Former Roha Shiv Sena taluka chief Manoj Shinde, once a fierce critic of Sunil Tatkare Sarkarnama
कोकण

Raigad Politics : वाढदिवशीच सुनील तटकरेंचा शिवसेनेला मोठा धक्का; कट्टर विरोधकाला सोबत घेत बेरजेचं राजकारण

Raigad Politics : रोहा तालुक्यातील नाराज नेत्याने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. सुनील टकरे यांनी यातून रायगडमध्ये बेरजेचं राजकारणं केलं असल्याचं बोललं जातं.

Hrishikesh Nalagune

आपल्या वाढदिवशीच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, खासदार सुनील तटकरे यांनी मित्रपक्ष शिवसेनेला जोरदार धक्का दिला. शिवसेनेचे माजी रोहा तालुका प्रमुख मनोज कुमार शिंदे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

जिल्हा परिषद निवडणुकीनंतर शिंदेंना अचानक तालुकाप्रमुख पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. तेव्हापासून ते नाराज होते. अखेर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. सुनील तटकरे यांचे कट्टर विरोधक असलेले शिंदे त्यांच्यासोबत गेल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

या पक्षप्रवेशावर बोलताना शिंदे म्हणाले, मी बदललोय, हा तुमचा आरोप आहे. पण बदललेलो नाहीये. परिस्थितीने बदलवलेलं आहे. माझ्यासारख्या कार्यकर्त्याला, ज्याने रोह्यामध्ये शून्यातून शिवसेना उभी केली आणि वटवृक्षासारखी वाढवली आणि त्याला बेधडक आरोप करून बाहेर काढलं जातं. त्यावेळेला शेवटी काय, मनाची परिस्थिती बदलावीच लागते आणि त्याप्रमाणे मी बदललोय. असं काय बदलायसाठी काय विशेष नाही, असंही त्यांनी सांगितलं.

मनोजकुमार शिंदे हे रोहा तालुक्यातील ताकदवान नेते म्हणून ओळखले जातात. रोहा तालुक्यात त्यांचे संघटनात्मक जाळे मजबूत असून शिवसैनिकांमध्ये त्यांचा प्रभाव असल्याचे मानले जाते. सुनील तटकरे यांचे कट्टर विरोधक अशीच त्यांची आजवरची ओळख होती. मात्र, आता हे दोन मोठे नेते एकत्र आल्यामुळे रोहा आणि पर्यायाने रायगड जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे.

शिंदे यांच्या पक्षप्रवेशाने रोहा-श्रीवर्धनच्या आमदार आदिती तटकरे यांची निवडणुकीत ताकद वाढल्याचे बोलले जाते. त्या पार्श्वभूमीवर हा पक्षप्रवेश राष्ट्रवादी काँग्रेससाठी महत्त्वाचा मानला जात आहे. तर अलिबागचे आमदार महेंद्र दळवी आणि महाडचे आमदार भरत गोगवले यांना मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेसाठी हा केवळ एका नेत्याचा पक्षप्रवेश नसून रोहा तालुक्यातील संघटनात्मक ताकदीला बसलेला धक्का मानला जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT