Ganesh Naik and Eknath Shinde Sarkarnama
कोकण

Navi Mumbai Politics Shock : नवी मुंबईत राजकीय भूकंपाची चिन्हे! शिंदे शिवसेनेच्या एका निर्णयाने गणेश नाईकांच्या शिलेदारावर संकट?

Fresh political controversy erupts Navi Mumbai after serious allegations over fake court order, putting BJP Ganesh Naik camp and Eknath Shinde-led Shiv Sena face-to-face : नवी मुंबई महापालिकेतील सभागृह नेते सागर नाईक यांच्या अडचणी वाढल्या असून, एकनाथ शिंदे शिवसेना कायदेशीर कारवाईसाठी आक्रमक झाली आहे.

Pradeep Pendhare

Navi Mumbai Municipal Corporation News : नवी मुंबईच्या राजकारणात मोठी खळबळ उडवणारे एक गंभीर प्रकरण समोर आले असून, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या एका शिलेदाराने आता भाजपचे ज्येष्ठ नेते गणेश नाईक यांचे शिलेदार नवी मुंबई महापालिकेतील सभागृहनेते सागर नाईक यांच्याविरोधात थेट आक्रमक भूमिका घेतली आहे.

बनावट न्यायालयीन आदेश प्रकरणी कायदेशीर कारवाईची मागणी होत असल्याने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

या संपूर्ण प्रकरणात एकनाथ शिंदे (Eknath Shinde) शिवसेनेचे नगरसेवक अशोक पाटकर यांनी आक्रमक पवित्रा घेतला असून, न्यायालयानेही या प्रकाराची गंभीर दखल घेत थेट बेलापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे नवी मुंबई महापालिकेच्या सत्ताकारणात मोठा संघर्ष उभा राहण्याची चिन्हे आहेत.

काही दिवसांपूर्वी नेरुळ परिसरातील एका अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यासाठी महापालिकेने (Municipal) नोटीस बजावली होती. मात्र संबंधित इमारतीच्या मालकाने महापालिकेची कारवाई थांबवण्यासाठी बेलापूर दिवाणी न्यायालयाने स्थगिती दिल्याचा दावा करणारे पत्र प्रशासनासमोर सादर केले.

विशेष म्हणजे हे कथित न्यायालयीन आदेशपत्र सागर नाईक नावाच्या व्यक्तीच्या मोबाईल क्रमांकावरून महापालिका आयुक्त डाॅ. कैलास शिंदे यांच्या मोबाईलवर पाठवण्यात आले होते. आयुक्त डाॅ. कैलास यांनी या पत्राची अधिकृत पडताळणी करण्यासाठी ते महापालिकेच्या विधी विभागामार्फत बेलापूर न्यायालयात सादर केले. तपासणीदरम्यान संबंधित आदेश पूर्णपणे बनावट असल्याचे उघड झाले.

न्यायालयाकडून थेट गुन्हा दाखल

या प्रकारानंतर न्यायालयाने स्वतः गंभीर दखल घेत बेलापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करत चौकशीचे आदेश दिले आहेत. या बनावट आदेशासाठी वापरण्यात आलेला मोबाईल क्रमांक सभागृहनेते सागर नाईक यांचा असल्याचा गंभीर आरोप अशोक पाटकर यांनी केला आहे.

कायदेशीर कारवाईची आयुक्तांकडे मागणी

अशोक पाटकर यांनी आरोप केला आहे की, सागर नाईक हे आपल्या पदाचा गैरवापर करत अनधिकृत बांधकामावरील महापालिकेच्या कारवाईत अडथळा निर्माण करत होते. त्यामुळे आता महापालिका प्रशासन याप्रकरणी काय भूमिका घेणार आणि सागर नाईक यांच्यावर थेट कायदेशीर कारवाई होणार का, याकडे संपूर्ण नवी मुंबईचे लक्ष लागले आहे.

आयुक्तांना विरोधकांनी घेरलं

दरम्यान विरोधी पक्षनेते विजय लक्ष्मण चौगुले यांनीही या प्रकरणावर आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी आयुक्त डाॅ. कैलास शिंदे यांनी बनावट न्यायालयीन आदेश प्रकरणी तात्काळ अधिकृत आणि वस्तुनिष्ठ खुलासा करावा, अशी मागणी केली आहे.

भाजप अन् शिवसेनेतील संघर्ष तीव्र

चौगुले यांनी म्हटले की, महापालिकेच्या विधी विभागाने न्यायालयीन अभिलेखांची पडताळणी केल्यानंतर अशा स्वरूपाचा कोणताही आदेश न्यायालयाने दिलेला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे नवी मुंबईच्या राजकारणात मोठे पडसाद उमटण्याची शक्यता असून, भाजप आणि एकनाथ शिंदे शिवसेना यांच्यातील संघर्ष आणखी तीव्र होण्याचे संकेत मिळत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT