NCP-Shivsena UBT Setback; NCP, Shivsena ubt and Shekap sarkarnama
कोकण

NCP-Shivsena UBT Setback : रायगडमध्ये उपसरपंचासह पाच सदस्य अपात्र, एकनाथ शिंदेंची शिवसेना सत्तेत

Borli Gram Panchayat By Elections Likely NCP, Shivsena ubt and Shekap Members Disqualified Over Election Expenses : मुरुड तालुक्यातील बोर्ली ग्रामपंचायत मधील पाच ग्रामपंचायत सदस्यांकडून निवडणूक खर्च विहित नमुन्यात व वेळेत दाखल न केल्यामुळे जिल्हाधिकारी रायगड यांनी त्यांना अपात्र ठरवले आहे.

Aslam Shanedivan

Raigad Politics : मुरुड तालुक्यातील बोर्ली ग्रामपंचायत मधील पाच ग्रामपंचायत सदस्यांकडून निवडणूक खर्च सादर न केल्याने सदस्य अपात्र ठरवण्यात आले आहेत. यामुळे त्यांचे आपोआप ग्रामपंचायत सदस्य पद गेले असून आता या ठिकाणी पोट निवडणुका लागणार आहेत. तर तालुक्यात एकाच वेळी पाच सदस्य केवळ खर्च अहवाल सादर न केल्याने अपात्रतेची झालेली ही पहिलीच घटना आहे. तर या कारवाईमुळे राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला असून उपसरपंच आपात्र ठरला आहे. तसेच ठाकरेंच्या शिवसेनेसह शेकापलाही झटका बसला असून शेकापचे तीन आणि ठाकरेंच्या शिवसेनेचा एक सदस्य अपात्र झाला आहे. या सर्वांना आता पुढील सहा वर्ष निवडणूक लढवता येणार नाही.

बोर्ली ग्रामपंचायत निवडणूक नोव्हेंबर 2023 मध्ये पार पडली. त्या वेळी थेट सरपंच शिंदेंच्या शिवसेनेचा उमेदवार निवडून आला होता. ग्रामपंचायतमध्ये एकूण 11 सदस्य होते. त्यापैकी सहा सदस्य शिंदेंच्या शिवसेनेचे आहेत. तर आता पाच सदस्य अपात्र ठरल्यामुळे शिवसेनेला एकहाती सत्ता प्राप्त झाली आहे. शिवसेना गटाचे थेट सरपंच व सदस्य बळ आघाडीवर आहे.

दरम्यान ग्रामपंचायत निवडणुकीत खर्चाचा अहवाल सादर न केल्याची तक्रार संजय जायपाटील यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती. या तक्रारीची शहानिशा करून मुरुड तहसीलदार यांनी उपायुक्तांना अहवाल दिला होता. जो त्यांनी जिल्हाधिकारी यांना सादर केला. ज्यानंतर शेकापचे मनोहर भोपी, लता वाघमारे व भारती राम बंदरी हे तीन सदस्य अपात्र झाले आहेत. तर उपसरपंच सिद्धिका चुनेकर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व उबाठा गटाच्या जगिता कोटकर यांना देखील झटका बसला असून ते देखील अपात्र ठरले आहेत.

अशा पद्धतीने एकाच वेळी पाच ग्रामपंचायत सदस्य अपात्र ठरल्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेला एकहाती सत्ता प्राप्त झाली आहे. तर एका कारणामुळे राष्ट्रवादी, ठाकरेंची शिवसेना आणि शेकापच्या सदस्यांवर सदसत्व रद्द होण्याची नामुष्की ओढवली आहे. या सदस्यांना आता पुढील 6 वर्षे निवडणूक लढवता येणार नाही.

या बाबत रायगड जिल्हा परिषद सदस्य विघ्नेश माळी यांनी सांगितले की, बोरली ग्रामपंचायतमध्ये विकासाला विरोध करणाऱ्या लोकांचा विलोप झाला असून आता बोरली ग्रामपंचायतमध्ये साजेसा विकास करता येणार आहे. शिवसेनेचा थेट सरपंच व सदस्य असल्याने ग्रामपंचायती वर शिवसेनेची एकहाती सत्ता असून आगामी काळात विविध विकास कामांना प्राधान्य देणार असून जनतेचा विश्वास सार्थ ठरवू.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT