Sunil Tatkare: "रोहित पवार नावाचे गृहस्थ राजकारणात..."; विसंवादांच्या चर्चांवर तटकरेंनी स्पष्टच सांगितलं

Sunil Tatkare: रोहित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्याशी सुनील तटकरे यांचा विसंवाद असल्याच्या चर्चा होत आल्या आहेत, यावरही सुनील तटकरे यांनी भाष्य केलं आहे.
Sunil Tatkare
Sunil Tatkare
Published on
Updated on

Sunil Tatkare on Rohit Pawar and Supriya Sule: अखंडीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रदेशाध्यक्ष असताना सुनील तटकरेंचा रोहित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्याशी संवाद होत नव्हता, विसंवाद होता अशा चर्चा अनेकदा होत आल्या आहेत. यावर आता सुनील तटकरेंनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. साम टीव्हीवरील ब्लँक अँड व्हाईट कार्यक्रमात ते बोलत होते.

Sunil Tatkare
Sunil Tatkare: अजित पवारांच्या निधनानंतर राजकीय समिकरणं बदलली! विलिनिकरणाचा प्रस्ताव आल्यावर...; तटकरेंनी पहिल्यांदाच मांडली स्पष्ट भूमिका

शरद पवारांशी संपर्क नाही

अजित पवारांनी वेगळी वाट स्विकारली आणि पक्ष म्हणून वेगळे झाल्यानंतर शरद पवारांशी संपर्क आला का? या प्रश्नावर बोलताना तटकरे म्हणाले, "त्या दोन वर्षांच्या कालावधीत मला त्यांच्याशी संपर्क करण्याचा योग आला नाही. कदाचित तेव्हा परिस्थितीच अशी उद्भवली नसेल की आम्ही बोलावं. पण आम्ही वेगळा निर्णय घेतल्यानंतर काही दिवसांतच अजित पवारांसह शरद पवारांची भेट घेण्यासाठी गेलो होतो, कदाचित आमच्यासोबत ते येतील अशी आम्हाला अपेक्षा होती, तशा चर्चाही त्यावेळी सुरु झाल्या होत्या. त्यावेळी शरद पवारांच्या पुण्यातील घरी जाऊन आम्ही भेटलो होतो तेवढ्याच कालावधीत शरद पवारांशी संवादाची संधी मिळाली होती पण त्यानतंर त्यांच्याशी भेटीचा योग आला नाही"

Sunil Tatkare
Amravati Municipal Corporation : नवनीत राणांच्या पराभवासाठी काँग्रेसला मदत केली.. त्याच नेत्याला नगरसेवक करण्यासाठी शिंदेंची शिवसेना आग्रही

रोहित पवार नावाचे गृहस्थ राजकारणात नव्हते

दरम्यान, दोन्ही पक्ष वेगळे झाल्यानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीतले प्रमुख नेते म्हणजे सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांच्याशी सुनील तटकरे यांचा विसंवाद असल्याचीही चर्चा होत आली आहे. प्रदेशाध्यक्ष असताना रोहित पवार अनेकदा खोडा घालत होते. यावरही सुनील तटकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. तटकरे म्हणाले, "२०१४ ते २०१८ मी राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष होतो. त्यावेळी शरद पवारांनी माझी नेमणूक केली होती, त्यावेळी मी स्वतःहून संघटनेत काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यावेळी रोहित पवार नावाचे गृहस्थ राजकारणात नव्हतेच, ते २०१९ ला कर्जतमधून निवडणूक लढले आणि त्यानंतर राजकारणात आले. त्यामुळं त्यांचा माझा कधी संबंधही आला नाही, ते कार्यकर्ता आणि प्रदेशाध्यक्ष असाही कधी संबंध लांबून देखील कधी आला नाही.

Sunil Tatkare
Ganesh Naik vs Eknath Shinde : नाईक विरुद्ध शिंदे वादात निलेश राणेंची उडी, वनमंत्री काय कामाचे? म्हणत खात्याच्या कारभाराची कुंडलीच मांडली

सुप्रिया सुळेंनी उत्तम संवाद

पण सुप्रिया सुळेंनी सातत्यानं संबंध येत होता चर्चा होत होती. कारण २००९ आधी २००७ ला त्या राज्यसभेवर गेल्या. त्यानंतर २००९ आणि २०१४ ला बारामती लोकसभेतून खासदार झाल्या. एक उत्कृष्ट संसदपटू, पक्षातील एक भूमिका, युवती संघटन उभं करण्यात देशातील राजकीय पक्षांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक आहे. यामध्ये सुप्रिया सुळेंचं योगदान मोठं राहिलं त्यामुळं त्यांच्याशी आमचा उत्तम संवाद होता. कधी मतभेद किंवा तसंही काही नव्हतं. पक्षाच्या चाकोरीत दिलेले निर्णय राबवण्याच काम माझ्याकडून होतं होतं. प्रदेशाध्यक्षपदाच्या चार वर्षांच्या कालावधीत मी चार वेळा महाराष्ट्राचा दौरा केला. शेवटचा आमचा हल्लाबोल दौराही यशस्वी झाला होता. त्यामुळं सुप्रिया सुळे आणि माझ्यामध्ये मतभेद असं काहीही नव्हतं उलट एकत्रितपणे आम्ही काम करत होतो.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com