भाजपचा दे धक्का! माजी मंत्र्यासह विरोधी पक्षांचे सात बडे नेते फोडले

उत्तर प्रदेशात पुढील वर्षाच्या सुरवातीला विधानसभा निवडणूक होत आहे. या निवडणुकीमुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे.
BJP
BJP Sarkarnama
Published on
Updated on

लखनौ : उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) पुढील वर्षाच्या सुरवातीला विधानसभा निवडणूक (Assembly Election) होत आहे. या निवडणुकीमुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. अनेक पक्षांकडून इतर पक्षांचे आमदार फोडण्याचे सत्र सुरू झाले आहे. आता भाजपने (BJP) विरोधकांना धक्का देत त्यांचे 7 बडे नेते फोडले आहेत. फोडाफोडीच्या राजकारणात राज्यात भाजपने मोठी आघाडी घेतल्याचे चित्र आहे.

समाजवादी पक्ष, बहुजन समाज पक्ष आणि काँग्रेस यासह इतर पक्षांचे हे नेते आहेत. समाजवादी पक्षाचे माजी मंत्री विजय मित्रा हे गाझीपूरचे माजी आमदार आहेत. समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांच्या मंत्रिमंडळात ते मंत्री होते. त्यांनी समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मिश्रा यांचा पूर्व उत्तर प्रदेशातील उच्च वर्णीय मतदारांवर मोठा प्रभाव आहे. मागील विधानसभा निवडणुकीत त्यांना अखिलेश यादव यांनी तिकिट नाकारले होते.

याचबरोबर बहुजन समाज पक्षाचे आणि काँग्रेससह इतर पक्षांचे सहा बडे नेते भाजपमध्ये दाखल झाले आहेत. यात काँग्रेसचे माजी राज्य सरचिटणीस जय नारायण तिवारी, बहुजन समाज पक्षाचे नेते मनोज दिवाकर, जगदेवक कुरील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. माजी सनदी अधिकारी अशोक कुमार सिंह, राम शिरोमणी शुक्ला आणि माजी आमदार अखिलेश वर्मा हे आता भाजपमध्ये दाखल आहेत.

BJP
अनिल देशमुख हाजिर हो! चौकशी समितीसमोर होणार झाडाझडती

दरम्यान, रायबरेलीतील काँग्रेसच्या आमदार आदिती सिंह या नुकत्याच भाजपच्या गोटात सामील झाल्या आहेत.विधानसभा निवडणुकीआधी हा काँग्रेसला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे. रायबरेली हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. सध्या या लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी करीत आहेत. रायबरेली विधानसभा मतदारसंघ मागील 6 निवडणुकांपैकी 4 वेळा काँग्रेसच्या ताब्यात राहिला आहे. दोन वेळा म्हणजेच 2007 आणि 2012 मध्ये पक्षातून हकालपट्टी झालेले अखिलेश कुमार सिंह यांनी तेथून विजय मिळवला होता. आदिती या अखिलेश कुमार सिंह यांच्या कन्या आहेत.

BJP
परमबीरसिंहांचा पाय खोलात! वाझेसोबतची भेट पडणार महागात

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आधी समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी आमदार फोडाफोडी सुरू केली होती. त्यांनी बहुजन समाज पक्षाचे 6 आणि भाजपचा 1 आमदार फोडला होता. त्यानंतर भाजपने त्यांना जशास तसे उत्तर दिले होते. विधान परिषदेवरील समाजवादी पक्षाच्या चार आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. समाजवादी पक्षाच्या आमदार रमा निरंजन यांच्यासह चौघे भाजपमध्ये दाखल झाले होते. रमा निरंजन यांच्या पतीनेही भाजपमध्ये प्रवेश केला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com