शशिकांत शिंदे यांनी राष्ट्रवादी एकत्रीकरणाच्या चर्चांना ब्रेक लावल्याचे जाहीर केले.
रोहित पवार यांनी सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यावर भाजप प्रवेशाचे आरोप केले होते.
‘Black and White’ कार्यक्रमात तटकरे यांनी हे आरोप फेटाळून लावत महाविकास आघाडीतील मतभेदांवर भाष्य केले.
NCP merger And bjp entry Politics : राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातातील निधनानंतर अनेक गोष्टींवरून दोन्ही राष्ट्रवादीत वाद होताना दिसत आहे. दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्री करणावरून सुरू झालेली चर्चा आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने थांबवली आहे. प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी यावर ब्रेक लावत हा मुद्दा आपण थांबवत असल्याचे म्हटलं आहे. यामुळे विलिनीकरणाच्या चर्चा शांत झाल्या आहेत.
दरम्यान आमदार रोहित पवार यांनी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल हे भाजपमध्ये जातील. त्यांनी भाजपला मदत केली असे आरोप केले होते. हे सर्व आरोप आता तटकरे यांनी साम टीव्हीवरील 'ब्लॅक अँड व्हाईट' कार्यक्रमात खोडून काढले आहेत. त्यांनी भाजप प्रवेशावरील चर्चांना अफवा म्हणत रोहित पवार यांचे नाव न घेत गर्भीत इशाराच दिला आहे. सोबत महाविकास आघाडी फुटीचा पर्दाफाश केला आहे.
अजित पवार यांच्या विमान अपघाताबद्दल रोहित पवारांनी पत्रकार परिषद घेत अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केलेले होते. यावेळी त्यांनी मोठ्या नेत्यांबद्दल प्रश्न उपस्थित करत प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि नरेश अरोरा यांची नावं घेत गंभीर आरोप केले होते. एका फाईलवर सही करण्यासह नरेश अरोरांच्या कंपनीचा शकडो कोटींचा कॉन्ट्रॅक्ट रद्द करण्यावरून झालेल्या वादामुळेच अजित पवार यांना उशीर झाला आणि त्यांना विमान बूक करावे लागले होते.
या आरोपानंतर राज्यभर एकच खळबळ उडाली होती. तर याआधी देखील रोहित पवार यांनी अजित पवार यांचे महत्त्व कमी करण्यासाठी भाजप प्रयत्न करत असल्याचा दावा केला होता. त्यांनी यावेळी खासदार सुनील तटकरे आणि खासदार प्रफुल्ल पटेल यांचे नाव घेत हेच भाजपला मदत करत असल्याचा दावा केला होता. तर ज्या लोकांना अजित पवार यांनी सोबत नेले, तेच आता त्यांना अडचणीत आणण्याच्या प्रयत्नात आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचे महत्त्व कमी करण्याचे प्रयत्न केले जात असल्याचा दावा केला होता.
या अशा दाव्या आणि आरोपांवर आता तटकरेंनी सडेतोड उत्तर दिले आहे. त्यांनी, हा आरोप अत्यंत निर्धार असून द्वेषाच्या पोटी केला जात आहे. तर असे आरोप आमच्यावर दादा हयात असताना आम्ही त्यांच्याबरोबर असतानाही झाले. इतकचं नाही तर काही महाभागांची मजल ही दादांच्या बाबतीतही असेच आरोप करण्यापर्यंत गेली होती. पण दादांनी जो विचार दिला तोच आम्ही पुढे घेवून जाणार आहोत.
भाजप असो किंवा एनडीएचे केंद्रीय नेतृत्व असो किंवा राज्यातील यांना आम्हाला आमच्या पक्षाला सोबत घेवून पुढे जाण्याचा विश्वास आणि स्पष्टता दिली आहे. भाजपने कधीही तसे केले नाही. याच्याआधी आम्ही युपीएबरोबर काम केलं आहे. मी त्यावेळी वरिष्ठ पदावर होतो. युपीएबरोबर काम करताना मित्र पक्षाला मिळणारी वागणूक आम्ही पाहत होतो. पण २०१४ जवळून अनुभवली.
विधानसभांच्या जागांच्या वाटपासाठी पृथ्वीराज चव्हाणांशी चर्चा करताना मीच प्रदेशाध्यक्ष होतो. त्यावेळी काही जागा आम्हाला बदलून हव्या होत्या. त्या प्रमाणे यादीची मागणी करण्यात आली. त्याला माझा विरोध होता. मी प्रफुल पटले आणि अजित पवार यांना नको म्हणून सांगितलो. म्हणालो यादी दिली तर घोटाळा होईल आणि यादी दिली. त्यानंतर काँग्रेसने त्या जागांवर आपले उमेदवार जाहीर केले.
महाविकास आघाडी तुटण्यामागे हेच पहिले कारण होतं. पण असं भाजप युतीतील मित्र पक्षांबरोबर करत नाही. विशेषत: राष्ट्रवादीला आणि इतर असणाऱ्या पक्षांना ज्यात शिवसेनाही आहे. या मित्र पक्षांना सौहार्दाची वागणूक दिली जाते. आमचं मत विचारात घेतलं जातं. सन्मान ही तेथे होतो.
त्यामुळे भाजपमध्ये जाणे ह्या फक्त कल्पोकल्पीत आणि बदनाम करण्यासाठी उठवलेल्या अफवा आहेत. तसेच या अफवा कोण पसरवत आहे, त्याच्या मागे कोण आहेत, त्यांची नावे आम्हाला माहित आहेत. योग्य वेळ आल्यावर ती उघड करू असा गर्भीत इशारा त्यांनी दिला आहे. पण आता इशारा त्यांना रोहित पवार यांचे नाव न घेता दिला असला तरी तो त्यांनाच दिला असल्याची चर्चा रंगली आहे.
1. राष्ट्रवादी एकत्रीकरणाच्या चर्चा का थांबल्या?
प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी हा मुद्दा थांबवत असल्याचे स्पष्ट केल्याने विलिनीकरणाच्या चर्चा शांत झाल्या.
2. रोहित पवार यांनी कोणते आरोप केले होते?
सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल भाजपमध्ये जाणार असल्याचा तसेच भाजपला मदत केल्याचा आरोप केला होता.
3. तटकरे यांनी काय प्रतिक्रिया दिली?
त्यांनी भाजप प्रवेशाच्या चर्चांना अफवा म्हणत आरोप फेटाळले.
4. महाविकास आघाडीबाबत काय म्हटले गेले?
आघाडीतील मतभेद आणि फुटीबाबत त्यांनी खुलासा केला.
5. या घडामोडींचा पुढील परिणाम काय असू शकतो?
राजकीय समीकरणांमध्ये बदल होण्याची शक्यता असून राष्ट्रवादीतील गटबाजी वाढू शकते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.