प्राप्तिकर खात्याला दाखवलेल्या उत्पन्नापेक्षा जास्त संपत्ती असल्याच्या आरोपावरून आमदार राजन साळवी यांच्या कुटुंबीयांची आज लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडून चौकशी केली जाणार आहे.
ठाकरे गटाचे (Thackeray Group) आमदार राजन साळवी यांच्या पत्नी अनुजा, मुलगा शुभम आणि भाऊ दीपक साळवी यांना आज दुपारी 1 वाजता रत्नागिरीतील एसीबीच्या कार्यालयात हजर राहण्यास सांगितले आहे.
एसीबीने यापूर्वीच आमदार साळवी आणि त्यांच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे आजच्या चौकशीत काय घडणार याची सर्वांनी उत्सुकता लागली आहे.
राजन साळवी हे कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा-राजापूर मतदारसंघाचे ठाकरे गटाचे आमदार आहेत. त्यांच्याकडे बेकायदा संपत्ती असल्याचा आरोप आहे. त्यांची यापूर्वी अलिबागमधील एसीबी कार्यालयात तसेच रत्नागिरीतील एसीबी कार्यालयात चौकशी झाली आहे.
एसीबीने (ACB) 18 जानेवारीला राजन साळवी यांच्या रत्नागिरीतील निवासस्थानासह तीन ठिकाणी छापे टाकून झाडाझडती घेतली होती.. त्यानंतर आमदार साळवी यांच्यासह त्यांच्या पत्नी आणि मुलावर गुन्हे दाखल केले आहेत. त्यानंतर रत्नागिरी अँटी करप्शनने त्यांना 22 जानेवारीला बंधू दीपक साळवी यांच्यासह रत्नागिरीच्या (Ratnagiri) अँटी करप्शन कार्यालयात हजर राहण्याची नोटीसही बजावली होती. त्याप्रमाणे दोघांचीही चौकशी झाली.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
या सर्व प्रकरणात आमदार साळवी तसेच त्यांच्या कुटुंबीयांनी अटकपूर्व जामीन मंजूर करून घेतला आहे. त्यामुळे आज आमदार साळवी यांच्या कुटुंबीयांच्या चौकशीत आणखी कोणत्या बाबी उघड होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
आमदार राजन साळवी त्यांच्या पत्नी अनुजा, मुलगा शुभम यांच्याकडे रत्नागिरी शहर हद्दीत तसेच रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी ऑक्टोबर 2009 ते 2 डिसेंबर 2022 या कालावधीमध्ये घोषित उत्पन्नापेक्षा एकूण 3 कोटी 53 लाख 89 हजार 752 रुपयांची म्हणजेच 118.96 टक्के जास्त अपसंपदा असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याबाबतचा समाधानकारक खुलासा त्यांनी सादर न केल्याने त्यांच्यावर एसीबीने गुन्हा दाखल केला आहे.
(Edited by Avinash Chandane)
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.