CM Devendra Fadnavis and Uddhav Thackeray flew together; vaibhav khedekar and Uday Samant  sarkarnama
कोकण

Uday Samant : सामंतांच्या 'त्या' स्टेटसवरून भाजप नेत्याचा धक्कादायक दावा : नव्या आरोपाने खळबळ; 'फडणवीसांचा फोन आला नसता तर ते कदाचित...'

Vaibhav Khedkar on Uday Samant : एकीकडे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एकाच विमानातून प्रवास करत होते. तेव्हाच शिवसेनेचे नेते तथा उद्योग मंत्री उदय सामंत यांनी एक स्टेटस ठेवले आणि नव्या वादाला तोंड फुटले आहे.

Aslam Shanedivan

Kokan Political News : राज्यात एकीकडे ऑपरेशन टायगरमुळे मोठा राजकीय भूकंप झाला असून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्याचा दौरा करून बंडखोर खासदारांच्या मतदारसंघात पक्षाची मोट बांधताना दिसत आहेत. अशातच विदर्भात जाताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ठाकरे यांनी एकाच विमानातून प्रवास केला. यावेळी फडणवीस यांनी ठाकरेंबरोबर हस्तोंदोलन केले.

याचवेळी शिवसेनेचे नेते तथा उद्योग मंत्री उदय सामंत यांनी व्हॉट्सॲप स्टेस्टस ठेवत ठाकरेंना डिवचलं. सध्या या व्हॉट्सॲप स्टेस्टसची राजकीय चर्चा सुरू झाली आहे. अशातच भाजपचे नेते वैभव खेडकरांनी यांनी उदय सामंत यांना व्हॉट्सॲप स्टेस्टसवरून डिवचले आहे. त्यांनी, उदय सामंत यांनी योग्य व्यक्तीचा हात धरलेला असून त्याचंच हे सूचक आणि योग्य स्टेटस असल्याचे म्हणत चिमटा काढला आहे.

विदर्भातील विमान प्रवासादरम्यान फडणवीस आणि ठाकरे एकत्र आल्यावरून शिंदेंच्या शिवसेनेत खळबळ उडाली. यावरून उदय सामंत यांनी व्हॉट्सॲपवर सूचक स्टेटस ठेवले. या स्टेट्‍समध्ये योग्य लोकांचे हात हातात असतील तर चुकीच्या लोकांची साथ धरायची कधीच वेळ येत नाही, असे म्हणत स्टेट्‍समध्ये धनुष्यबाण आणि कमळ चिन्ह ठेवले. यामुळे यामुळे नव्या चर्चांसह राजकीय वर्तुळात विविध तर्क-वितर्कांना उधाण आले.

यावरूनच आता उदय सामंत हे फडणवीस यांचे विश्वासू सहकारी आहेत. तेच शिवसेना फोडणार होते, असा दावा खासदार संजय राऊतांनी यापूर्वी केला होता. तर अनेकदा तसा आरोप देखील करण्यात आला होता. मात्र आता भाजपने देखील यावर तोंडसुख घेतले आहे. भाजप नेते वैभव खेडकर यांनी यावरून सामंत यांच्यावर हल्लाबोल करत गुवाहाटीच्या उठावा वेळी शेवटच्या क्षणी फडणवीसांचा फोन गेला नसता तर ते कदाचित या ठिकाणी नसते, असे म्हणत सामंतांना डिवचले आहे. तर या धक्कादायक दाव्यानंतर आता शिंदे शिवसेनेत खळबळ उडाली आहे.

तसेच खेडकर यांनी फडणवीस यांनी सांगितल्यामुळे सामंत आज महायुतीमध्ये आहेत. त्यांनी योग्य व्यक्तीचा हात धरला असून त्यांचं हे सूचक आणि योग्य स्टेटस आहे. महाराष्ट्राची धूरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हाती गेल्यानंतरच राज्याची प्रगती झालीय. यामुळे आता सामंतच नव्हे तर या राज्यातील प्रत्येक व्यक्तीला महाराष्ट्राची धुरा फडणवीस यांच्याच हाती राहावी असे वाटतं.

आता माझ्यासारखे तरुण कार्यकर्ते असो वा उदय सामंत त्यांना ही फडणवीस यांच्या हाताखाली काम करावे असेच वाटतं असतं. आता ते भविष्यात या ठिकाणी अजून पुढे असतील, असा दावा खेडकर यांनी केला आहे. यामुळे खेडकर यांनी उदय सामंत यांची अचूक नाडी पकडल्याची राजकीय गोटात जोरदार चर्चा आहे.

सामंतांच्या व्हॉट्सॲपमध्ये काय?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांनी इंडिगो विमानाने एकत्र प्रवास केला. यावेळी उभय नेत्यांमध्ये चर्चा झाली. याचवेळी उदय सामंत यांनी आपल्या व्हॉट्सॲप स्टेस्टसवर पोस्ट टाकली. ज्यात त्यांनी योग्य लोकांचे हात हातात असतील, तर चुकीच्या लोकांची साथ धरायची वेळ येत नाही, असे लिहिले होते. ज्याची जोरदार चर्चा झाली. यावरून टीका देखील झाली.

यानंतर आपण असे स्टेटस का ठेवले यावर देखील स्पष्टीकरण सामंत यांनी दिले. सामंत म्हणाले की, स्टेटसची चर्चा व्हावी म्हणूनच मी ते स्टेटस ठेवलं होतं. शिंदे आणि फडणवीस यांच्यातलं बॉण्डिंग अतिशय विलक्षण असून कोणी दुसरा विमानामध्ये बसला म्हणून ते कमी होणार नाही. ते राजकारणाच्या पलीकडे आहे. पण आता चर्चा सुरू झाली आहे.

मात्र फडणवीस एका खिडकीकडे बसले होते तर उद्धव ठाकरे दुसर्‍या खिडकीकडे होते. त्यामुळे दोघांमध्ये चर्चा कशी होईल? हे मला कळलं नाही. पण फडणवीस यांनी मधली सीट रिकामी ठेवली होती. त्यामुळे पुढचं उत्तर मिळावं म्हणून मी हा स्टेटस ठेवला होता, असा खुलासा मंत्री सामंत यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT