Solapur: दिव्यांग महिलेनं मागितलं होतं घर अन् साकारला 30000 घरांचा प्रकल्प...!

RAY NAGAR: कॉम्रेड आडम मास्तर यांना रे नगरची कल्पना कशी सुचली...
RAY NAGAR News
RAY NAGAR NewsSarkarnama
Published on
Updated on

Solapur: सोलापुरातील हजारो असंघटित कामगारांसाठी रे नगर प्रकल्प हा एक आशेचा किरण म्हणून ओळखला जातो. कॉम्रेड नरसय्या आडम यांच्या दुरदृ्ष्टीतून साकारलेल्या देशातील या सर्वात मोठ्या गृहनिर्माण प्रकल्पाचे हस्तांतर 19 जानेवारी 2024 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार आहे.

तब्बल 30000 घरांच्या या भव्य प्रकल्पाच्या निर्मितीमागील कल्पनेची गोष्टही तितकीच संघर्षाची आहे. या प्रकल्पाचे मूर्त स्वरूप म्हणजे असंघटित कामगारांच्या न्याय हक्कासाठी सुरू केलेल्या लढ्याचे आडम मास्तरांना मिळालेले आणखी एक नेत्रदीपक यश असल्याची पोचपावतीच आहे. दरम्यान, कॉम्रेड आडम मास्तर यांना रे नगरची कल्पना कशी सुचली याबाबतचा हा विशेष रिपोर्ट...

रे नगर म्हणजेच राजीव गांधी आवास योजनेतून(RAY) मंजूर झालेला असंघटित कामगारांसाठी तब्बल 30000 घरांचा प्रकल्प. यातील 15000 घरांचे लोकार्पण पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते केले जाणार आहे. या प्रकल्पाचे भूमिपूजनदेखील 2019 मध्ये मोदींनीच केले होते. आडम मास्तर यांच्या प्रयत्नातून साकारलेला हा पहिलाच प्रकल्प नाही.

सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील असंघटित कामगारांच्या मूलभूत गरजा आणि न्याय हक्कासाठी लढणाऱ्या आडम मास्तर यांनी यापूर्वी 2006 मध्ये तब्बल 10000 बिडी कामगार महिलांना केंद्र आणि राज्य सरकारच्या मदतीने स्वस्तात घरे मिळवून दिली होती. त्यानंतर आता 30000 घरांचा प्रकल्प पूर्णत्वास जात आहे. त्यातील 15000 घरांच्या चाव्या लाभार्थ्यांना हस्तांतरित करण्यात येणार आहेत.

2006 मध्ये पूर्ण झालेला कॉ.गोदुताई परुळेकर गृहनिर्माण हा प्रकल्प केवळ बिडी कामगार महिलांसाठीच होता. मात्र, समाजात अशाप्रकारचे अनेक असंघटित कामगार आहेत. ज्यांच्यासाठी पक्क्या घरांचा विचारदेखील दुरापास्त होता. अशातच 2009 च्या विधानसभा निवडणुका झाल्या. त्यानंतर आडम मास्तर नेहमीप्रमाणे सोलापूरच्या दत्तनगर येथील आपल्या कार्यालयात आले होते.

एक दिवशी इतर कामागारांप्रमाणे एक दिव्यांग महिलादेखील आडम मास्तर यांच्या भेटीसाठी कार्यालयात आली. त्यावेळी आडम मास्तरांनी तिची विचारपूस केली असता, त्यावेळी त्या महिलेने माझी आर्थिक परिस्थिती हलाखीचे आहे, राहायला घर नाही. पावसाळ्यात राहण्याची व्यवस्था होत नसून गोदूताई नगरमध्ये मला एक घर द्यावे, अशी मागणी केली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आडम मास्तर हे कामगारांच्या प्रश्नाकडे नेहमीच सहानुभूतीने पाहतात. त्यांना त्या दिव्यांग महिलेच्या परिस्थितीची जाणीव झाली. मात्र, त्यांनी त्या महिलेला गोदूताई नगरमध्ये घर देण्यास नकार दिला. कारण ती योजना फक्त बिडी कामगार महिलांसाठी होती. शिवाय त्या योजनेतून ज्यांना घरे मंजूर झाली होती. त्या सर्वांना ताबा दिला असल्याचे त्यांनी त्या महिलेला सांगितले. तरीही ती महिला काकुळतीला येऊन या योजनेतून घर मिळवून देण्यासाठी विनंती करू लागली. मात्र, ते वास्तविकदृष्ट्या शक्य नव्हते. त्यामुळे आडम मास्तरांनीही घर देण्यास अमर्थता दर्शवली. तेथून ती महिला रडत माघारी गेली.

आजवर कामगारांच्या डोळ्यातील अश्रू पुसण्यासाठी धडपडणाऱ्या आडम मास्तरांना तिचे अश्रू पाहून मनात अस्वस्थता निर्माण झाली आणि याच घटनेतून त्यांना ही रे नगरची कल्पना सुचली. समाजात अनेक कामगार असे आहेत, की ते रस्त्याच्या कडेला, पत्र्याचा घरात, कुडाच्या भिंती, झपरे, प्लास्टिकच्या पालांचा आडोसा करून उघड्या आभाळाचे पांघरून करून वास्तव्य करतात. सोलापूर शहराच्या झोपडपट्टी भागात तशा वसाहती आडम मास्तरांनीही पाहिल्या होत्या. त्यामुळे त्यांना त्या दिव्यांग महिलेच्या एका उदाहरणावरून समाजातील अशा कित्येक असंघटित कामगारांना परवडणारी घरे मिळवून देण्याची कल्पना सुचली आणि सुरू झाला रे नगर उभा करण्यासाठी आणखी एक संघर्षमय प्रवास..

Edited by: Mangesh Mahale

RAY NAGAR News
Sushilkumar Shinde: सुशीलकुमार शिंदेंची 'चाय पे चर्चा';चंद्रकांतदादा शिंदेंची घेणार भेट

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com