Uday Samant  Sarkarnama
कोकण

Uday Samant: 'पदाधिकारी भाजपचे, सेवा ठाकरे गटाची'; उदय सामंतांनी सुनावले खडेबोल

सरकारनामा ब्यूरो

Ratnagiri News: 'आपला दुश्मन कोण आहे, हे आपल्याला कळलं पाहिजे. आपला दुश्मन हा भाजपला कायमस्वरूपी बाजूला ठेवणारा ठाकरे गट आहे. याचा विचार कधीतरी आपण केला पाहिजे', असे सांगत उदय सामंतांनी ठाकरे गटाचा चांगलाच समाचार घेतला.

'भाजपाचे काही लोक वेगळे काम करत असतील तर त्यांना ताळ्यावर आणायची जबाबदारी शिवसेना-भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी घ्यायला हवी. आज काही लोक आहेत, जे भाजपचे पदाधिकारी आहेत पण, काम करतात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे. त्यांचे नातेसंबंध त्यांच्याशी फार चांगले असतात', अशा खोचक शब्दात सामंतांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांना खडेबोल सुनावले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आपल्याला राम मंदिराचा प्रचार करायचा आहे. ज्यांनी राम मंदिर परत आणले, त्यांना परत पंतप्रधान करायचे आहे. आपल्यातील एकवाक्यता ही अतिशय महत्त्वाची असल्याचेही सामंत म्हणाले.

पालकमंत्री उदय सामंत त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने गेले दोन दिवस रत्नागिरी, पाली, संगमेश्वर आपल्या विधानसभा मतदारसंघात अनेक जिल्हा परिषद गटांमध्ये कोट्यवधी रुपयांची भूमिपूजनाचे कार्यक्रम ते करत आहेत. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना बळ देण्याचा प्रयत्न केला. तसेच शिवसेना-भाजप व राष्ट्रवादी (अजित पवार गट) एकत्रितपणे सगळ्या निवडणुका लढणार असल्याचेही ते म्हणाले.

उदय सामंत यांनी यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे कौतुक केले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक वाक्य म्हटले होते 'मी पुन्हा येईन' आणि ते पुन्हा येण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांनी दिलेले योगदान महत्त्वाचे आहे. त्यामुळे आम्ही देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचाही सन्मान मुख्यमंत्री शिंदे यांच्या एवढाच करतो, असेही सामंत म्हणाले.

या मतदारसंघातील जनतेने मला प्रेम दिले. या जनतेची साथ कायम आहे, तोपर्यंत मला कोणीही येथून बाजूला करू शकत नाही, असे थेट आव्हानच सामंतांनी विरोधकांना दिले. अंगावर आलात तर शिंगावर घेऊ, असा सज्जड दम भरत सामंतांनी विरोधकांचा समाचार घेतला. मी संयमी राजकारणी असून माझ्या कार्यकर्त्यांना त्रास दिला तर गाठ माझ्याशी आहे लक्षात ठेवा, अशा शब्दात त्यांनी विरोधकांवर घणाघात केला.

(Edited By - Ganesh Thombare)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT