एमआयएमच्या नगरसेविका रोशन इरफान शेख यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरवण्यात आले.
जात पडताळणी समितीच्या निर्णयामुळे त्यांचे पद धोक्यात आले आहे.
या निर्णयामुळे मुंबईच्या स्थानिक राजकारणात खळबळ उडाली आहे.
Mumbai News : ठाणे महापालिकेत निवडणूक जिंकत एमआयएमची नगरसेविका सहर शेख या 'कैसे हराया' म्हणत राज्यभर चर्चेत आल्या. पण अवघ्या तीनच महिन्यांत सहर शेखचं नगरसेवकपद धोक्यात आलं आहे. सहर शेख यांच्यावर बनावट जात प्रमाणपत्र सादर करून शासकीय यंत्रणेची दिशाभूल केल्याचा ठपका ठेवण्यात आला असून त्यांचे नगरसेवक पदावरही टांगती तलवार आहे. यामुळे एमआयएमला धक्का लागल्याची चर्चा सुरू असतानाच मानखुर्द-शिवाजीनगर मतदारसंघात एमआयएमला जोरदार झटका लागला आहे. येथेही एमआयएमच्या महिला नगरसेविकेला मोठा कायदेशीर दणका बसला आहे. जात पडताळणी समितीने त्यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरवल्यामुळे त्यांचे नगरसेवकपद रद्द होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
मानखुर्द-शिवाजीनगर मतदारसंघातील ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एमआयएम) च्या नगरसेविका रोशन इरफान शेख यांना मोठा कायदेशीर दणका बसला आहे. जात पडताळणी समितीने त्यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरवल्यामुळे त्यांचे नगरसेवकपद रद्द होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
निवडणुकीदरम्यान रोशन शेख यांनी सादर केलेल्या जात प्रमाणपत्राबाबत समाजवादी पक्षाचे पदाधिकारी मोहम्मद मैफूज शेख यांच्याकडून तक्रार प्राप्त झाली होती. या कागदपत्रांची पडताळणी केली असता त्यामध्ये विसंगती आणि त्रुटी आढळल्या. जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने सखोल चौकशीअंती हे प्रमाणपत्र नियमबाह्य ठरवत ते रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
रोशन शेख यांनी मानखुर्द-शिवाजीनगर मतदार संघातून १,३४८ मताधिक्याने विजय संपादन केला होता; मात्र आता त्यांचे सदस्यत्व रद्द झाल्यास राजकीय समीकरणे वेगाने बदलू शकतात. नियमानुसार, पद रद्द झाल्यास त्यांच्यापाठोपाठ दुसऱ्या क्रमांकाची मते घेणारे उमेदवार मोहम्मद महमूद शेख यांना संधी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
न्यायालयात आव्हान देणार
या निर्णयामुळे एमआयएम पक्षाला मोठा राजकीय धक्का बसला असला तरी, रोशन शेख यांनी अद्याप हार मानलेली नाही. समितीच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देण्याची तयारी त्यांनी सुरू केली आहे. आम्ही कायद्याचा आदर करतो; परंतु या निर्णयाविरुद्ध लवकरच उच्च न्यायालयात दाद मागणार आहोत, अशी प्रतिक्रिया रोशन शेख यांच्या निकटवर्तीयांकडून देण्यात आली आहे. उच्च न्यायालय या प्रकरणावर काय निकाल देते आणि प्रशासकीय स्तरावर काय कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
रोशन शेख यांनी परभणीमधून बोगस जात प्रमाणपत्र बनवून घेतले. समितीने त्यासंदर्भात महापालिका आयुक्तांना निर्देशदेखील दिले आहेत. आयुक्तांनी या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करावी.-मोहम्मद महफूज शेख, तक्रारदार
1. रोशन शेख यांना कोणता धक्का बसला आहे
त्यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरवण्यात आले आहे
2. हा निर्णय कोणी दिला
जात पडताळणी समितीने हा निर्णय दिला आहे
3. याचा त्यांच्या पदावर काय परिणाम होईल
त्यांचे नगरसेवकपद रद्द होण्याची शक्यता आहे
4. हा प्रकार कुठल्या मतदारसंघात घडला
मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघात हा प्रकार घडला
5. या प्रकरणाचा पुढील परिणाम काय होऊ शकतो
स्थानिक राजकारणात बदल आणि निवडणुकीवर परिणाम होऊ शकतो
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.