नरेंद्र मोदी पंतप्रधान कमी भाजपचे प्रचारकच जास्त; पटोलेंचा पलटवार...

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी काँग्रेसवर (Congress) केलेल्या टीकेला महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी (Nana Patole) प्रत्युत्तर दिले आहे.
Nana Patole- Narendra Modi
Nana Patole- Narendra ModiSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : कोरोना (Covid-19) हे जागतीक संकट होते. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात राजकारण केले गेले असून कोरोनाच्या पहिल्या लाटेत काँग्रेसने हद्दच केली होती. महाराष्ट्र सरकारवरील कोरोनाचा ताण कमी करण्यासाठी मुंबईमध्ये काँग्रेसने (Mumbai Congress) मोफेत तिकिट वाटले. त्यामुळे इतर राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढले, असा गंभीर आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी लोकसभेत केला. यावर काँग्रेसकडून महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी (Nana Patole) मोदींच्या आरोपांचा चांगलाच समाचार घेतला व मोदींच्या लोकसभेतील भाषण संपण्यापूर्वीच प्रत्युत्तर दिले आहे.

Nana Patole- Narendra Modi
महाराष्ट्रात मोफत रेल्वे तिकिटे वाटून काँग्रेसने कोरोना वाढवला : मोदींचा घणाघात

पटोले म्हणाले, "कोरोना लॉकडाऊनमध्ये काँग्रेसने माणूसकीचे नाते जपले व लोकांकडे पैसे नव्हते म्हणून लोकांना मदत केली. उलट काँग्रेसने मदत केली म्हणून शाबासकी द्यायला पाहिजे. मात्र, पंतप्रधानांकडून टीका केली जात आहे. रेल्वेचा कंट्रोल तर तुमच्याकडे होता. रेल्वे तुम्हीच सुरु केली. उत्तर प्रदेशमधील गंगेतील प्रेतांचा खच पडला, तिकडे कोरोना नियंत्रण करता आले नाही. म्हणून त्याचे हे पाप झाकण्याकरता काँग्रेसवर आरोप केले जात आहेत. मोदी हे पंतप्रधान कमी आणि भाजपचे प्रचारक जास्त वाटतात. मोदींनी असंवेदनशिलतेची हद्द पार केली आहे. आमच्यावर कोरोना पसरवल्याचा आरोप करत होते. पण नमस्ते ट्रम्प कोणी केले. तबलिकी समाजाला अधिवेशन कोणी घ्यायला लावले याची उत्तरे द्या, असा सवाल करत त्यांनी पंतप्रधानांच्या वक्तव्याचा समाचार घेतला.

Nana Patole- Narendra Modi
जेएनयूच्या कुलगुरूपदी नियुक्ती होताच शांतिश्री पंडित वादात; ट्विटर अकाऊंट केलं डिलिट

जेव्हा लॉकडाऊनची घोषणा केली तेव्हा रेल्वे, बस बंद करण्यात आल्या होत्या. भारत-पाकिस्तानचे विभाजन झाले तेव्हा जसे लोकांचे हाल झाले तसेच हाल त्यावेळी लोकांचे झाले आहे. त्यावेळी माणूसकीचे नाते जोपासायला हवे होते ते काँग्रेसने केले. त्याकाळात महिनाभर लोकांकडे रोजगार नव्हता, पैसे नव्हते त्यावेळी काँग्रेसने त्यांना मदत केली. या कामासाठी शाबासकी द्यायला हवी मात्र, टीका केली जात आहे. दरम्यानच्या काळात गोव्यात साडेआठहजार लोकांचे ऑक्सिजन नसल्यामुळे मृत्यू झाला आहे. भाजपच्या लोकांना तिथे कोणी उभे करत नाही. तसेच, देशातील कोरोना काळातील मृत्युच्या तांडवास मोदींचे चूकीचे नियोजन कारणीभूत आहे. भाजप देशातील उत्तर प्रदेशसह पाच राज्यांच्या निवडणूकीत पराभूत होत आहे. त्यामुळे अश्या प्रकारचे काँग्रेसवर आरोप लावत आहे, अशा शब्दात पटोलेंनी मोदींवर पलटवार केला आहे.

Nana Patole- Narendra Modi
Video: अभिनेत्री माही गिलचा भाजपमध्ये प्रवेश

मोदी म्हणाले, काँग्रेसने हद्दच केली..

पंतप्रधान मोदी यांनी लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर झालेल्या चर्चेला उत्तर देताना म्हणाले की, कोरोनाच्या पहिल्या लाटेत देशात लॅाकडाऊन होता. जागतीक आरोग्य संघटना आणि इतर देश लॅाकडाऊनचे समर्थन करत होते. जे लोक जिथे आहेत. त्यांनी तिथेच राहावे, असे सांगत असताना मुंबईमध्ये काँग्रेस पक्षाने उत्तर प्रदेश, बिहारमधील नागरिकांना परत जाण्यासाठी मोफत तिकिट वाटले. त्यामुळे मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी झाली. हे काम करुन काँग्रेसने आपल्यावरील जबाबदारी झटकली. उत्तर प्रदेश, बिहार आणि उत्तराखंडमध्ये कोरोनाचे रुग्ण कमी होते. मुंबई आणि दिल्लीतून गेलेल्या नागरिकांमुळे या राज्यात कोरोनाचे प्रमाण वाढले. हे पाप काँग्रेसने केले. कोरोना काळात काँग्रेसने हद्दच केली, असा गंभीर आरोप मोदींनी काँग्रेसवर केला. त्याच्या या आरोपामुळे काही वेळासाठी सभागृहात गोंधळ निर्माण झाला होता. त्यावर मोदींनी काँग्रेसचे हे राजकारण कधीपर्यंत चालणार आहे. काँग्रसेच्या या विचारामुळे संपूर्ण देश आश्चर्य चकीत झाला आहे, असा पुन्हा टोला लगावला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com