Mira Bhayandar Non Veg Ban Sarkarnama
कोकण

Non Veg Ban : मिरा-भाईंदरमध्ये भाजपची 'मांसाहारबंदी'! 25 वर्षांची परंपरा मोडली; स्वकीय नगरसेवकांचाच संताप

Mira Bhayandar civic body non-veg food menu controversy sparks anger among Agri-Koli corporators as BJP faces questions over the six-month-old change : महासभेच्या जेवणातून सहा महिन्यांपासून मासे, चिकन-मटण गायब; आगरी-कोळी नगरसेवकांमध्ये नाराजी, जैन मतपेढीच्या राजकारणावरून विरोधकांचा भाजपला घेराव!

Pradeep Pendhare

Mira Bhayandar Municipal Corporation : भाजपची सत्ता असलेल्या मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेतील जेवणातून गेल्या सहा महिन्यांपासून मांसाहारी पदार्थ वगळण्यात आले आहेत.

महापालिका प्रशासनाने याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केली नसली, तरी ही अघोषित बंदी असल्याचे महापालिकेसह शहरातील राजकीय चर्चेला तोंड फुटले आहे. जेवणातील मांसाहरी पदार्थ वगळल्याने राजकीय आणि सांस्कृतिक वादाला तोंड फुटले आहे. या अघोषित बंदीवरून महापालिकेतील आगरी-कोळी नगरसेवकांत तीव्र नाराजी पसरली आहे.

महासभेचे कामकाज तीन तासांपेक्षा जास्त काळ चालल्यास नगरसेवक, अधिकारी आणि पत्रकारांसाठी मिरा-भाईंदर महापालिका (Municipal Corporation) प्रशासनातर्फे जेवणाची सोय केली जाते. गेल्या 25 वर्षांपासून या मेन्यूमध्ये शाकाहारी जेवणासोबतच स्थानिक आगरी-कोळी पद्धतीच्या मांसाहारी (मासे, चिकन, मटण) पदार्थांचा समावेश होता. तशी अलिखित परंपराच झाली होती. मात्र, मागील सहा महिन्यांपासून केवळ शाकाहारी जेवणच दिले जात आहे.

मिरा-भाईंदर महापालिकेत भाजपची (BJP) सत्ता आहे. मिरा-भाईंदर हे मूळचे आगरी-कोळी समाजाचे शहर! महापालिका प्रशासनाने अघोषितपणे महासभेच्या जेवणातून मांसाहारी पदार्थ वगळल्याने भाजपच्या सत्ताधाऱ्यांनी थेट आगरी-कोळी समाजाच्या मांसाहार हा स्थानिक खाद्यसंस्कृतीला धक्का लावला आहे. यामुळे या अघोषित बंदीविरोधात शिवसेना आणि काँग्रेसच्या नगरसेवकांसह सत्ताधारी भाजपमधील आगरी-कोळी समाजाच्या नगरसेवकांनीही तीव्र नाराजी व्यक्त करू लागले आहेत.

भाजपचे नगरसेवक या मांसाहार वगळ्याने नाराजी व्यक्त करत असले, तरी जैन धर्मियांच्या एकगठ्ठा मतपेढीमुळे सत्ता मिळाल्यामुळे सहा महिने या अघोषित बंदीबाबत सत्ताधारी भाजपने मौन बाळगून आहे. या मांसाहार बंदीबाबत प्रशासनाला नेमके कोणाचे आदेश आहेत, यावर सत्ताधारी भाजप आणि विरोधक नगरसेवकांमध्ये चर्चा सुरू झाल्या आहेत. सत्ताधारी भाजपमध्ये असलेल्या आगरी-कोळी नगरसेवकांनी याबाबतच्या आदेशाची माहिती विरोधकांना पुरवण्यास सुरूवात केली आहे. यावरून राजकीय रणकंदन होण्याची शक्यता वर्तवली जात असून, महापालिकेतील सत्ताधारी भाजपमध्ये फूट पडण्याची शक्यता आहे.

स्थानिक माध्यमांच्या आणि विरोधी पक्षांनी सत्ताधाऱ्यांच्या छुप्या राजकीय कट-कारस्थानावर यावरून निशाणा साधण्यास सुरूवात केली आहे. जैन समाजाच्या मतपेढीला खूश करण्यासाठी आणि शहराचे नेतृत्व करणाऱ्या जैन समाजातील नेत्यांच्या प्रभावामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचा आरोप विरोधकांनी सुरू केला आहे. यातून आगामी काळात मिरा-भाईंदर शहरातील राजकीय आणि सांस्कृतिक वाद पेटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

राजकीय वाद उफळण्याची शक्यता लक्षात घेऊन, प्रशासन सावध झाले आहे, तीन तासांपेक्षा जास्त काळ सभा सुरू राहिल्यास, प्रशासनाकडून जेवण दिले जाते, एवढीच प्रतिक्रिया महापालिकेचे सचिव दिनेश कानगुडे यांनी दिली. हे जेवण शाकाहार असते की मांसाहार, हे सांगण्यात नकार दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT