत नाही. (स्व.) बाळासाहेब ठाकरे यांचे राज्यावर उपकार आहेत. कुणाच्या आजारपणाची टिंगलटवाळी करण्याचे आमच्यावर संघाचे संस्कार नाहीत. मुख्यमंत्री ठाकरे हे आमचे चांगले मित्र आहेत, त्यांच्या तब्येतीसाठी मी रोज सकाळी देवांना प्रार्थना करत असतो. या शिवाय शस्त्रक्रिया पार पडल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनीही फोन करून उद्धवजींच्या तब्यतेची चौकशी केली होती.

<div class="paragraphs"><p>Uddhav Thackeray-Rashmi Thackeray-Devendra Fadnavis</p></div>
मोदींची पवारांना सत्ता स्थापनेची ऑफर आणि चंद्रकांत पाटील म्हणतात...

शरद पवार यांच्या सत्तास्थापनेच्या दाव्याबाबत बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादीला सत्ता स्थापनेसाठी ऑफर दिली होती, हे सांगायला पवार यांना इतका वेळ का लागला. मुळात मोदी-पवार हे मोठे नेते आहेत. त्यांच्यात काय बोलणे झाले, हे आपल्यासाख्यांना कळणे अवघड आहे. पण, अशी ऑफर मिळाली असती, तर ती नाकारण्याइतका राजकीय असंमजस्यपणा पवार यांच्यात मुळीच नाही. माझ्यासारखा छोटा कार्यकर्ता त्यावर काय बोलणार? आणि कोणाचे काय बोलणे झाले? हे मला माहिती नाही.

<div class="paragraphs"><p>Uddhav Thackeray-Rashmi Thackeray-Devendra Fadnavis</p></div>
चंद्रकांतदादांचा नवा बॉम्ब : सरकारमधून बाहेर पडून भाजपसोबत सत्तास्थापनेसाठी चढाओढ!

शरद पवारांचा इतिहास खरे बोलण्याचा नाही, असे धक्कादायक वक्तव्यही चंद्रकांत पाटील यांनी केले. त्याबाबत विचारले असता त्यांनी तुम्हाला माहीत आहेच की, असे म्हणत या प्रकरणातून लगेच अंग काढून घेतले. शरद पवारांचे म्हणणे खरं की खोटं मानायचे हा तुमचा विषय आहे. मोदी आणि पवार, पवार आणि अजितदादांचं, अजित पवार आणि अमित शहा तसेच फडणवीस आणि अजित पवार यांच्यामध्ये काय बोलणं झालं. हे सांगण्याइतका मी मोठा नेता नाही. इतके जाहीरपणे सांगण्याइतका अपरिपक्वही नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com