BJP-shivsena sarkarnama
कोकण

शिवसेनेला धक्का : भाजपत प्रवेश केलेल्या नगरसेवकांना अपात्र ठरविण्याच्या निर्णयास स्थगिती

रायगड जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाच्या विरोधात भारतीय जनता पक्षाने उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे शिवसेनेला (shivsena) धक्का बसला असून भारतीय जनता पक्षाला (BJP) मात्र दिलासा मिळाला आहे. माथेरान नगरपरिषदेतील शिवसेनेच्या दहा नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्या दहाही नगरसेवकांना रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी अपात्र ठरवले होते. जिल्हाधिकाऱ्यांच्या त्या निर्णयास मुंबई उच्च न्यायालयाने आज (ता. २९ नोव्हेंबर) स्थगिती दिली आहे. (Mumbai High Court gave stay decision to disqualify 10 Shiv Sena corporators who joined BJP)

माथेरान नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष तथा आरोग्य सभापती आकाश कन्हैया चौधरी, नगरसेवक राकेश नरेंद्र चौधरी, संदीप कदम, स्वीकृत नगरसेवक चंद्रकांत जाधव, सोनम दाभेकर, महिला बालकल्याण समितीचे सभापती, प्रतिभा घावरे, शिक्षण समितीचे सभापती, रुपाली आरवाडे, सुषमा जाधव, प्रियांका कदम, ज्योती सोनावळे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यांना अपात्र ठरविण्याचा निर्णय रायगडचे जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांनी दिला होता.

रायगड जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाच्या विरोधात भारतीय जनता पक्षाने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. उच्च न्यायालयाने दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून घेऊन शिवसेनेतून भाजपत दाखल झालेल्या नगरसेवकांना तातडीने अपात्र ठरविण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयाकडून स्थगिती देण्यात आली आहे.

भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत कोल्हापूर येथे माथेरानच्या शिवसेनेच्या दहा नगरसेवकांनी भाजपत प्रवेश केला होता. या पक्षांतराच्या निर्णयाविरोधात माथेरान नगरपरिषदेतील शिवसेनेचे गटनेते प्रसाद सावंत यांनी रायगडचे जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांच्याकडे पक्षांतरबंदी कायद्यानुसार तक्रार दाखल केली होती. त्याबाबत अखेरची सुनावणी जिल्हाधिकारी कल्याणकर यांच्यासमोर ता. 27 ऑक्टोबर रोजी झाली होती. त्यानंतर कल्याणकर यांनी दोन दिवसांनी म्हणजे २९ ऑक्टोबर रोजी त्यावर निकाल देत या दहाही नगरसेवकांना अपात्र ठरविण्याचा निर्णय दिला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT