Sharad Pawar News : मराठा-ओबीसी संघर्ष राज्यात होत आहे. या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नेते शरद पवारांनी मधस्थी करावी, अशी मागणी छगन भुजबळ यांनी केली होती. यासाठी ते शरद पवार यांच्या निवास्थानी जात त्यांची भेट घेतली होती. त्यानंतर मराठा आरक्षण आणि इतर प्रश्नांवर शरद पवार यांनी 22 जुलैला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत चर्चा केली होती. या भेटीनंतर पुन्हा आज (शनिवारी) शरद पवार यांनी सपत्नीक मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली.
शरद पवार हे दुसऱ्यांदा मुख्यमंत्री शिंदेंना भेटल्याने चर्चांना उधाण आले होते. पवार-शिंदेंमध्ये नेमकी कशाची चर्चा झाली, यावर अंदाज व्यक्त केले जात होते. मात्र, खुद्द शरद पवार यांनी भेटीमध्ये काय झाले हे सांगितले आहे.
'राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबईच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी सपत्नीक भेट दिली. राज्य सरकारकडील साखर कारखान्यांची प्रलंबित थकहमी प्रकरणे तसेच मागील भेटीवेळी चर्चेत घेतलेले प्रलंबित प्रश्न यांच्या निपटऱ्यासाठी ही भेट उपयुक्त ठरली', असे शरद पवार यांनी ट्विट करत सांगितले आहे.
शरद पवार यांच्या आधी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी शिष्टमंडळासह मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेतली होती. या भेटीमध्ये आम्ही लोकांच्या समस्यांविषयी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्याचे मनसे नेते संदीप देशपांडे यांनी सांगितले. तसेच वरळी विधानसभेतील नागरिकांच्या अडचणी देखील मांडल्याचे संदीप देशपांडे म्हणाले.
महायुतीशी संबंधित अनेक नेत्यांचे कारखाने आर्थिक अडचणीत सापडले आहेत. राष्ट्रीय सहकार विकास निगम (NCDC) यांच्याकडून मंजूर झालेली 1590 कोटी रुपयाची आर्थिक मदत राज्यातील 11 सहकारी साखर कारखान्यांना वितरित करण्यात आली आहे. विधानसभा निवडणूक तोंडावर असताना सत्ताधाऱ्यांच्या कारखान्यांना मदत केल्याचा आरोप आता होऊ लागला आहे. त्यात शरद पवार यांनी मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेत साखर कारखान्यांची प्रलंबित थकहमी प्रकरण मांडल्याचे महत्त्वपूर्ण मानले जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.