Yogesh Kadam & Sanjay Kadam  Sarkarnama
कोकण

राष्ट्रवादीच्या माजी आमदाराची अरेरावी, शिवसेना आमदारांची विधानसभा उपाध्यक्षांकडे तक्रार..

माजी आमदार संजय कदम (Sanjay Kadam) यांच्या विरुद्ध हक्कभंग प्रस्ताव दाखल केल्याने दापोली विधानसभा मतदारसंघात खळबळ उडाली

सरकारनामा ब्यूरो

दाभोळ : आपणच आमदार असल्याचे जनतेला भासवून शिवसेनकडून (Shivsena) तसेच आपणाकडून मंजूर झालेल्या विकासकामांची भूमिपूजने माजी आमदार संजय कदम (Sanjay Kadam) करत आहेत. त्याना तसा अधिकार नाही. आपण त्यांच्या विरोधात विधानसभेचे उपाध्यक्ष यांचेकडे हक्कभंगाची तक्रार दाखल केली असल्याही माहिती आमदार योगेश कदम (Yogesh Kadam) यांनी पत्रकार परिषदेत दिली.

मुखमंत्री ग्रामसडक योजनेमधून मंजूर झालेला दापोली तालुक्यातील करंजाळी पावनळ, कात्रण रस्ता खडीकरण करणे व डांबरीकरण करणे या कामाचा कार्यादेश मिळाल्यावर संजय वसंत कदम (माजी आमदार) यांनी 25 जानेवारी 2022 रोजी मा.आ.संजय कदम, दापोली मंडणगड खेड विधानसभा मतदारसंघ यांच्या शुभहस्ते अशी पाटी लावली. राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याची या पाटीवर नावे आहेत. मी स्थानिक आमदार असतानाही या पाटीवर माझ्या नावाचा उल्लेख न करता जणू काही संजय कदम हेच दापोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत, असे पाटीवर लिहून भुमिपुजन समारंभ पार पाडला. त्यामुळे माझ्या हक्कावर संजय कदम गदा आणत आहेत.

नियम 273 अन्वये या गंभीर बाबीकडे तातडीने लक्ष देवून माझ्या हक्काचे संरक्षण करून सदर हक्कभंग स्वीकारून हक्कभंग समितीकडे प्रस्ताव पाठवून नियमाप्रमाणे संजय कदम यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी पत्राद्वारे विधानसभेचे उपाध्यक्ष यांच्याकडे केली असून सदर हक्कभंगाची सूचना उपाध्यक्ष यांनी स्वीकारली असल्याचे कदम यांनी सांगितले. आमदार योगेश कदम यांनी माजी आमदार संजय कदम यांचे विरुद्ध हक्कभंग प्रस्ताव दाखल केल्याने दापोली विधानसभा मतदारसंघात खळबळ उडाली असून आता विधानसभेचे उपसभापती कोणती कारवाई करतात याकडे दापोलीकरांचे लक्ष लागले आहे. या पत्रकार परिषदेला जिल्हा परिषदेचे माजी समाजकल्याण सभापती भगवान घाडगे, पंचायत समितीचे माजी सभापती प्रकाश कालेकर, माजी उपसभापती उन्मेष राजे उपस्थित होते.

याबाबत बोलतांना आमदार योगेश कदम म्हणाले की, एकदा पराभूत झाल्यावर माजी विधानसभा सदस्याला त्या मतदारसंघात त्यांच्या कालखंडात मंजूर झालेल्या विकासकामांचे भूमिपूजन अथवा उद्घाटनही करता येत नाही असा नियम असल्याची माहिती त्यांनी दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT