Sunil Tatkare : सुनील तटकरेंनी मानले शरद पवारांचे आभार; बारामती पोटनिवडणूक बिनविरोधच्या रणनीतीवरही भाष्य...

Baramati By Election 2026 : बारामती पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार यांची बिनविरोध निवड व्हावी यासाठी प्रयत्न सुरू असून विरोधक उमेदवार देणार नाहीत, असा विश्वास सुनील तटकरे यांनी व्यक्त केला.
Sunil tatkare-Sharad Pawar
Sunil tatkare-Sharad PawarSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 05 April : सुनेत्रावहिनींची निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी आम्ही सगळे प्रयत्न करतोय. महाविकास आघाडीतील शरद पवारांच्या पक्षाने उमेदवार देणार नाही, हे आधीच घोषित केलं आहे, त्याबद्दल त्यांचे आभार. उद्धव ठाकरेही उमेदवार देणार नाहीत. काँग्रेससोबत देखील आम्ही संपर्क करतोय, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी बारामती पोटनिवडणुकीच्या रणनीतीबाबत सांगितले.

खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare) हे अक्कलकोट येथील स्वामी समर्थ, तुळजापूरची तुळजा भवानी आणि पंढरपूरच्या पांडुरंगाचे दर्शनासाठी सोलापूर दौऱ्यावर आले होते. त्या वेळी माध्यमांशी बोलताना तटकरे यांनी बारामती पोटनिवडणूक आणि इतर गोष्टींवर भाष्य केले.

ते म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) उद्या (ता. ०५ एप्रिल) उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. आमच्या सर्वांसाठी अतिशय भावनाप्रधान आणि संवेदनशील प्रसंग आहे. पण, ज्या पद्धतीने सुनेत्रावहिनी सरकारमध्ये कामे करत आम्हाला उभारी देण्याचा प्रयत्न करत आहेत, तेच आमच्यासाठी उद्याच्या भविष्याची वाटचाल करणारे आधारस्तंभ आहे

बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी आम्ही काँग्रेससोबतही संपर्क करतोय. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासोबत कदाचित आज आमचं बोलणं होईल, त्यांनाही आम्ही विनंती करणार आहोत. ज्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक होतेय, ती अतिशय संवेदनशील बाब आहे. गेली 40 वर्षे अजितदादांनी वेगळा ठसा उमटवला आहे. अशा वेळी ही निवडणूक बिनविरोध व्हावी, ही सगळ्यांची नम्रतेची विनंती आहे.

Sunil tatkare-Sharad Pawar
Baramati Election News : बारामती निवडणुकीत 1991 ची पुनरावृत्ती होणार; अजितदादा ते सुनेत्रा पवार, जाणून घ्या हा इतिहास...

लक्ष्मण हाके यांच्या निवडणूक लढविण्याबाबत तटकरे म्हणाले, आमचे सगळ्यांना आवाहन आहे, ज्या पद्धतीने दादांनी राज्यासाठी समर्पण केलंय. त्यांच्या अकाली निधनानंतर होणारी ही निवडणूक बिनविरोध व्हावी.

सुनेत्रा पवार यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी खासदार प्रफुल्ल पटेल, मंत्री छगन भुजबळ आणि मंत्रिमंडळातील सहकारी उद्या उपस्थित असणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही आम्ही विनंती केली होती. पण, पूर्वनियोजित कार्यक्रममुळे ते येऊ शकणार नाहीत. पण, त्यांचा प्रतिनिधी येईल, असेही तटकरे यांनी स्पष्ट केले.

तटकरे म्हणाले, राष्ट्रवादी पक्षाच्या सर्व आमदारांना आम्ही उद्या बारामतीला येण्याची सूचना केली आहे. शरद पवार आणि पवार कुटुंबीयांनाही सुनेत्रा पवार यांचा अर्ज भरायला येण्यासाठी आम्ही विनंती करणार आहोत. बारामतीचे नेतृत्व पवारसाहेब, अजितदादा आणि आता सुप्रिया सुळे करत आहेत, त्यामुळे त्यांनी यावं यासाठी विनंती करणार आहोत.

अजित पवार यांच्या विमान अपघात मृत्यूप्रकरणी व्हीएसआर कंपनीच्या मालकाला अटक करण्याची मागणी जय पवार यांनी केली आहे. त्यावर जय पवारांची जी मागणी आहे, तीच राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी असणार आहे.

Sunil tatkare-Sharad Pawar
Satara ZP : जयकुमार गोरेंचा शंभूराज देसाई, मकरंदआबांना इशारा : भाजपचा प्लॅन A, B अन्‌ C एक्झिक्यूट झालाय; D अजून व्हायचाय...!

अजित पवार यांच्या प्रकरणात तपास शीघ्र गतीने व्हावा. ज्या नेत्यांनी शंका उपस्थित केल्या, त्या सर्वांच्या शंकेसह तपास करावा. मी ज्या वेळी संसदेत होतो, त्यावेळी देश पातळीवरील विविध खासदारांनी दादांबद्दल हळहळ व्यक्त केली. त्यामुळे देशाला समजलं पाहिजे की, दादांचा अपघात नेमकं कशामुळे झाला, असेही तटकरे म्हणाले.

तटकरे म्हणाले, जय पवार हे तरुण नेते आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उद्याचं युवा नेतृत्व आहे, त्यामुळे त्यांनी भावना व्यक्त करणे हे योग्य आहे. पक्ष संघटनेसाठी जय पवार यांनी केलेलं विधान महत्त्वाचं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com