Mahendra Dalvi : शिंदे गटाच्या आमदाराची 'महावितरण'च्या अभियंत्याला जीवे मारण्याची धमकी; ऑडिओ क्लिप व्हायरल

Shivsena Political News : अभियंता चुकीच्या पद्धतीने वसुली करत असल्याचा आरोप...
Mahendra Dalvi
Mahendra DalviSarkarnama
Published on
Updated on

Alibaug News : रायगड जिल्ह्यातील अलिबागचे शिवसेनेचे शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांनी महावितरणच्या मुरुड येथील राठोड नामक अभियंत्याला मोबाईलवरून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यांची व्हॉईस रेकॉर्ड क्लिप व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. यानंतर आमदार दळवींनी संबंधित अभियंत्यावर गंभीर आरोप केले आहेत.

आमदार महेंद्र दळवी यांनी महावितरणच्या मुरुड येथील अभियंत्याला धमकी दिल्याची व्हॉईस रेकॉर्ड क्लिप व्हायरल झाल्यानंतर त्यांनी आपली बाजू मांडली आहे. ते म्हणाले, महावितरण राठोड या अभियंत्याने आपल्याला चुकीच्या पद्धतीने बोलल्यामुळेच आपल्याकडूनही एखादा शब्द गेला असेल.

चुकीच्या पद्धतीने तडजोडी करत वसुली मोहीम राबवली जात असेल तर ते कोणीही सहन करणार नाही. हा प्रश्न जनतेचा आहे म्हणून आपण लक्ष घातले आहे. यामध्ये माझे वैयक्तिक काही नाही असेही आमदार दळवी यांनी स्पष्ट केले.

Mahendra Dalvi
Modi Government: हिवाळी अधिवेशनात मोदी सरकारने मंजूर केलेल्या तीन विधेयकांचा मार्ग मोकळा; राष्ट्र्पतींनी दिला 'ग्रीन सिग्नल'

महावितरणचा (Mahavitaran) अभियंता मुरुड शहरात चुकीच्या पद्धतीने लाईट बिले वसुली करत होता अशा अनेक तक्रारी आल्या होत्या. त्याच्याविरोधात पोलीस ठाण्यातही काही तक्रारी दाखल झाल्या आहेत. काही नगरसेवकांनीही हा प्रकार आपल्या लक्षात आणून दिला.

यावरूनच आमदार दळवी यांनी त्या अभियंत्याला कॉल करून त्याला इशारा दिला आहे. यावेळी या अभियंत्याने आपल्याला हे आमदारांचे काम नाही अशा स्वरूपाची अपमानास्पद भाषा वापरल्याची माहिती दळवी यांनी दिली आहे.

आमदार महेंद्र दळवी व मुरुड शहरातील येथील महावितरण चा अभियंता राठोड यांच्यातील संभाषणाची ही व्हॉइस क्लिप सध्या सोशल मीडियावरती व्हायरल झाली आहे. यावेळी दळवी यांनी या अभियंत्याची तत्काळ बदली करावी अशी मागणी महावितरणच्या वरिष्ठ अभियंतांना कॉन्फरन्स कॉल वर घेऊन केली आहे. आमदार दळवी यांच्या मागणीप्रमाणे आता या अभियंताची बदली होते किंवा याकडे अनेकांचे लक्ष आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

कोकणात (Kokan News) सध्या पर्यटक मोठ्या प्रमाणात आले आहेत त्यामुळे सध्याही वसुली मोही 31 डिसेंबर पर्यंत थांबवा अशी सूचना आपण त्या अभियंत्याला केली. मात्र यावर त्याने आम्हाला कायद्याने वसुली करायची आहे आणि हे काही आमदारांचे काम नाही अशी भाषा वापरल्याची माहिती दळवी यांनी दिली आहे.

आपण हा सगळा अन्यायकारक प्रश्न जनतेसाठी मांडला व आपण सुद्धा एक ग्राहक आहोत त्यामुळे सेवा देणे तुमचे काम आहे असेही आपण त्या अभियंत्याला सुनावल्याचे दळवी यांनी सांगितले.

(Edited By Deepak Kulkarni)

Mahendra Dalvi
Modi Goverment : मोदी सरकार करणार मोठी घोषणा; 48 लाख कर्मचाऱ्यांचा पगार वाढणार !

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com