दिवेआगार ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा पराभव झाला आहे.
‘दिवेआगार विकास आघाडी’चे विजय तोडणकर सरपंच म्हणून निवडून आले आहेत.
हा निकाल सुनील तटकरेंच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीसाठी मोठा धक्का मानला जात आहे.
Raigad Diveagar Gram Panchayat Election Result : नुकताच रायगड जिल्ह्यातील १८ ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्या असून जिल्ह्याचे लक्ष श्रीवर्धनमधील दिवेआगार ग्रामपंचायतीच्या निकालाकडे लागले होते. यावेळी दिवेआगारमध्ये सत्तांतर झाले असून दिवेआगर विकास आघाडीचे विजय तोडणकर सरपंच पदी जिंकून आले आहेत. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. श्रीवर्धन मंत्री आदिती तटकरे आणि खासदार सुनील तटकरे (sunil tatkare) यांचा बालेकिल्ला मानला जातो. तर महत्त्वाची असणारी ग्रामपंचायत त्यांच्या हातातून निसटल्याने तटकरे यांच्या बालेकिल्ल्याचा बुरुज ढासळल्याची चर्चा आहे.
रायगड जिल्हा हा तसा मंत्री आदिती तटकरे आणि खासदार सुनील तटकरे यांचा बालेकिल्ला समजला जातो. पण गेल्या काही दिवसांपासून येथे त्यांच्या सत्तेला आता तडे जाताना दिसत आहे. काहीच दिवसांपूर्वीच म्हसळा नगरपंचायतीमध्ये त्यांना धक्का बसला होता. येथील राष्ट्रवादीची (NCP) असणारी सत्ता शिवसेनेनं उलथवून टाकत राष्ट्रवादीला धक्का दिला होता. यानंतर आता महत्वाची असणारी दिवेआगारसारखी ग्रामपंचायतही राष्ट्रवादीच्या हातून गेली आहे. यामुळे तटकरेंच्या नेतृत्वाला येथील जनतेने नाकारलं आहे.
११ सदस्यांची असणारी दिवेआगार ही ग्रामपंचायत वर्षानुवर्षे राष्ट्रवादीच्या ताब्यात होती. पण ८ सदस्यांनी राष्ट्रवादीविरोधी गट तयार करत पक्षाच्या विरोधात भूमिका घेतली. ज्यानंतर या ८ सदस्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी निकाल देत अपात्र ठरवले होते. त्यांचे सदस्यपद रद्द केले होते. याच रिक्त जागा आणि सरपंचपदासाठी पोटनिवडणूक लागली होती. ज्यामध्ये सरपंच आणि ३ सदस्य हे दिवेआगार विकास आघाडीचे (राष्ट्रवादीविरोधी गट) निवडून आले आहेत.
यानंतर आता मनमानी, हुकूमशाही आणि लोकांना गृहीत धरण्याचे राजकारण दिवेआगारमध्ये चालणार नाही, असा सल्ला नवनिर्वाचित सरपंच विजय तोडणकर यांनी खासदार सुनील तटकरे यांना दिला आहे. तर श्रीवर्धन मतदारसंघात परिवर्तनाची लाट उसळली असून तटकरेंना श्रीवर्धनमधून हद्दपार करणार असून राष्ट्रवादीचा परतीचा प्रवास सुरू झालाय असा निशाणा रायगड शिवसेना जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर यांनी साधला आहे.
घोसाळकर यांनी दिवेआगर ग्रामपंचायतचे शिवसेना पुरस्कृत नवनिर्वाचित सरपंच विजय तोडणकर यांचे अभिनंदन केले. यावेळी त्यांनी, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना रायगडमधील दिवेआगर ग्रामपंचायतच्या निकालानंतर जोरदार टीका केली. घोसाळकर म्हणाले, तटकरे यांचा परतीचा प्रवास सुरू झाला असून तटकरे यांना हद्दपार करून पुन्हा एकदा श्रीवर्धन मतदार संघावर शिवसेनेचा भगवा फडकेल, असा विश्वास व्यक्त केला आहे.
दरम्यान काही दिवसांपूर्वी म्हसळा नगरपंचायत, श्रीवर्धन नगरपालिका आणि आता दिवेआगर ग्रामपंचायतीवर शिवसेना पुरस्कृत म्हणजेच राष्ट्रवादी विरोधी गटाची सत्ता स्थापन झाल्याने शिवसेनेचे मनोबल वाढले आहे. तर मंत्री अदिती तटकरे आणि प्रदेशाध्यक्ष तटकरे यांच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेची सरशी होते असं एकंदरीत चित्र निर्माण झालं आहे.
1. दिवेआगार ग्रामपंचायत निवडणुकीत कोण विजयी झाले?
विजय तोडणकर सरपंच म्हणून निवडून आले.
2. कोणत्या पक्षाला पराभवाचा सामना करावा लागला?
राष्ट्रवादी काँग्रेसला पराभवाचा सामना करावा लागला.
3. हा पराभव महत्त्वाचा का मानला जातो?
हा सुनील तटकरेंच्या बालेकिल्ल्यात झाल्यामुळे मोठा धक्का मानला जात आहे.
4. दिवेआगार कोणत्या जिल्ह्यात आहे?
दिवेआगार हे रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यात आहे.
5. या निकालाचा राजकीय परिणाम काय होऊ शकतो?
स्थानिक पातळीवर राष्ट्रवादीची पकड कमी होण्याची शक्यता असून राजकीय समीकरण बदलू शकते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.