narayan rane manoj jarange patil  sarkarnama
कोकण

Narayan Rane On Jarange Patil: 'मराठवाड्यात जाणार अन्...' नारायण राणे विरुद्ध मनोज जरांगे वाद पुन्हा पेटणार

Kokan Political News : यापूर्वीही अनेकदा खासदार नारायण राणे आणि आमदार नितेश राणे यांनी मनोज जरांगे पाटलांवर टीकेची झोड उठवली होती. तसेच जरांगे पाटलांनीही राणे पितापुत्रांवर तोंडसुख घेतले होते.

Deepak Kulkarni

Sawantwadi News : मराठा आरक्षणासाठी मोठा लढा उभारल्यानंतर आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सत्ताधारी महायुती सरकारवर टीकेची झोड उठवली होती.तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्यावरही वारंवार हल्लाबोल केला होता. आता महायुती आणि महाविकास आघाडी असं दोन्हींचंही टेन्शन वाढवणारं विधान केलं आहे.

त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत मराठा समाजाचे उमेदवार उतरवणार असल्याची घोषणा केली आहे. तसेच इच्छुक उमेदवारांचे अर्जही मागवले आहेत. अशातच आता माजी मंत्री आणि खासदार नारायण राणे यांनी जरांगेंवर पाटलांना जशास तसं प्रत्युत्तर देण्याची तयारी सुरू केली आहे.

भाजप नेते आणि खासदार नारायण राणे (Narayan Rane) हे सिंधुदुर्ग भाजपचे विस्तारित कार्यकारिणीचे अधिवेशनाच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलत होते.यावेळी राणेंनी आपल्या नेहमीच्या शैलीत विरोधकांचा समाचार घेतला. ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी,गृहमंत्री अमित शाह यांच्यावर उठसूठ टीका करणाऱ्या उध्दव ठाकरे यांना यापुढे जशास तसे उत्तर दिले जाणार आहे.

तसेच आमचे नेते देवेंद्र फडणवीसांवर सतत टीका करणाऱ्या मनोज जरांगेंचा मराठवाड्यात जाऊन आपण समाचार घेणार असल्याचंही खासदार राणे यांनी ठणकावून सांगितलं आहे.या त्यांच्या इशार्‍यामुळे पुन्हा राणे विरुद्ध जरांगे असा संघर्ष पेटण्याची चिन्हे आहेत.

यापूर्वीही अनेकदा खासदार नारायण राणे आणि आमदार नितेश राणे यांनी मनोज जरांगे पाटलांवर (Manoj Jarange Patil) टीकेची झोड उठवली होती. तसेच जरांगे पाटलांनीही राणे पितापुत्रांवर तोंडसुख घेतले होते.एकीकडे आरक्षणावरुन मराठा-ओबीसी वाद पेटला असतानाच आता नारायण राणे या वादात उडी घेणार असल्याचे दिसून येत आहे.

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी शांतता रॅली दरम्यान विविध जिल्ह्यांना भेटी दिल्या होत्या.या सभेत बोलताना त्यांनी राज्य सरकारवर जोरदार घणाघात केला.तसेच आमदार नितेश राणेंवरही हल्लाबोल केला होता.

'काही मराठा आमदार देवेंद्र फडणवीसांच्या मागेपुढे फिरतात, ज्या आमदारांना समाजाचं काही घेणं देणं नाही, अशा आमदारांना आम्ही पाडणार असल्याचं वक्तव्यं मनोज जरांगे पाटील यांनी केलं होतं.

जरांगे पाटलांच्या याच वक्तव्यावर बोलताना भाजप आमदार नितेश राणे यांनी 'मी अद्याप त्यांचं वक्तव्य ऐकलेलं नाही.मात्रं मी कुणाला सोडत नाही'असं उत्तर दिलं होतं.ते म्हणाले, 'मी याबाबत अद्याप काहीही ऐकलेलं नाही.मात्र, ते कोणत्या हिशोबानं बोललेत ते ऐकेन.त्यांच्या वक्तव्याचा अंदाज घेईन. मी कोणाला सोडणारा नाही असा इशाराही दिला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT