Raj Thackeray sarkarnama
कोकण

Raj Thackeray : राज ठाकरेंच्या कारवाईनंतर रत्नागिरीतून बडतर्फ नेत्याची भावनिक पोस्ट व्हायरल; म्हणाला, 'राज साहेब आम्हाला...'

Avinash Soundalkar on Raj Thackeray : राज ठाकरे यांनी आगामी स्थानिकच्या आधीच मोठा निर्णय घेत तळ कोकणात ताकद वाढवणाऱ्या नेत्यासह तिघांना पक्षाबाहेरचा रस्ता दाखवला होता.

Aslam Shanedivan

  1. राज ठाकरे यांनी रत्नागिरी मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश सौंदळकर यांची बडतर्फी केली.

  2. बडतर्फीनंतर सौंदळकर यांनी सोशल मीडियावर भावनिक पोस्ट टाकत "स्वप्नातही वाटलं नव्हतं" अशी खंत व्यक्त केली.

  3. ही पोस्ट प्रचंड व्हायरल होत असून मनसेत आणि रत्नागिरीत चर्चा रंगली आहे.

Ratnagiri News : तळ कोकणात आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांच्या बैठका, गाठीभेटी वाढल्या असून राजकीय मोर्चे बांधणीला वेग आला आहे. नुकताच रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठे दोन राजकीय पक्ष प्रवेश झाले असून आता तिसराही होणार आहे. राज ठाकरे यांनी रत्नागिरीत बडतर्फ केलेला खेडचा नेता भाजपच्या गळाला लागला असून उद्या (ता.23) मुंबई हा पक्ष प्रवेश होणार आहे. पण त्याआधी राज ठाकरे यांनी कारवाई केलेल्या मनसेचे दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष अविनाश सौंदळकर यांची सोशल मिडियावरची पोस्ट प्रचंड व्हायरल होत आहे. ज्यात त्यांनी आपली खंत आणि व्यथा मांडली असून 'राज साहेब आम्हाला बडतर्फ करतील, असं कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं' असे त्यांनी म्हटलं आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात अलिकडेच मनसेमधून खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खडेकर यांच्यासह काही पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी करण्यात आली होती. ज्यानंतर या सर्वांनी भाजपची वाट धरली होती. आधी 4 सप्टेंबर रोजी या सगळ्यांचा पक्षप्रवेश होईल अशी घोषणा मंत्री नितेश राणे यांनी केली होती. मात्र तो त्यावेळी पक्षप्रवेश होऊ शकला नाही. पण आता मंगळवारी मुंबई येथे हा प्रवेश होणार आहे. त्याआधी हकालपट्टी करण्यात आलेले सौंदळकर यांच्या वक्तव्याची चर्चा सुरू आहे.

सौंदळकर यांनी, राज साहेब आम्हाला बडतर्फ करतील असं कधीच स्वप्नातही वाटलं नव्हतं. आम्हाला आमची बाजू मांडण्याची संधी देखील दिली नाही. ती मिळाली असती, तर आज दुसऱ्या पक्षात प्रवेश करण्याती वेळ आलीच नसती, असेही त्यांनी म्हटलं आहे. सौंदळकर यांनी यांच्या पोस्टमध्ये मनसे आणि राज साहेब यांच्याशी गेल्या अनेक वर्षांपासून जिव्हाळ्याचे संबंध होते आणि ते राहतीलही. पण अशा पद्धतीने आम्हाला पक्षातून अचानक बडतर्फ करण्यात आले, याचेच दुःख होत आहे. हा बडतर्फ शब्द आमच्याबद्दल वापरला जाईल असेही कधी वाटले नव्हते. पण या निर्णयाच्या आधी किमान सन्माननीय साहेबांनी बाजू मांडण्याची एकतरी संधी द्यायला हवी होती. तसे प्रयत्न आम्ही केले होते. मात्र यश आले नाही, साहेबांची भेट झाली नाही असेही सौंदळकर यांनी म्हटले आहे.

कारणही अस्पष्टच

पक्षाने केलेल्या कारवाई बद्दल सौंदळकर यांनी म्हटले आहे की, मी पक्षाचा जिल्हाध्यक्ष असूनही कारवाई का केली याचे कारणही सांगण्यात आलेलं नाही. माझ्या माहितीनुसार मी गैरकाम कधीच केलेलं नाहीय. पक्ष वाढावण्यासाठी पदरचा पैसा खर्च केला, मेहनत घेतली, वेळ दिला, पक्षासाठी दोनदा आमदारकी लढलो. तर फक्त स्थानिक नेते वैभव खेडेकर यांच्या मतानुसार पदाधिकारी नेमले म्हणून कारवाई केलीय का? ही माझी चूक झाली का? असे प्रश्न देखील सौंदळकर यांनी उपस्थित केले आहेत.

तेव्हा मी मनसैनिक नसेन...

मी नियमात काम करत होतो. माझी प्रतिमा स्वच्छ आहे. यामुळेच मी सत्ताधारी आणि अधिकाऱ्यांवर दबाव टाकून होतो. पण आता दुर्दैव म्हणावे लागेल की मनसेनं मला बाहेर केलं. आता भविष्यात राज साहेब इकडे आले की त्यांची नक्कीच भेट घेईन पण मी त्यावेळी मनसैनिक नसेन. मी माझ्या हिंदुत्ववादी विचारांचा पक्ष असणाऱ्या भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. जनसेवेचा वसा हिच खुणगाठ कायम मनाशी बांधल्याचेही सौंदळकर यांनी म्हटलं आहे.

दरम्यान खेडेकर यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मिडियावर व्हायर होत असून त्यात सेवा परमो धर्म: असे म्हटले आहे. हा व्हिडिओ सहा मिनिटांचा असून यात सामाजिक व धार्मिक कार्याचा तसेच कोरोना काळात केलेल्या कामांचा आढावा घेण्यात आला आहे.

FAQs :

1. अविनाश सौंदळकर कोण आहेत?
ते मनसेचे दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष होते.

2. राज ठाकरे यांनी त्यांच्यावर काय कारवाई केली?
त्यांची मनसेमधून बडतर्फी करण्यात आली.

3. सौंदळकरांची पोस्ट का व्हायरल झाली?
कारण त्यांनी राज ठाकरे यांच्याकडून बडतर्फ होणं स्वप्नातही वाटलं नव्हतं, अशी भावनिक खंत व्यक्त केली.

4. या घटनेचा मनसेवर काय परिणाम झाला?
रत्नागिरीसह मनसेत असंतोष व चर्चा सुरू झाली आहे.

5. सौंदळकरांची पोस्ट कुठे प्रसिद्ध झाली?
त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली असून ती मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT