Ratnagiri Government Hospital Sarkarnama
कोकण

Ratnagiri : ऐन मध्यरात्री आमदारानं केलं जिल्हा रुग्णालयाच्या कारभाराचं 'ऑपरेशन' : डॉक्टरांना झापलं...

Ratnagiri Government Hospital:. एखाद्या रुग्णाचा जीव गेला तर जबाबदार कोण?

सरकारनामा ब्यूरो

Ratnagiri: जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या 'कारभारा'बाबत अनेक तक्रारी येत असतात. रुग्णालयातील काही नातेवाईकांना बसण्यासाठी असलेल्या जागा लॉक असतात, त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. अशातच आता ठाकरे गटाचे राजापूर-लांजा विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजन साळवी यांनी रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या कारभाराचा मध्यरात्रीच पंचनामा केल्याने खळबळ उडाली आहे.

मतदारसंघातील दौरा आटोपून साळवी रत्नागिरीकडे आपल्या घरी येत असताना त्यांना रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात तीन ते चार तास कोणीही डॉक्टरच उपलब्ध नसल्याची माहिती मिळाली. त्यानंतर त्यांनी मध्यरात्री थेट रत्नागिरी जिल्हा रुग्णालय गाठले. साळवी यांनी रुग्णालयामध्ये अचानक भेट दिल्याने कर्मचाऱ्यांची चांगलीच धांदल उडाली.

साळवींनी डॉक्टर व कर्मचाऱ्यांना धारेवर धरले. मेडिकल कॉलेजचे डीन येत नाहीत, तोवर जिल्हा रुग्णालयातून हलणार नाही, अशी आक्रमक भूमिकाही आमदार राजन साळवी यांनी घेतली. त्यानंतर मेडिकल कॉलेजचे डीन जिल्हा रुग्णालयामध्ये तातडीने दाखल झाले. एखाद्या रुग्णाचा जीव गेला तर जबाबदार कोण? असा खडा सवाल करीत त्यांनी डॉक्टरांना झापले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

चुकीच्या पद्धतीने उत्तर द्याल तर खबरदार...

'रुग्णांना चुकीच्या पद्धतीने उत्तर द्याल तर खबरदार,' या शब्दात साळवींनी त्यांची कानउघाडणी केली. जिल्हा रुग्णालयामध्ये ग्रामीण आणि दुर्गम भागातून रुग्ण येत असतात. अशा वेळी डॉक्टर उपलब्ध नसतील, तर रुग्णांनी नेमकं करायचं तरी काय? असा सवाल साळवींनी उपस्थित असलेल्या जिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना केला.

सरकारला भूमिका घेण्यास भाग पाडणार...

साळवी यांनी संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला. ही परिस्थिती गंभीर असून यामध्ये रुग्णांचे हाल होता कामा नये, अशी तंबी त्यांनी दिली. मेडिकल कॉलेजच्या डीन यांनादेखील धारेवर धरले. जिल्हा रुग्णालयाच्या कामात स्वतः लक्ष घालणार असून राज्य सरकारला याबाबत भूमिका घेण्यास भाग पाडू, असा पवित्रा राजन साळवी यांनी घेतला आहे. साळवी यांनी जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या कारभाराबाबत तीव्र संताप व्यक्त करीत रुद्रावतार धारण केल्यानंतर आता जिल्हा प्रशासन व शासन कोणती भूमिका घेते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Edited by: Mangesh Mahale

R...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT