Rajan Salvi Sarkarnama
कोकण

Rajan Salvi News : आमदार राजन साळवींच्या पत्नींना अश्रू अनावर; नेमकं काय घडलं ?

Sachin Waghmare

Ratnagiri News : कोकणात लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले आहे. अशातच ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्या कुटुंबियांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. 4 मार्च रोजी पहिल्या दिवशी अँटीकरप्शन रत्नागिरी उपविभागीय कार्यालयात साळवी यांची पत्नी अनुजा यांची तब्बल चार तास चौकशी करण्यात आली आहे.

या चौकशीनंतर माध्यमांजवळ बोलताना आमदार राजन साळवी यांच्या पत्नी अनुजा यांनी सांगितले की, मी माझ्या चौकशीत व्यवसायाची सगळी माहिती दिली आहे. मात्र, एसीबी कार्यालयातील आरोपीच्या रजिस्टरवर सही करावी लागली असे सांगताना अनुजाना अश्रू अनावर झाले. आमदार राजन साळवी व त्यांच्या कुटुंबीयांवर यांच्यावर यापूर्वीच अँटी करप्शनकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

(Rajan Salvi News)

मंगळवारी पुन्हा रत्नागिरी येथील अँटी करप्शन कार्यालयातही चौकशी होणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर विधानसभा मतदारसंघाचे ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांना व त्यांच्या कुटुंबीयांना न्यायालयाने दोन एप्रिलपर्यंत जामीन मंजूर केला आहे. दरम्यान, सोमवारी त्यांच्या कुटुंबीयांची पुन्हा एसीबी (ACB) कार्यालयात तब्बल चार तास चौकशी करण्यात आली.

राजन साळवी यांच्या पत्नी अनुजा व मुलगा शुभम यांचे व्यवसाय आणि मालमत्तेसंदर्भात तब्बल चार तास चौकशी करण्यात आली. दरम्यान 4 ते 8 मार्चपर्यंत दररोज चार तास हजेरी लावण्याचे आदेश राजन साळवी यांच्या पत्नीला व मुलाला देण्यात आले आहेत. उद्यादेखील राजन साळवी आणि त्यांच्या कुटुंबीयांना चौकशीसाठी हजर राहावे लागणार आहे. पत्नी, मुलगीची चौकशी झाल्यानंतर आमदार राजन साळवी यांची वहिनी अनुराधा भाऊ दीपक साळवी यांची चौकशी अँटीकरप्शनकडून केली जाणार आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

याप्रकरणी आमदार राजन साळवी (Rajan Salvi) त्यांच्या पत्नी अनुजा साळवी, मुलगा शुभम राजन साळवी यांच्याकडे रत्नागिरी शहर हद्दीत व रत्नागिरी जिल्हयामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी असलेले ज्ञात उत्पन्न, खर्च व मालमत्ता विचारात घेण्यात येवून, त्यांच्या ताब्यात ज्ञात उत्पन्नापेक्षा जास्त एकूण 3,53,89,752/- रुपये इतकी अपसंपदा म्हणजेच 118.96 % अपसंपदा संपदित केली असल्याचे स्पष्ट झाले आहे.

त्याबाबतचा समाधानकारक खुलासा त्यांनी सादर न केल्याने त्यांच्यावर एसीबीकडून गुन्हा दाखल करण्यात आला होता. 18 जानेवारी रोजी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल आहे. या प्रकरणी ही चौकशी सुरू आहे.

SCROLL FOR NEXT