Local body Elections MVA Politics sarkarnama
कोकण

MVA Politics : महाविकास आघाडी विस्कटली? नगराध्यक्षपदासाठी ठाकरेंसह शरद पवारांच्या शिलेदारांची फिल्डिंग, शिवसेनेचे अर्ज भरण्याचे आदेश

kokan politics : नगरपालिका निवडणुकीसाठी वरच्या पातळीवर महायुतीचा निर्णय झाला आहे. तर महाविकास आघाडीत प्राथमिक चर्चा सुरू आहे. मात्र स्थानिक पातळीवर महायुती असो की मविआतील घटक पक्षांमध्ये वाद सुरू आहे.

Aslam Shanedivan

  1. रत्नागिरी आणि चिपळूण येथील नगराध्यक्षपदावरून महाविकास आघाडीतील शिवसेना (उद्धव ठाकरे) आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तणाव निर्माण झाला आहे.

  2. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची घडी विस्कटल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

  3. दोन्ही पक्ष नगराध्यक्षपदासाठी आग्रही असून आघाडीतील तणाव वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Ratnagiri News : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांच्या मोर्चेबांधणीला वेग आला असून नगरपालिका आणि नगपरिषदांसाठी रणधुमाळी सुरू झाली आहे. जिल्ह्यात उमेदवारांना अर्ज भरण्याची मूदतही सुरू झाली असून अद्याप प्रमुख पक्षांकडून कोणीच अर्ज भरलेला नाही. यामुळे महायुती असो की महाविकास आघाडी यांच्यातील वाद मिटलेला नसल्याचेच दिसत आहे. दरम्यान महायुतीचे ठरल्याचे दिसत असतानाच मात्र महाविकास आघाडीची घडी येथे विस्कटल्याचे चित्र आहे.

जिल्ह्यातील रत्नागिरी, चिपळूण नगराध्यक्षपदाचा मुद्द्यावरून महाविकास आघाडीतील वाद अधिकच जटिल होत चालला आहे. या मुद्द्यावरून राष्ट्रवादी माघार घेण्यास तयार नाही. तर ठाकरेंच्या शिवसेनेनं पक्षाच्या उमेदवारांना उमेदवारी अर्ज भरण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. यामुळे आघाडीतील वाद सध्यातरी टोकाला जाण्याची शक्यता आहे. तर हा वाद किमान उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या मुदतीपर्यंत तरी मिटणार का असा सवाल आता इच्छुकांना सतावत आहे.

महाविकास आघाडीतील वाद निवडणुका जवळ येईल तसे वाढतच चालले आहेत. स्थानिक पातळीवरील राजकीय ताकद किंवा परिस्थितीचा विचार करून जागा सोडण्याचे अलिखित धोरण आहे. तरी रत्नागिरी आणि चिपळूणमध्ये परिस्थिती चिघळताना दिसत आहे. येथे नगराध्यक्ष पदासाठी आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आग्रही आहे. दोन्ही पक्षाकडून वरिष्ठ पातळीवर फोल्डिंग लावली गेली असून उमेदवारी आपल्यालाच मिळणार असे गृहीत धरून जोरदार तयारी केली जात आहे.

रत्नागिरीत उबाठाकडून बाळ माने यांची सून शिवानी माने ही इच्छुक आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून मिलिंद कीर यांची पत्नी आणि बशीर मुर्तुझा यांची पत्नी देखील इच्छुक आहे. त्यांनी अगदी सुप्रिया सुळे यांना भेटण्यापासून आघाडीतील नेत्यांशी चर्चा सुरू ठेवली आहे. इथे ते माघार घेण्यास तयार नाहीत. त्यामुळे तिढा कायम आहे.

चिपळूणमध्येदेखील अशीच परिस्थिती असून उबाठाकडून बाळा कदम इच्छुक आहेत, तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून रमेश कदम इच्छुक आहेत. ते देखील शेवटची संधी म्हणून माघार घेण्यास तयार नाहीत. दोन्ही पक्षाच्या वरिष्ठांनी याबाबत बैठका घेऊन समजावून सांगण्याचा प्रयत्न केला तरीही दोघांपैकी कोणीच माघार घेतलेली नाही. त्यामुळे बाळा कदम यांना उमेदवारी अर्ज भरून टाका, अशा स्पष्ट सूचना शिवसेनेच्या वरिष्ठांनी दिल्याचे समजते. त्यामुळे महाविकास आघातील संबंध अधिक ताणण्याची शक्यता आहे.

आघाडीचा स्वतंत्र प्रचार

रत्नागिरीत महाविकास आघाडीमधील संबंधदेखील ताणले असून शिवसेनेकडून (उबाठा) प्रचार सुरू झाला आहे. एकीकडे उबाठाचे नेते त्यांच्या स्तरावर शहरात फिरत आहेत. तर दुसरीकडे भागातील स्थानिक पदाधिकाऱ्यांना ते विश्वासात घेत नसल्याची नाराजी काही पदाधिकाऱ्यांची आहे. येथे राष्ट्रवादीदेखील स्वतंत्र प्रचार करताना दिसत आहे. पण दोन्ही पक्षांकडून महाविकास आघाडी म्हणून शहरात प्रचार होताना दिसत नाही.

FAQs :

1. रत्नागिरी आणि चिपळूणमध्ये महाविकास आघाडीत वाद का निर्माण झाला?
नगराध्यक्षपदाच्या वाटपावरून शिवसेना (उद्धव ठाकरे) आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मतभेद झाले आहेत.

2. या वादात कोणते पक्ष सहभागी आहेत?
उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस हे प्रमुख पक्ष सहभागी आहेत.

3. निवडणुकांवर या संघर्षाचा काय परिणाम होऊ शकतो?
या संघर्षामुळे आघाडीतील एकोपा तुटू शकतो आणि विरोधकांना फायदा होऊ शकतो.

4. महाविकास आघाडी एकत्र राहील का?
सध्या मतभेद वाढले असले तरी वरिष्ठ नेते परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत.

5. कोणत्या शहरांमध्ये वाद सर्वाधिक तीव्र आहे?
रत्नागिरी आणि चिपळूण येथे नगराध्यक्षपदासाठी सर्वाधिक तणाव आणि राजकीय रस्सीखेच सुरू आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT